Vat Purnima 2026 Special | Do This Banyan Tree Puja for Husband’s Long Life & Family Happiness

Vat Purnima 2026 Special
Vat Purnima 2026 Special | Do This Banyan Tree Puja for Husband’s Long Life & Family Happiness

Vat Purnima 2026 Special | Do This Banyan Tree Puja for Husband’s Long Life & Family Happiness

29 जून 2026 वट पूर्णिमा शुभ मुहूर्त, महत्व, शुभ रंग, पूजा साहित्य, पूजा विधी, काय करावे-काय करू नये, सटीक उपाय

वट पूर्णिमा ह्या वर्षी 29 जून 2026 सोमवार ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला ह्या दिवशी साजरी करायची आहे. वट पूर्णिमा व्रत हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सात जन्म हाच पती मिळवा म्हणून हिंदू स्त्रिया ह=व्रत करतात. यम देवाला सावित्रिणी वाद विवादात हरवून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. म्हणून ह्या दिवसाचे प्रतीक म्हणून व्रत केले जाते. सावित्री व यमाचे संभाषण वडाच्या वृक्षाखाली झाले होते त्यामुळे ह्या दिवशी वट वृक्षाला महत्व प्राप्त झाले आहे. सावित्री ही पती व्रता होती. तिने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्याचे प्रतीक मानून विवाहित स्त्रियांनी ही व्रत करावे.

वडाच्या वृक्षाचे महत्व:
यमाने सत्यवानचे प्राण हरण केल्यावर सावित्रिनि 3 दिवस यमशी वाद विवाद केला मग यम प्रसन्न झाले व त्यांनी सत्यवानाचे प्राण परत करून त्याला जीवंत केले जे चर्चा सत्र झाले होते ते वडाच्या वृक्षाखाली झाले होते म्हणून वट वृक्षाशी संवित्रीचे नाव जोडले गेले होते.

वडाच्या झाडाचे पूजन करणे लाभ कोणते:
वडाच्या वृक्षामध्ये परमेश्वरी तत्व आहेत म्हणजेच ब्रह्मा, विष्णु व शिव ह्यांचा वास आहे. जेव्हा वडाची पूजा केली जाते तेव्हा स्त्रीमध्ये भावाचे वलय निर्माण होते. मंत्र म्हणताना एक प्रकारचे वलय निर्माण होते. आनंदाचे वातावरण तयार होते. झाडात चैतन्याचा प्रवाह निर्माण होतो. ईश्वराकडून आशीर्वादाचा प्रवाह स्त्रीकडे आकृष्ट होऊन तिच्या देहा भोवती संरक्षक कवच निर्माण होते.

वट पूर्णिमा शुभ मुहूर्त:
पूर्णिमा तिथी प्रारंभ: 29 जून 2026 सोमवार सकाळी 03:06
पूर्णिमा समाप्ती: 30 जून 2026 मंगळवार सकाळी )05:26
पूजेसाठी उत्तम शुभ मुहूर्त: सकाळी 11:56 ते दुपारी 12:51 पर्यन्त
अमृत काळ: सकाळी 06:17 ते 07:44 पर्यन्त
राहू काळ: सकाळी 07:41 ते 09:22 पर्यन्त

सोमवारी पूर्णिमा तिथी आहे तर संध्याकाळी 5:30 वाजे पर्यन्त वडाची पूजा करू शकता पण अंधार पडायला लागला की वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करू नये.
वट पूर्णिमा च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करावे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात एक चमचा दूध घालावे त्यामुळे चंद्र-शुक्र मजबूत बनतो. कोणता सुद्धा दोष लागत नाही व चांगले फळ प्राप्त होते. ह्या दिवशी घरातील देव स्वछ करावे, उंबरठ्याची पूजा करावी, तुळशीची पूजा करावी. पण वडाची पूजा करण्याच्या अगोदर घरातील देवांची पूजा, आपल्या कुलदेवीची पूजा व तुळशीची पूजा करून मगच घरच्या बाहेर पडून वडाच्या वृक्षाची पूजा करावी. देव्हाऱ्यात अखंड दिवा लावावा आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता. आपल्या कुलदेवीची आंबा व गव्हानी ओटी भरावी. ह्या दिवशी आंबा व गहू ह्याचे खूप महत्व आहे.

वटपूर्णिमाच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी:
वटपूर्णिमा ह्या दिवशी महिला छान जरीची साडी नेसून दाग दागिने घालून नटून थटून वडाची पूजा करायला जातात. पण ह्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी लाल, हिरवी, पिवळी, नारंगी, जांभळी, निळी, केशरी नेसावी. पण चुकून सुद्धा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसु नका. आपण ज्या रंगाची साडी नेसाल त्या रंगाच्या बांगड्या घालू शकता. नवविवाहित मुलीची पहिली वट पूर्णिमा आहे तर छान हिरव्या रंगाची जरीची साडी नेसावी ह्या दिवशी हातात दोन तरी हिरव्या नव्या काचेच्या बांगड्या घालाव्यात.

पूजा साहित्य:
आज काल वेळे अभवी आपल्याला वडाच्या झाडा जवळ जाऊन पूजा करणे शक्य नसेलतर घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून कुंडीमद्धे लावून, कुंडी पाटावर ठेवून, कुंडीवर स्वस्तिक काढून पाटा भोवती रांगोळी काढून पूजा करू शकता. जर शक्य असेलतर वडाच्या झाडा जवळ जावूनच पूजा केली पाहिजे.
एक स्टीलची प्लेट किंवा ताट, पाण्याचा गडू, हळद-कुंकूची कोयरी, तुपाच्या फुल वातीचे निरांजन, पान-सुपारी-कॉईन, पंचामृत, साखर, कापसाची माळ, अगरबत्ती, गूळ-खोबरे, कापुर, सूती धागा गुंडाळण्यासाठी, ओटीचे सामानमध्ये ब्लाऊज पीस, गहू, आंबा, फुल

Vat Purnima 2026 Special
Vat Purnima 2026 Special | Do This Banyan Tree Puja for Husband’s Long Life & Family Happiness

वडाच्या झाडाची पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी:
वडाच्या झाडा जवळ जावून प्रथम गडु मधील पाणी घालावे, हळद-कुंकू वहावे, ओटी भरावी, प्रसाद म्हणून पंचामृत, साखर , आंबा केळी ठेवावी, मग सूती धागा घेऊन वडाच्या फांदीमध्ये अडकवावा व 3,5,7 कीव 11 किंवा आपल्या कडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तितक्या प्रदक्षिणा माराव्यात. प्रदक्षिणा मारताना हातात धागा घेवून माराव्या. प्रथम धागा वट वृक्षाला बंधावा मग प्रदक्षिणा मारत सूती धागा गुंडाळावा मग शेवटी धागा तोडू नये किंवा कोणाला तोडून देवू नये प्रदक्षिणा मारल्यावर राहिलेला धागा झाडामध्ये खोंचावा. दुसऱ्या कोणाचा धागा घेऊ नये किंवा आपला धागा कोणाला देवू नये.
पूजा झाल्यावर प्रार्थना करावी की आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहून दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे तसेच आपल्या विवाहित जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्याचे निराकरण व्हावे.
मग आपण तेथे आलेल्या महिलांची आंबा व गहुनी ओटी भरू शकता.
29 जानेवारी 2026 सोमवार आहे त्यामुळे भगवान शंकर व पार्वती माताची मनोभावे पूजा अर्चा करावी आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल.

उपवास:
वट पूर्णिमा ह्या दिवशी आपण संपूर्ण दिवस उपवास ठेऊन दुसऱ्या दिवशी सोडू शकतो, किंवा सकाळी पूजा होई पर्यन्त उपवास धरून पूजा झाल्यावर सोडू शकतो. आपल्या कडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे करावे. व्रतासाठी दूध, फळे, ड्रायफ्रूट, साबुदाणा, भगर सेवन करू शकता.

वट पूर्णिमा ह्या दिवशी महिलांनी काय करावे व काय करू नये:
वट पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करावे, ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. वडाच्या झाडाला जल अर्पित करून हळद-कुंकू अर्पित करून पूजा करा. ह्या दिवशी सत्यवान-सावित्रीची कथा आइकावी किंवा वाचावी. ह्या दिवशी लाल सूती धागा हातात घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा माराव्या. संपूर्ण दिवस उपवास ठेवावा. ह्या दिवशी व्रताचे पारण करताना पतीला कुंकू लावून पाया पडाव्या. पूजा करताना पवित्रताचे पालन करावे. जरूरत मंद लोकांना फळे, अन्न दान करावे. ह्या दिवशी कोणाशीही वाद विवाद करू नये. व्रत करताना कोणते सुद्धा नकारात्मक विचार मनात आणू नयेत. ह्या दिवशी केस धुवू किंवा कापू नयेत. सात्विक भोजन करावे खोटे बोलू नये. छान शृंगार करावा.

वट पूर्णिमा ह्या दिवशी करा सटीक उपाय:
वटपूर्णिमा ह्या दिवशी करावयाचे उपाय, विवाहिक जीवनात सुख-समृद्धी येईल
वटपूर्णिमा ह्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पहात असतात. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने विवाहिक जीवनात आनंद येईल.
माता लक्ष्मीच्या कृपाने घरात सुख-शांती येते. ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली पाहिजे त्याशिवाय आपले व्रत पूर्ण होत नाही. जर आपल्या विवाहिक जीवनात काही समस्या असतील तर वटपूर्णिमा ह्या दिवशी काही उपाय केले पाहिजे त्यामुळे पती पत्नी मधील संबंध सुधारतील व प्रेम वाढेल.

वट पूर्णिमा ह्या दिवशी पतीची आर्थिक प्रगती, चांगली नोकरी, प्रमोशन किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी उपाय करा. पतीला पूर्व किंवा पश्चिम दिशेला उभे करून उजव्या हातात मूठ भर तांदूळ घेऊन डोक्या पासून पाया पर्यन्त 7 वेळा उतरा करा. त्यामुळे पतीला लागलेला नजर दोष जाऊन प्रगती होईल.

मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, विवाहात अडथळे येत असतील किंवा नोकरी, व्यवसायात प्रगती होत नसेलतर वर दिलेला उपाय आपण करू शकता. त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील.
वट पूर्णिमा ह्या वर्षी सोमवारी आहे तर हा उपाय आपण सकाळी किंवा रात्री करू शकता. पती-पत्नी दोघांनी शिव मंदिरात जाऊन शिव लिंगवर जल अर्पित करायचे आहे मग मूठभर तांदूळ किंवा हिरवे मुग अर्पित करायचे आहेत मग साखर अर्पित करायची आहे. त्यानंतर आपली मनोकामना सांगून नमस्कार करून घरी यावे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.