Shravan Maas 2026 | What To Do & What Not To Do? 4 Shravan Somwar, Shivmuth, Puja & Mantras

Shravan Maas 2026
Shravan Maas 2026 Full Information | 4 Somwar Shivmuth, Puja Vidhi, Mantra & Rules

Shravan Maas 2026 Full Information | 4 Somwar Shivmuth, Puja Vidhi, Mantra & Rules

श्रावण मास काय करावे? काय करू नये? किती सोमवार शिवमूठ कोणती? व मंत्र कोणते म्हणावे? संपूर्ण माहिती

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व आहे. श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो व तो भगवान शिव ह्यांना समर्पित आहे. ह्या महिन्यात धार्मिक कार्य, व्रत, पूजा अर्चा व साधना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो.

श्रावण महिन्याची सर्वजन अगदी आतुरतेने वाट पहात असतो. श्रावण महिन्या चालू होण्याच्या आतच महिला घराची साफ सफाई करतात, रोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजा समोर सडा रंगोली काढतात. ह्या महिन्यात प्रतेक दिवसाचे काहीना काही महत्व आहे त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोतच. श्रावण महिन्यात महिलांचा आवडतीचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार, आवडतीचा सण नाग पंचमी, नारळी पूर्णिमा, राखी पूर्णिमा, गोकुळाष्टमी तसेच नवीन लग्न झालेल्या मुलीची मंगळागौर अगदी दणक्यात साजरी करतात.

श्रावण महिन्यात पाऊस असतो त्यामुळे छान निसर्ग हिरवी चादर पांघरून बसलेला असतो झाडांना छान पालवी येते त्यामुळे पक्षी आनंदी होऊन किलबिलाट करतात एकंदरीत खूप छान आनंदी वातावरण असते.

श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांची आराधना विशेष महत्वाची फलदायी मानली जाते. ह्या महिन्यात भगवान शिव ह्यांना जल अभिषेक, बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पित केले जाते. त्यामुळे पुण्य मिळते. असे म्हणतात की ह्याच महिन्यात समुद्रमंथन च्या वेळी भगवान शिव ह्यांनी विष प्राशन करून संपूर्ण संसाराची रक्षा केली होती.

आपण पाहू या:
1. श्रावण महिन्यात काय करावे?
2.काय करू नये?
3. श्रावण सोमवारची माहिती
4. श्रावण महिन्यात पूजा कशी करावी?
5. श्रावण महिन्यात मंत्र कोणते म्हणावे?

1. श्रावण महिन्यात काय काय करावे?
अ. रोज नियमित भगवान शिव ह्यांची पूजा करा
सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करा.
शिव लिंग वर जल, दूध, दही, मध, शुद्ध जल नी अभिषेक करा जर ह्या वस्तु नसलीत तर फक्त शुद्ध जल अभिषेक करा.
मग बेल पत्र, आक, धतुरा, भस्म, फूल-फळ अर्पित करा.
“ॐ नमः शिवाय” ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करा.
ब. श्रावण सोमवारचे व्रत करा.
श्रावण महिन्यातील प्रतेक सोमवारचे व्रत करा. ह्या दिवशी भगवान शिव ह्यांची विशेष पूजा अर्चा करून संपूर्ण दिवस फलाहार ठेवून संध्याकाळी आरती भोग दाखवून मग उसवास सोडा.
क. दान-पुण्य करा:
गरीब लोकांना अन्न, वस्त्र, जल दान करा.
मंदिरात जाऊन भगवान शिव ह्यांना रुद्राभिषेक व जलाभिषेक करा.
ड. सात्विक जीवनशैली आचरणात आणा:
श्रावण महिन्यात आपली जीवनशैली नियमित ठेवा.
नित्य हवन, भजन-कीर्तन व धार्मिक ग्रंथ पठन करा.
कोणची निंदा करू नये, खोटे बोलू नये, राग राग करू नये.
इ. रुद्राष्टक, शिव चालीसा किंवा महामृत्युंजय मंत्र रोज किंवा सोमवारी तरी म्हणा.
त्यामुळे मानसिक शांती मिळून नाकारात्मकता पासून मुक्ती मिळते.

2. श्रावण महिन्यात काय करू नये?
अ. मास-मदिरा सेवन करू नये. श्रावण महिन्यात विशेष करून हे वर्जित आहे. ते आपले शरीर अ आत्मा दोन्ही अशुद्ध करते.
ब. कांदा-लसूण व तामसी भोजन करू नये. सात्विक आहार करावा त्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते.
क. काळे कपडे परिधान करू नये. ह्या महिन्यात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अशुभ मानले जाते. पांढरे किंवा पिवळे किंवा सोबर रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
ड. शिवलिंग वर हळदी लाऊ नका. श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांना हळद लावणे वर्जित असते. कारणकी हळद देवी पूजाची वस्तु आहे.
इ. रात्रीच्या वेळी शिवलिंगवर जल अर्पित करू नये. जल अभिषेक फक्त सकाळी किंवा दुपारी करावा.

3. श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती: ह्या वर्षी श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत.
पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्यादिवशी शिवमूठ तांदूळ आहेत. तसेच ह्या दिवशी नाग पंचमी सुद्धा आहे.

Shravan Maas 2026
Shravan Maas 2026 Full Information | 4 Somwar Shivmuth, Puja Vidhi, Mantra & Rules

दूसरा सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे त्यादिवशी शिवमूठ तीळ आहे. (तेव्हा 23 ऑगस्ट 2026 रविवार रोजी काही ठिकाणी एकादशी आहे. तर 24 ऑगस्ट रोजी काही भागात भागवत एकादशी आहे)

तिसरा सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्यादिवशी शिवमूठ मुग आहेत तसेच ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे.

चौथा सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी आहे त्या दिवशी शिवमूठ गहू आहे तसेच ह्या दिवशी एकादशी आहे.

4. आता आपण पाहू या श्रावण महिन्यात पूजा विधी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची.
सकाळी स्नान करून साफ कपडे परिधान करा
घरातील देव घरात शिव लिंग स्थापित करा. किंवा फोटो ठेवा.
मग भगवान शिव ह्याची पूजा अर्चा करून भगवान शिव ह्यांचा “ॐ नमः शिवाय” मंत्र जाप करा.
शिवलिंगवर जल, बेलपत्र, दूध अर्पित करा.
तुपाचा दिवा व अगरबत्ती लावा.
गणेश भगवान व भगवान शिव ह्यांची आरती करा.
श्रावण महिन्यात नियमित विधी पूर्वक शिव आराधना केल्याने आपल्या जीवनात प्रगती होते, आध्यात्मिक लाभ होतात, मानसिक शांती, स्वास्थ व सुख-समृद्धी प्राप्त होते, म्हणून श्रावण महिन्यात शिव आराधना जास्तीत जास्त करा.
**श्रावण मास च्या सर्वांना शुभकामनाएं – हर हर महादेव!**

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.