Jade Plant Vastu Tips | Best Direction To Place Jade Plant For Wealth, Prosperity & Positive Energy
वास्तु शास्त्र: जेड प्लांट (क्रॅसुला ओवाटा)एक नवीन प्रभावी ट्रेंड,महत्व, लाभ व योग्य दिशा, घरात लावल्याने मिळेल कुबेर खजाना
जेड प्लांट हे शुभ झाड मानले जाते. आता ह्याची नवीन ट्रेंड आली आहे. वास्तु शास्त्रा नुसार ह्या झाडाचे विशेष महत्व व विशेष स्थान आहे. त्यामुळे समृद्धी, धन व सकारात्मक ऊर्जा येते. हे एक झाडांची पाने गोल छोटी छोटी रसभरी असतात. म्हणजे आपल्या पैशाच्या सिक सारखे असतात. जेड प्लांट घरात लावल्याने त्याचे काय फायदे आहेत, कोणत्या दिशेला लावावे व त्याची काळजी कशी घ्यायची ह्याची संपूर्ण माहिती पाहू या. जेड प्लांट हे 100 वर्ष जीवंत राहू शकते जर आपण त्याची योग्य काळजी घेतली तर. वास्तु शास्त्र नुसार घरात पशुभ प्लांट लावल्यानी त्याचे खूप फायदे मिळतात.
वास्तु शास्त्र नुसार जेड प्लांट चे महत्व:
जेड प्लांट ची वास्तु दिशा व त्याचे लाभ काय आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला समजले पाहिजे की जेड प्लांट चे महत्व काय आहे.
पांढऱ्या कुंडीमद्धे जेड प्लांट लावणे शुभ आहे.
धनाचे प्रतीक: जेड प्लांटची पाने छोटी गोलाकार असतात व ती आपल्या पैशाच्या कॉईन प्रमाणे दिसतात ती धनाचे प्रतीक मानले जाते. जेड प्लांट हे आर्थिक लाभ आकर्षित करण्यासाठी एक शक्तिशाली रोप आहे.
ऊर्जा वाढते: वास्तु शास्त्रा नुसार स्वस्थ झाडे नकारात्मक ऊर्जा नष्ट करून शांती व सदभावची भावना वाढवण्यास मदत करतात. जेड प्लांट आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह वाढवतात.
विकास व नविनी करणाचे प्रतीक: जेड प्लांट हे झाड सदाबहार आहे त्यामुळे आपल्या जीवनात निरंतर विकास, नविणीकरण व स्थिरताचे प्रतीक आणते.
संतुलनचे तत्व: जेड प्लांट हे रसेली आहे म्हणजेच पानेदार आहे जे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. जे आपली राहण्याची जागा स्थिर, आधार व सुरक्षाची भावना निर्माण करते.
वास्तु शास्त्रानुसार जेड प्लांट लावण्याचे लाभ:
जेड प्लांट ला नेहमी मनी प्लांट च्या नावानी ओळखले जाते. कारणकी ते धन आकर्षित करण्यासाठी मदत करते. पण जेड प्लांट चे अजून काही लाभ आहेत.
धन व सफलताला आकर्षित करते: जेड प्लांट दक्षिण-पूर्व दिशेला (धनाचा कोना) ठेवल्याने आर्थिक समृद्धी, करियरमध्ये उन्नती व व्यापारात सफलता मिळण्यसाठी मदत करते.
सौभाग्य व नवीन अवसर मिळण्यासाठी लाभदायक: जेड प्लांट सौभाग्य व नवीन अवसर मिळण्यासाठी सकारात्मक परिणाम ना आमंत्रित करते.
सामंजस्य व नातेसंबंध मध्ये सुधार होण्यास मदत करते: जेड प्लांटमध्ये शांत करणारी ऊर्जा आहे. जेड प्लांटची ऊर्जा शांती पूर्ण वातावरण व एकमेकांमधील संबंध सुधारण्यास मदत करते. ते व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात नाते संबंध सुधारते.
मानसिक स्पष्टता व एकाग्रता वाढण्यास मदत करते: आपल्या कामाच्या जागी जेड प्लांट ठेवल्यास एकाग्रता वाढते, निर्णय घेण्याची क्षमता व उत्पादकता वाढते.
नकारात्मक ऊर्जा पासून सुरक्षा मिळते: जेड प्लांट एक सुरक्षा कवच सारखे काम करते. जे नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आर्थिक नुकसान व संघर्ष होण्या पासून बचाव करते.
वास्तु शास्त्रा नुसार जेड प्लांट ठवण्याची दिशा कोणती:
वास्तु शास्त्रा नुसार कोणती सुद्धा वस्तु ठेवण्याची योग्य दिशा असते. त्यामुळे त्याचे लाभ मिळून दुष्परिणाम होण्या पासून बचाव होतो.

बहुरंगी जेड प्लांट
दक्षिणपूर्व दिशा (धन व समृद्धि):
दक्षिण-पूर्व दिशेला धनाचा कोना मानला जातो. कारणकी ह्याच संबंध शुक्र ग्रह व अग्नि तत्वशी आहे, जो धन, विलासिता, व आर्थिक विकासचे नियंत्रण करतो. दक्षिण-पूर्व ह्या दिशेला जेड प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी, व्यापारात सफलता, व स्थिरता प्राप्त होते. हॉल मध्ये म्हणजेच बैठकीच्या खोलीत दक्षिण-पूर्व दिशेच्या कोनामद्धे, ऑफिसमध्ये स्वागत कक्ष किंवा कॅश काऊंटर च्या जवळ जेड प्लांट लावणे शुभ आहे.
पूर्व दिशा (स्वास्थ्य व विकास): पूर्व दिशा ही सूर्याशी जोडली गेली आहे. सूर्य नवीन सुरुवात, स्वास्थ व स्फूर्ति चे प्रतीक आहे. ह्या दिशेला जेड प्लांट ठेवल्याने स्वास्थ्य, शांति व सद्भावचे प्रतीक मानले आहे. तसेच व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनात विकास होण्यास प्रोत्साहन मिळते. एकाग्रता व उत्पादकता वाढण्यासाठी जेड प्लांट वर्क डेस्क किंवा स्टडी टेबलवर ठेवा.
वास्तु शास्त्रा नुसार जेड प्लांट कोठे ठेवू नये किंवा अयोग्य दिशा कोणती?
वास्तु शास्त्रा नुसार जेड प्लांट कोठे ठेवावे म्हणजे त्याची योग्य दिशा कोणती ह्याची माहिती घेतल्यावर ते कोण कोणत्या ठिकाणी ठेवू नये ज्याने त्याचा नकारात्मक प्रभाव होणार नाही.
वास्तु शास्त्रा नुसार उत्तर दिशा ही जेड प्लांट ठेवण्यास अयोग्य आहे, पण ही दिशा करियरशी जोडली गेली आहे. पण उत्तर दिशेला जेड प्लांट ठेवल्याने प्रगती व उन्नतीमध्ये बाधा येऊ शकतात.
आपण जेड प्लांट बेडरूम मध्ये ठवता काम नये. कारणकी जेड प्लांटची सक्रिय ऊर्जा मानसिक शांती भंग करू करून बेचैनी वाढवू शकते.
आपण जेड प्लांट बाथरूम किंवा शौचालयमध्ये ठेऊ नये.
जेड प्लांट लावण्याचे वास्तु संबंधीत टिप्स:
आपण जेड प्लांट लावताना काही गोष्टी लक्षात घेतल्यातर त्याचे अजून चांगले लाभ आपल्याला मिळू शकतात.
फूल असणारे जेड प्लांट:
जेड प्लांट ला नेहमी हिरवे-गार जीवंत ठेवावे त्याची सुकलेली पाने नाकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात.
धन ऊर्जा वाढण्यासाठी लाल, सोनेरी रंगाच्या कुंड्या किंवा भांड्याचा वापर करावा.
त्याच्या ऊर्जाचा प्रवाह चांगला राहण्यासाठी आपल्या डोळ्याच्या स्तरावर ठेवा.
जेड प्लांटला अधिक पाणी म्हणजे रोज पाणी घालणे टाळावे त्याला अप्रत्यक्ष उन्हामध्ये ठेवा म्हणजे त्यावर डायरेक्ट उन्हाची किरण येता कामा नये.
जेड प्लांटची काळजी कशी घ्यावी?
आपण जेड प्लांट ठेवण्याची दिशा त्याचे लाभ काय आहेत ते पाहिले. आता आपण पाहू या त्याची काळजी कशी घ्यावी.
सूर्य प्रकाश: जेड प्लांट ला सूर्य प्रकाशाची आवश्यकता आहे तर ते अश्या ठिकाणी ठेवा की त्याला कमीत कमी 4 तास सूर्य प्रकाश मिळेल.
पाणी: जेड प्लांटची पाने स्वतः पाणी शोषून घेतात. म्हणून त्याला सारखे सारखे पाणी घालू नये. अधिक पाणी टाकल्याने त्याची मुळे सडू शकतात. त्याला काही अंतरांनी पाणी टाकत जा. जास्त पण नाही किंवा कमी सुद्धा नाही.
तापमान: जेड प्लांट प्रतेक तापमानात जीवंत राहू शकते. पण तापमाना नुसार त्याची काळजी घ्या. गरमी मध्ये नियमित पाणी टाका व मान्सून मध्ये जेड प्लांट घरात ठेवा.
खत टाकणे: जेड प्लांट ला प्रतेक महिन्यात पाण्यात मिक्स करून थोडेसे खत
टाका.
जेड प्लांट घरात सुख समृद्धी व स्थिरता आणणारे लोकप्रिय प्लांट मानले जाते. ह्या छोट्याश्या रोपाचे अनेक लाभ आहेत. आपण जेड प्लांटचे महत्व, लाभ, व वास्तु शास्त्रा नुसार दिशा कोणती ते पाहिले. त्यामुळे आपल्याला त्याचे भरपूर लाभ सुद्धा मिळतील.
वास्तु व फेंगशुई अनुसार तुळशी व जेड प्लांट सर्वात अधिक भाग्यशाली मानले जाते. तुळशी घरात सकारात्मक ऊर्जा व आरोग्य आणते तर जेड प्लांट धन, सफलता व सौभाग्यचे प्रतीक मानले जाते.
जेड प्लांट ची गोल गोल कॉईन सारखी पाने लाभ व समृद्धी आणते. ते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस ठेवणे खूप शुभ मानले जाते.
