Dev Uthani Ekadashi 2026: 20 or 21 November? 5 Powerful Remedies for Wealth, Prosperity & Good Fortune | Puja Muhurat & Paran Time
देवउठनी एकादशी 20 की 21 नोव्हेंबर 2026? पूजा मुहूर्त, पारण वेळ व सुख-समृद्धीसाठी 5 चमत्कारी उपाय!
आता देव उठनी एकादशी आहे. देवउठनी एकादशी 20 का 21 नोव्हेंबर 2026 कधी आहे, महत्व,पूजा मुहूर्त, पारण वेळ व 5 अचूक सुख-समृद्धी व सौभाग्य साठी उपाय कोणते आहेत.
पंचांग अनुसार देवउठनी एकादशी दर वर्षी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्ष एकादशी तिथी ला साजरी करतात. त्यालाच देवोत्थान एकादशी व प्रबोधिनी एकादशी असे संबोधले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान विष्णु 4 महिन्यानंतर योगनिद्रा मधून जागे होतात. त्याच बरोबर चातुर्मास समाप्ती होते व विवाह व अजून काही मंगलकार्य होण्यास सुरुवात होते. देवउठनी एकादशीला बरेचजण व्रत करतात व त्याच बरोबर जीवनात सुख-समृद्धीसाठी काही अचूक उपाय करतात.
पंचांग अनुसार देवउठनी एकादशी चे पावन पर्व स्मार्त व गृहस्त संप्रदाय लोक 20 नोव्हेंबर ला साजरी करतात तर 21 नोव्हेंबर रोजी वैष्णव संप्रदायचे श्रद्धालु लोक साजरी करतात. शास्त्रामध्ये देवउठनी एकादशीचे विशेष महत्व आहे. कारणकी ह्या दिवशी भगवान विष्णु 4 महिन्यानंतर योगनिद्रा मधून जागे होतात व चातुर्मास समाप्ती सुद्धा होऊन मंगलकार्य होण्यास आरंभ होतो. त्याच बरोबर भगवान शालिग्राम व माता तुळशी ह्यांचा विवाह करण्याची परंपारिक पद्धत आहे.
देवउठनी एकादशी 2026 तिथी व पारण वेळ:
एकादशी तिथी आरंभ: 20 नोव्हेंबर 2026 सकाळी 07:15 मिनिट
एकादशी तिथी समाप्त: 21 नोव्हेंबर 2026 सकाळी 06:31 मिनिट
स्मार्त व्रत तारीख: 20 नोव्हेंबर 2026, शुक्रवार
व्रत पारण वेळ: 21 नोव्हेंबर 2026 दुपारी 01:11 मिनिट ते 03:18 मिनिट
देवउठनी एकादशी 2026 शुभ मुहूर्त:
देवउठनी एकादशी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:45 मिनट ते दुपारी 12:28 मिनट
देवउठनी एकादशी धार्मिक महत्व:
देवउठनी एकादशीला चातुर्मास समाप्तीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रा मधून जागे होतात. मग तुळशी विवाह झाला की काही धार्मिक विधी किंवा विवाह विधी सुरू होतात. ह्या दिवशी भक्त आपल्या परिवारांच्या सुख-समृद्धीसाठी व खुशालीसाठी भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा करतात.
देवउठनी एकादशीच्या दिवशी करा 5 अचूक उपाय:
1. आर्थिक सुख-समृद्धिमद्धे वृद्धी होण्यासाठी ह्या दिवशी तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावावा व भोग म्हणून बत्तासे अर्पित करा. त्याच बरोबर भगवान विष्णु ह्यांची विधिपूर्वक पूजा करा तसेच पूजा करताना काही कॉईन व कवड्या ठेवा, पूजा पूर्ण झाल्यावर कवड्या व कॉईन आपल्या तिजोरीमध्ये ठेवा.
2. जीवनात सौभाग्य टिकून राहण्यासाठी देवउठनी एकादशी ह्या दिवशी तुळशीच्या रोपावर लाल रंगाची ओढणी व श्री विष्णु भगवान ह्यांना एकाक्षी नारळ अर्पित करा.

3. आपल्या जीवनात खुशाली राहण्यासाठी ह्या दिवशी पंजीरीचा प्रसाद बनवा व त्यामध्ये केळ्याचे तुकडे व तुळशी पत्र घाला, मग भगवान विष्णु ह्यांची विधिपूर्वक पूजा करून हा भोग अर्पित करा. मग बाकी प्रसाद घरातील लोकांना वाटा.
4. आर्थिक म्हणजेच पगार वाढण्यासाठी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना हळदीचा टीका लावावा व तुळशी पत्र अर्पित करून त्यांची पूजा करा.
5. आपल्या वैवाहिक जीवनात परेशानी चालू आहेत. तर ह्या दिवशी पती-पत्नी दोघांनी मिळून दक्षिणवर्ति शंख मध्ये जल भरून श्री विष्णु भगवान ह्यांना अर्पित करावा, जर आपल्या मुलीच्या लग्नात काही अडचणी येत आहेत तर ह्या दिवशी पांच तुळशी पत्र घेऊन त्यावर हळदीचा टीका लाऊन श्रीहरी ह्यांना अर्पित करा.
