Kartik Month 365 Wicks Diya: When & How to Light It? Get Blessings and Spiritual Merit for the Whole Year! In Marathi

Kartik Month 365 Wicks Diya
Kartik Month 365 Wicks Diya: When & How to Light It? Get Blessings and Spiritual Merit for the Whole Year!

कार्तिक महिन्यात 365 वातींचा दिवा कसा बनवावा,कधी व कसा लावावा? वर्षभराचे पुण्य मिळवण्याची खास पद्धत!

Kartik Month 365 Wicks Diya: When & How to Light It? Get Blessings and Spiritual Merit for the Whole Year!

आता कार्तिक मास आरंभ झाला आहे. कार्तिक मास मध्ये 365 वातीचा दिवा लावणे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. संपूर्ण वर्ष रोज दिवा लावणे ही एक आध्यात्मिक पुण्य प्राप्त करण्यासाठी करतात.कार्तिक मास आरंभ 10 नोव्हेंबर 2026 ते 10 डिसेंबर 2026 समाप्ती होत आहे.

दिवा लावण्याचे आध्यात्मिक महत्व:
1. संपूर्ण वर्षाचे पुण्य: 365 वातीचा दिवा म्हणजे दिवसाची एक वात असे 365 दिवसांची एक वात ह्याचा दिवा असे त्याचे प्रतीक आहे. 365 वातीचा एक दिवा लावल्याने प्रवास, आजारपण किंवा आपली रोजची धकाढकीचे जीवन ह्यामध्ये आपण रोह दिवा लावणे शक्य नसेलतर एकदाच 365 वातीचा एक दिवा लाऊन त्याची भरपाई करू शकता.

2. विष्णु व लक्ष्मीचा आशीर्वाद: कार्तिक महिना भगवान विष्णु व माता लक्ष्मीला समर्पित आहे, ह्या महिन्यात दीपदान केल्याने घरात समृद्धी येते, नकारात्मक ऊर्जा दूर होते व सुख-शांतीचा वास राहतो.

3. पितरांची शांती: कार्तिक मास मध्ये दीपदान केल्याने दिवंगत पूर्वज (पितर) ह्यांना शांती मिळते व व्यक्तीचा आध्यात्मिक मार्गाचा अंधकार दूर होतो.

सर्वात शुभ दिवस 2026 मध्ये:
आपण कार्तिक मासमध्ये कोणत्या सुद्धा दिवशी संध्याकाळी 365 वातीचा दिवा लाऊ शकता. पण काही तिथीचे आध्यात्मिक महत्व सर्वाधिक असते.
1. भीष्म पंचक (20 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2026): पूर्णिमाच्या अगोदर शेवटचे पाच दिवस ही अनुष्ठान करण्यासाठी सर्वात शक्तिशाली व फलदायी मानले जाते.

2. देवउठनी एकादशी (20 नोव्हेंबर 2026) तुलसी विवाह (21 नोव्हेंबर 2026): ह्या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रा मधून जागे होण्याचे प्रतीक आहे. व तुळशीच्या रोपा जवळ दीपदान करणे सर्वात शुभ आहे.

3. कार्तिक पूर्णिमा / देव दिवाळी (24 नोव्हेंबर 2026): पंचांग अनुसार कार्तिक पूर्णिमा तिथी 23 नोव्हेंबर 2026 रात्री 11:42 मिनिट पासून आरंभ होत असून 24 नोव्हेंबर 2026 रात्री 8:23 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून मंगळवार 24 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी दीपदान करणे उत्तम दिवस आहे.

4. अमांत कार्तिक अमावस्या (8 डिसेंबर 2026) महाराष्ट्र, गुजरात किंवा दक्षिण भारतीय पंचांग आचरणात आणणारे लोक कार्तिक महिन्यात सोमवार, एकादशी किंवा कार्तिक मास मधील शेवटचा दिवस ह्या दिवशी दीपदान करतात.

365 वातीचा दिवा घरी कसा बनवावा:
कच्चा धागा किंवा पवित्र लाल-पिवळा धागा म्हणजेच त्याला कलवा असे म्हणतात त्याचा उपयोग करून आपण आपल्या हातानी घरीच वात बनवू शकतो.

1. धागा मोजून घ्या: पहिल्यांदा आपण पाहून घ्या तुमच्या कडे जो धागा आहे किंवा कलवा आहे त्यामध्ये किती धागा घेऊन एक धागा बनवला आहे. त्याची एक लड घ्या.

2. धागा गुंडाळून घ्या: धागा घेऊन आपल्या हाताच्या चार बोटा भोवती गुंडाळून ते एकूण 365 धागे होतील ते पहा. म्हणजे एक उदाहरण पाहू या एका कलवा मध्ये 5 धागा मिळून एक धागा बनवला असेलतर 73 वेळा आपल्या हाताच्या चार बोटावर गुंडाळा (5 x 73 = 365) जर आपण सिंगल धागा म्हणजे एक सुताचा धागा वापरणार असाल तर 183 वेळा बोटांवर गुंडाळा मग एका बाजूनी कापा पान ही 366 धागे होतील मग त्यामधील एक धागा कमी करा.

3. मग धाग्याला वातीचा आकार द्या: आता बनवलेली वात घेऊन खालील भागाला थोडे दाबून त्याला मजबूत बनवा व वरच्या बाजूच्या वाटीला थोडे विरळ करा. म्हणजे वात तेल किंवा तूप शोषून घेईल.

टप्या टप्याने (स्टेप बाय स्टेप) पूजाविधी:
1. दिवा (पात्र) कोणते घ्यावे: एक मातीचा मजबूत मोठा दिवा (पणती), पितल्याचा दिवा, किंवा सुके खोबरे वाटी चा उपयोग करा. पण तो दिवा थोडा खोलगट पाहिजे. म्हणजे त्यामध्ये भरपूर तेल किंवा तूप मावेल.

2. गाईचे तूप किंवा तेल घ्या: दिव्यामध्ये गाईचे शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल भरा. भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा करताना गाईचे तूप श्रेष्ठ मानले जाते. पण थंडीमद्धे तिळाचे तेल पारंपारिक रूप म्हणून शुभ मानले जाते.

3. दिवा ठेवण्यासाठी जागा करा: दिवा पेटवल्यावर कधी सुद्धा सरळ जमिनीवर ठेवू नये. दिव्याच्या खाली (तुटलेले तांदूळ ठेवू नये) अक्षता, तीळ किंवा फुले ठेवून त्याचे एक आसन बनवून मग ठेवावा.

4. वेळ: ही अनुष्ठान करताना प्रदोष काळ (सूर्यास्त नंतर लगेच म्हणजेच संध्याकाळी 5:30 मिनिट पासून 7:45 मिनिट ह्या वेळेत करावे.

5. दीप लावणे व प्रार्थना: दिवा घेऊन त्याला बाजूला हळद-कुंकू लावावे, मग वात लाऊन पुढे दिलेला मंत्र म्हणावा.
मंत्र: “ॐ नमो भगवते वासुदेवाय”

Kartik Month 365 Wicks Diya
Kartik Month 365 Wicks Diya: When & How to Light It? Get Blessings and Spiritual Merit for the Whole Year!

दिवा ठेवण्याची सर्वात योग्य जागा:
365 वातीचा मोठा दिवा लावल्यावर तो तेज ज्वाला उत्पन्न करतो. म्हणूनच त्याला सुरक्षित जागी मोकळ्या व हवेशीर स्थानावर ठेवावा.

आपन 365 वातीचा दिवा कोठे कोठे ठेवू शकता:
1. तुळशीचे रोप: आपल्या अंगणातिल किंवा बाल्कनी मधील तुळशीचे रोप जेथे आहे तेथे हा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते.

2. मंदिर किंवा पवित्र वृक्ष: आपण हा दिवा विष्णु, शिव किंवा राधा-कृष्ण मंदिर किंवा पिंपळाच्या किंवा आवळ्याच्या वृक्षा खाली अर्पित करू शकता.

3. नदी किनारा: आपण पवित्र नदी काठी किंवा तलाव च्या जवळ ठेवू शकता. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी घाटच्या पायऱ्यावर दिवा ठेवणे अत्यंत पवित्र व पुण्यदायी मानले जाते.

4. घराचे मुख्य प्रवेश दार: आपल्याला मंदिर मध्ये जाणे शक्य नसेलतर हा दिवा घरच्या मुख्य प्रवेश दाराच्या उजव्या बाजूला ठेवावा किंवा घरातील पूजा घर मंदिर समजून ठेवावा.

महाराष्ट्र मधील पुणे मधील विशेष वेळ: (24 नोव्हेंबर 2026)
कार्तिक पूर्णिमा मंगळवार 24 नोव्हेंबर 2026 ला पुणे मध्ये सूर्यास्त संध्याकाळी 5:56 मिनिट होईल व दीपदान शुभ वेळ प्रदोष काळ वेळ संध्याकाळी 5:56 मिनिट पासून रात्री 8:23 मिनिट पर्यन्त आहे.

* सूर्यास्त वेळ: संध्याकाळी 5:56 मिनिट (सूर्य अस्त प्रदोश काळ सुरू होतो)

* पूर्णिमा तिथी समाप्ती वेळ: रात्री 8:23 मिनिट वाजता, संपूर्ण प्रदोश काळ 2 तास 34 मिनिट आहे. पण पूर्णिमा तिथी रात्री 8:23 मिनिट ला समाप्त होत आहे. रात्री 8:23 वाजता 365 वातीचा दिवा लावल्यास सुनिश्चित होते की आपण पूर्णिमा ह्या दिवशी ही अनुष्ठान पूर्ण केले आहे.

• चंद्रोदय का वेळ: संध्याकाळी 5:35 मिनिट (पुणे येथे)

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.