Tulsi Vivah 2026 at Home | Complete Puja Vidhi, Shringar, Samagri, Auspicious Muhurat & 5 Important Mistakes to Avoid! In Marathi

Tulsi Vivah 2026 at Home | Complete Puja Vidhi, Shringar, Samagri, Auspicious Muhurat & 5 Important Mistakes to Avoid!
Tulsi Vivah 2026 at Home | Complete Puja Vidhi, Shringar, Samagri, Auspicious Muhurat & 5 Important Mistakes to Avoid!

तुळशी विवाह 2026 घरी कसा करावा? पूजा साहित्य, तुळशीचा शृंगार, शुभ मुहूर्त व 5 चुका टाळा!

Tulsi Vivah 2026 at Home | Complete Puja Vidhi, Shringar, Samagri, Auspicious Muhurat & 5 Important Mistakes to Avoid!

हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह खूप महत्वपूर्ण मानला जातो. ह्या दिवशी तुळशी माता व भगवान शालिग्राम ह्यांचा विवाह केला जातो. त्यामुळे कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होते. आता आपण तुळशी विवाह ह्या दिवसाची संपूर्ण माहिती पाह्या:

हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह चे विशेष महत्व मानले जाते. असे म्हणतात की तुळशी विवाह लावल्याने कन्यादानचे पुण्य प्राप्त होते. असे केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची विशेष कृपा प्राप्त होते. पंचांग अनुसार कार्तिक मास शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. आपण सुद्धा आपलूया घरी ह्या दिवशी तुळशी विवाह करणार असाल तर पुढे दिलेले साहित्य आवश्यक आहे.

तुलसी विवाह 2026
हिंदू पंचांग अनुसार कार्तिक मास शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला तुळशी विवाह करतात, ह्या वर्षी द्वादशी तिथी 21 नोव्हेंबर 2026 शनिवार सकाळी 06:31 मिनिट ला आरंभ होत असून 22 नोव्हेंबर 2026 सकाळी 04:56 मिनिट ला समाप्ती होत आहे. उदय तिथी अनुसार तुळशी विवाह 21 नोव्हेंबर 2026 शनिवार ह्या दिवशी आहे जर आपण देव उठणी एकादशी ह्या दिवशी तुळशी विवाह करणार असाल तर 20 नोव्हेंबर 2026 रोजी करू शकता.

तुळशी विवाह पूजा साहित्य:
तुळशीचे रोप व एक गमला (कुंडी)
भगवान विष्णु व किंवा शालिग्राम ह्यांची प्रतिमा
लाल, पिवळी चुनरी किंवा वस्त्र
पूजा करण्यासाठी चौरंग व आसन
मंडप सजवण्यासाठी उस व केळ्यांची कुंठ
दक्षिणा व पूजेसाठी कोईन
प्रसाद व भोग साठी मिठाई
तुळशी मातासाठी शृंगार साहित्य
भगवान विष्णु ह्यांच्यासाठी पिवळे वस्त्र
कलश व आंब्याची पाने
फूल, फुलांची माळ व तुळशी पत्र
फळ, मिठाई व पंचमेवा
नारळ व हळदीची गांठ म्हणजेच हळकुंड
रोली, कुंकू, अक्षता व चंदन
गंगाजल व शुद्ध जल
धूप, दीपक, कपूर व तूप
कापसाच्या वाती या अगरबत्ती
पान-सुपारी व लाँग
कलवा व जानव
पंचामृत

तुळशी विवाह 2026 शुभ मुहूर्त:
प्रदोष काल पूजा शुभ मुहूर्त: संध्याकाळी 05:25 मिनिट पासून संध्याकाळी 07:49 मिनिट पर्यन्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी 04:40 मिनिट पासून सकाळी 05:30 मिनिट पर्यन्त
अभिजीत मुहूर्त दुपारी 11:42 मिनिट पासून दुपारी 12:28 मिनिट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त- संध्याकाळी 5:25 मिनट पासून संध्याकाळी 6:13 मिनट पर्यन्त

तुळशी विवाह पूजा विधी:
• तुळशी विवाह ह्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभीत करतात. त्याच्या पुढे सडा रांगोळी काढतात.

• तुळशी वृंदावनच्या वर उसाचा मंडप बांधतात. तुळशीला हळद-कुंकू लावतात. मग तुळशी पुढे आवळा व चिंच ठेवावे.

• मग कलश तयार करावा. त्यासाठी स्वच्छ कलश घेऊन त्यावर चारी बाजूनी हळद-कुंकूची बोटे लावावी. म्हणजेच हळद कुंकुवाची बोटांनी पाच रेघा उमटाव्या. मग कलशमध्ये पाणी, पाच विडयाची पाने व नारळ ठेवावा.

• तुळशी जवळ समई लावावी व गणपतीची प्रतिमा ठेवून हळद-कुंकू लावून फूल वाहून गणेश पूजन करावे.

• मग शालिग्राम घेऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करून तुळशी वृंदावनच्या जवळ ठेवावे.

• तुळशीला हिरवे वस्त्र, फुलाची वेणी व कापसाचे वस्त्र वाहावे. नंतर तुळशीच्या वर लाल रंगाचे छोटेसे वस्त्र घालावे. तुळशीला पाणी घालून वाटी बांगडी, सौभाग्य अलंकार घालावे.

• मग शंख पूजन करून हळद-कुंकू वाहून फूल अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा.

• तुळशीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड, अक्षता, हळद-कुंकू, पान सुपारी, हळकुंड, बदाम, केळी मोसंबी, व नारळ ठेऊन ओटी भरावी. मग समईचे पूजन करावे. आता तुळशीला मुंडवळ्या बांधाव्या.

• श्री कृष्णाची प्रतिमा घेऊन पूजा करून हळद-कुंकू, अक्षता फुले, हार घालून पूजन करावे. तुळशी वृंदावनला हार घालावा.

• तुळशी वृंदावन समोर एक पाट ठेवून पाटाला सुशोभीत करावे व श्री कृष्णची प्रतिमा ठेऊन मध्ये अंतर पाट ठेवून मंगल अष्टक म्हणावे. आरती म्हणून प्रसाद म्हणून मिठाई, फराल व बतासे वाटतात।

Tulsi Vivah 2026 at Home | Complete Puja Vidhi, Shringar, Samagri, Auspicious Muhurat & 5 Important Mistakes to Avoid!
Tulsi Vivah 2026 at Home | Complete Puja Vidhi, Shringar, Samagri, Auspicious Muhurat & 5 Important Mistakes to Avoid!

तुलसी विवाह च्या दिवशी पुढे दिलेल्या 5 चुका करू नका:
1. तुळशीच्या रोपांची पाने तोडू नयेत:
तुळशी विवाह च्या दिवशी तुळशीच्या रोपांची पाने तोडू नयेत. धार्मिक मान्यता अनुसार द्वादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडणे शुभ मानले जात नाही. पूजेसाठी पाने पाहिजे असतीलतर अगोदरच तोडून ठेवावीत.
2. साफ-सफाई नकरता पूजा करू नका:
तुळशी विवाह च्या अगोदर पूजा जेथे केली जाणार आहे ती जागा अगोदरच साफ करून ठेवा. तुळशीच्या रोपाची कुंडी साफ करून त्याला गेरू लाऊन रंगवून ठेवा. तसेच रोपा जवळील सुद्धा साफ सफाई करून ठेवा. पूजेची जागा रंगोली घालून व फुलांनी सजवून ठेवा.
3. तुळशी मताला बिना शृंगार तसेच ठेवू नये:
तुळशी विवाह च्या दिवशी तुळशी मताला दुल्हन सारखे सजवण्याची परंपरा आहे. लाल चुनरी, फुल व अजून काही शृंगार साहित्य वापरुन सजवा. सगळी तयारी अगोदर करून मगच पूजेला बसा घाई गडबड करून पूजेला बसू नका.
4. पूजेमद्धे शिळी कोमेजलेली फुले व साफ न केलेली भांडी ठेवू नका:
तुळशीच्या विवाहच्या वेळी सर्व साहित्य साफ करून घ्या, शिळी फुले, अस्वछ भांडी घेऊ नका. पूजेसाठी फूल, मिठाई, दिवा व जरूरीचे सामान तयारी करून ठेवा.
5. तुळशीच्या रोपा जवळ जळत असलेला दिवा तसाच सोडू नका:
तुळशी विवाहच्या दिवशी दिवा लावणे शुभ मानले जाते पण दिवा लाऊन त्याला तसेच सोडू नका. कारणकी तुळशी च्या जवळ सजावटीचे सामान व सुकलेली पाने असतात. त्यामुळे आग लागण्याची भीती असू शकते. म्हणून दिवा लावला तर सुरक्षित जागी ठेवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.