Guru Purnima 2026 Special | 21 Days Swami Samarth Seva | Blessings, Peace & Prosperity

Shri Swami Samarth Seva
Guru Purnima 2026 Special | 21 Days Swami Samarth Seva | Blessings, Peace & Prosperity

गुरु पूर्णिमा 2026, 21 दिवसांची ( 9 जुलै ते 29 जुलै)  श्री स्वामी समर्थ ह्यांची प्रभावी सेवा, सर्व मनोकामना पूर्ण होतील 

Guru Purnima 2026 Special | 21 Days Swami Samarth Seva | Blessings, Peace & Prosperity

29 जुलै 2026 बुधवार ह्या दिवशी गुरुपूर्णिमा आहे. गुरुपूर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ व महत्वाचा दिवस आहे. गुरुपूर्णिमा हा दिवशी सर्वजण साजरा करू शकतात. हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे.

गुरु पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या गुरूनची सेवा करायची आहे. मग आपले गुरु श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ आपले गुरु असतील तर आपण त्यांची उच कोटीची सेवा करायची आहे.

गुरु पूर्णिमा ही आषाढ महिन्यात येत आहे. आषाढ महिना हा आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आषाढ महिन्यात आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी गुरु पूर्णिमा आहे. त्यामुळे ही पूर्णिमा खूप महत्वाची आहे. आपल्या जीवनात गुरु हे हवेच त्यामुळे आपले जीवन सुखी होऊ शकते नाहीतर आपले जीवन हे खूप कठीण परिस्थित जाऊ शकते, म्हणून आपण गुरु मानले पाहिजेत.

श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा केल्याने आपल्या जीवनातिल सर्व अडचणी निघून जातील. कारणकी स्वामिना आपल्या जीवनातील अडी अडचणी माहिती असतात त्यांना आपण सांगायची जरूर नाही. त्यांना माहीत आहे आपल्या जीवनात काय कष्ट आहे व पुढे सुद्धा काय होणार आहे. श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा केल्याने लाखों लोकांनी त्यांचे चांगले अनुभव आले आहेत व त्यांच्या मनातील मनोकामना सुद्धा पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच त्यांना प्रचिती आली आहे. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ ह्यांची भक्तीने म्हणजेच मनोभावे सेवा करायची आहे.

29 जुलै 2026 बुधवार ह्या दिवशी गुरुपूर्णिमा आहे. तर आपल्याला 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करायची आहे ही सेवा आपण 9 जुलै ते 29 जुलै पर्यन्त म्हणजेच 21 दिवसांची करायची आहे. पण ह्या 21 दिवसांमध्ये आपली मासिक पाळी आली तर आपल्याला 5 दिवशी सेवा बंद करायची आहे. मग आपले 21 दिवस पूर्ण होणार नाहीत तर आपण 9 जुलैच्या अगोदर 5 दिवस आधीच सेवा सुरू करू शकता किंवा आपल्याला बाहेर गावी जायचे असेल किंवा काही कारणांनी सेवा करणे शक्य नसेलतर आपण अगोदरच सेवा सुरू करू शकता. पण काही वेळेस आपल्या कडे सूतक येतेतर त्या काळात सुद्धा सेवा करू नये, ह्या गोष्टी आपल्याला सांगून येत नाहीत त्या निसर्गाच्या नियमा प्रमाणे घडत असतात.

श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची ते पाहू या.

आपण जेव्हा महाराजांची सेवा करायचे ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. खर म्हणजे आपण सेवा कशा साठी करीत आहोत ते महाराजांना माहीत असते त्यांना काही सांगायची गरज नसते. श्री स्वामीची सेवा खूप जण करीत असत्तात व त्यांना सेवेचा प्रत्यय सुद्धा लगेच येतो फक्त आपण काही सोपे नियम पाळायचे आहेत. व श्रद्धेने सेवा करायची आहे.

आपण 21 दिवसांची सेवा 9 जुलै 2026 पासून सुरू करू शकता, पण आपली अडचण ह्या काळात येणार असेलतर आपण 9 जुलै च्या अगोदर सेवा सुरू करावी.

आपण श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा तीन प्रकारे करू शकता:

पहिली सेवा: 

श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करताना आपण श्री स्वामी समर्थ ह्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय पठन करायचे आहे. ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपण रोज श्री स्वामी चरित्र सारामृत चे 21 अध्याय पठन करायचे आहेत. मग आपण ही सेवा सकाळी लवकर उठून स्नान करून करू शकता किंवा संध्याकाळी देवे लागणीच्या वेळी सुद्धा करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत सेवा करू नये तसेच आपले जेवण करून लगेच सेवा करायला बसू नये. आपण रोज 21 अध्याय पठन केले की आपले एक पारायण झाले असे आपल्याला 21 दिवस पठन करायचे आहे. म्हणजे आपले 21 पारायण करायची आहेत.

जर आपल्याला एकाच बैठकीत 21 अध्याय पठन करणे शक्य नसेल म्हणजे घरात लहान मुले, आजारी माणसे असतील तर एका बैठकीत करणे शक्य नसते तर आपण 7-7-7 असे अध्याय दिवस भरात पठन करू शकता.

पण आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काही कामात असाल किंवा घरात लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील तर आपल्याला एका वेळी 21 आध्याय पठन करणे शक्य नसेलतर किंवा रोज 7 आध्याय पठन करून 3 दिवसांत संपूर्ण सारामृत पठन करू शकता. मग आपले एक पारायण झाले.

आपण रोज 3 आध्याय पठन करून 7 दिवसांत संपूर्ण सारामृत पठन करू शकता. पण आपण जेव्हा पठन करायला आसनावर बसतो तेव्हा तेव्हडे आध्याय पठन झाल्या शिवाय उठायचे नाही. त्यामुळे आधीच तसा संकल्प करा की आपण रोज किती आध्याय पठन करणार ते.

आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 21 आध्याय पठन झाले की आपले एक पारायण पूर्ण झाले. आपण आधीच ठरवा की आपण किती पारायण करू शकता. व तेव्हडे पारायण आपण श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिना पर्यन्त पूर्ण करायचे आहे.

आपन नोकरी करीत असाल किंवा व्यवसाय करीत असला किंवा अजून काही कारणांनी आपल्याला दिवस भरात घरी सेवा करणे शक्य नसेलतर आपण ऑफिस मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वेळ मिळेल तेव्हा सेवा करू शकता पण प्रवास करताना सेवा करू नये.

Shri Swami Samarth Seva
Guru Purnima 2026 Special | 21 Days Swami Samarth Seva | Blessings, Peace & Prosperity

दुसरी सेवा: 

आपण श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करताना “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा पाहिजे तितका रोज 21 दिवस जाप करू शकता, किंवा प्रभावी तारक मंत्राचा सुद्धा रोज पाहिजे तितका जाप करू शकता किंवा आपण स्वामींचे 21 अध्याय रोज पठन करू शकता, व मंत्र जाप सुद्धा करू शकता. आपली जशी इछा असेल तशी आपण सेवा करू शकता. आपल्याला 21 दिवसांची सेवा करताना रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करायचा आहे

तिसरी सेवा:

आपण रोज तारक मंत्र म्हणू शकता.  आपण 21 दिवस तारक मंत्राचे पाहिजे तेव्हडा जाप करू शकता.

श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा मग मंत्र जाप सुरू करा. मंत्र जाप झाल्यावर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तिना तीर्थ महणून द्या किंवा घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यामुळे शारीरिक रोग बरे होण्यास सुद्धा मदत होते.

आपल्याला जेवहडी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवहडी आपण सेवा करायची आहे. सेवा करताना फक्त एक नियम अगदी काटाक्षाने पाळाव्याचा आहे. तो नियम म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. बाकी काही विशेष नियम नाहीत.

आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. आपण संकल्प स्वामींच्या माठात जाऊन करू शकता किंवा घरीच स्वामीच्या समोर बसून सुद्धा संकल्प करू शकता. संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडीसाखर स्वामीच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू करायची आहे.

आता आपण पाहू या संकल्प कसा करायचा.

सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर आसन घालून बसावे व स्वतः ला गंध लाऊन घ्यावे. एका तांब्यात पाणी घ्यावे व ताम्हण व पळी घ्यावी. मग हातात पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करीत आहोत ते सांगावे. मग हातातील पाणी ताम्हणात सोडावे.

आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करायची असेलतर सोपे काही नियम पाळायचे आहेत.

* आपण ही सेवा सकाळी किंवा दिवस भरामद्धे कधी सुद्धा करू शकता. पण आपण रोज शक्यतो रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यावर करणार असालतर रोज सकाळीच करा, किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळी करा, रोज वेळत बदल करू नका.

 

* सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून दिवा व आगरबती लाऊन आसन घालून बसावे. आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देवू नये.

 

* सेवा सुरू केली की मांसाहार करू नये. पण आपल्या घरातील व्यक्तिना पाहिजे असेलतर बनवून द्यावा पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून मगच बनवावा.

 

* सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये जर घरातील व्यक्ति वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे म्हणजे आपल्या सेवे मध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेलतर तेवहडे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेर गावी जाणार असालतर आपण बाहेर सुद्धा वाचन करू शकता. जर आपली मासिक पाळी ह्या 21 दिवसांच्या मध्ये येणार असेलतर आपण ही सेवा 9 जुलै तारखेच्या आता सुरू करू शकता

 

* सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.