3 July 2026 Sankashti Chaturthi | Lord Ganesha’s Blessings For Stuck Work, Business Growth & Wealth
कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी 2026, अडकले आहे सरकारी काम किंवा व्यवसाय, चतुर्थीला करा जरूर हे अचूक उपाय
कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शन, श्री गणेशजिना 21 दूर्वा व मोदक अर्पित करणे खूप शुभ मानले जाते. ह्या दिवशी व्रत ठेवणे व कथा आइकलयाने जीवनातील सर्व संकट व विघ्न दूर होतात.
सनातन धर्मामध्ये भगवान गणेश ह्यांना प्रथम पूज्य मानले जाते. कोणते सुद्धा शुभ कार्यची सुरुवात विघ्नहर्ता गणेशजींच्या आराधनेने केली जाते. हिंदू पंचांग अनुसार प्रतेक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते.
संकष्टी ह्या शब्दाचा अर्थ आहे “संकटांवर मात करणारी” असे म्हणतात की जो भक्त ह्या दिवशी श्रद्धा व नियम पाळून व्रत करेल त्याच्या जीवनातील सर्व बाधा समाप्त होऊन घरात सुख समृद्धीचा वास होतो.
कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी तिथी:
चतुर्थी तिथि प्रारंभ: 3 जुलै 2026 सकाळी 11:21 पासून
चतुर्थी तिथि समाप्त: 4 जुलै 2026 दुपारी 12:40 पर्यन्त
चंद्रोदय वेळ: रात्री 09:51
चला तर मग आपण पाहू या संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्व, पूजा विधी व वास्तु उपाय:
भगवान गणेश व संकष्टी चतुर्थीचा जवळचा संबंध आहे.
भगवान गणेश ह्यांना विघ्नहर्ता व मंगलमूर्ती संबोधले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश उपासना केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणी, मानसिक, शारीरिक व आर्थिक कष्टाचे निवारण होते.
शास्त्रा नुसार वर्षभरातील 12 चतुर्थीचे भगवान गणेश ह्यांच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते ज्याचे महत्व पुढे दिलेले आहे.
वर्षाच्या 12 महिन्याच्या अनुसार गणेशजीनचे स्वरूप:
चैत्र मास (विनायक चतुर्थी): विघ्न नाश व नवीन कार्याची शुभ सुरुवात करण्यासाठी
वैशाख मास (विक्रट चतुर्थी): साहस, आत्मबल व नकारात्मक शक्ति पासून सुरक्षा मिळते
ज्येष्ठ मास (एकदंत चतुर्थी): एकाग्रता, त्याग व ज्ञान च्या प्राप्तीसाठी
आषाढ़ मास (गजानन चतुर्थी): यश, कीर्ति व सामाजिक सम्मान साठी
श्रावण मास (हेरम्ब चतुर्थी): संकटा पासून रक्षा व पारिवारिक सुरक्षा हेतु.
भाद्रपद मास (विघ्नराज चतुर्थी): सर्वाधिक पूज्य, सर्व विघ्ननानचा पूर्ण नाश
आश्विन मास (वक्रतुण्ड चतुर्थी): रोग, भय व मानसिक अशांति पासून मुक्ती मिळण्यासाठी
कार्तिक मास (कुबेर चतुर्थी): धन, ऐश्वर्य व आर्थिक स्थिरता
मार्गशीर्ष मास (लंबोदर चतुर्थी): कर्ज मुक्ति, शांति संतुलित जीवन साठी
पौष मास (द्वैमातुर चतुर्थी): मातृ-पितृ कृपा व पारिवारिक सौहार्द
माघ मास (तिलकुटा चतुर्थी): पुण्य, तप व आध्यात्मिक उन्नतिसाठी
फाल्गुन मास (धूम्रवर्ण चतुर्थी): पाप नाश, ग्रह दोष शांति व आत्मशुद्धि
संकष्टी चतुर्थी व्रत संपूर्ण पूजा विधि:
संकष्टी चतुर्थी व्रत नियम व निष्ठाने करावे.
संकल्प: सकाळी सूर्योदयच्या अगोदर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करावे मग व्रत संकल्प करावा.
उपवास: संपूर्ण दिवस मन शांत ठेऊन उपवास करावा, रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करून मग उपवास सोडावा. आपल्याला व्रत करणे शक्य नसेलतर फलाहार करू शकता.
पूजाविधी: शुभ मुहूर्त वर भगवान गणेश ह्यांची मूर्ती स्थापित करून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फूल, दूर्वा अर्पित कराव्या. लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करावे. मग मोदक भोग म्हणून दाखवावा, तुपाचा दिवा अगरबत्ती लावून मनोभावे पूजा करावी.
कथा व मंत्र: गणेश चालीसा, अथर्वशीर्षचे पठन व गणेश मंत्राचा जाप करावा.
चंद्र दर्शन: हे सर्वात महत्व पूर्ण आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन झाल्यावर व्रत सोडावे , त्याअगोदर चंद्राला अर्ध्य देवून आरती करावी मगच उपवास सोडावा.
संकष्टी चतुर्थी विशेष वास्तु टिप्स:
* वास्तु शास्त्रा नुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात काही सकारात्मक बदल केल्याने भगवान गणेश ह्यांची दुपट्ट कृपा प्राप्त होऊन घरातील वास्तु दोष कायमचा समाप्त होतो.
* गणेशजीनची मूर्ती योग्य दिशेला स्थापित करा: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांची मूर्ती नेहमी घरातील उत्तर-पूर्व दिशा (ईशान कोण) स्थापित करावी. ही दिशा दिवतांसाठी मानली जाते. व त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह वाढतो.
* घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक: ह्या पवित्र दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू व तूप मिक्स करून स्वस्तिक चिन्ह काढा. वास्तु शास्त्रा नुसार घरात नकारात्मक शक्ति प्रवेश करीत नाही.
* अडकलेले पैसे मिळण्यासाठी उपाय: जर आपले कुठे पैसे अडकले आहेत, तर चतुर्थी च्या दिवशी पूजेच्या जागी पिवळ्या रंगाच्या कापडावर गणेशजीनची मूर्ती ठेवा ज्याची सोंड उजव्या बाजूला असावी.
* बसलेली गणेश जीनची मूर्ती किंवा फोटो: घरात नेहमी गणेश जीनची बसलेल्या अवस्थेत मूर्ती किंवा फोटो लावावा. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
मीठ घालून घरात पोंचा मारा: चतुर्थी च्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफ-सफाई करून पोंचा मारताना पाण्यात सेंधा मीठ घालावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

व्रत केल्याचे लाभ व ज्योतिष महत्व:
ज्योतिष शास्त्र अनुसार, संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवल्याने कुंडलीमधील चंद्र व मंगल ग्रह शी जोडले गेलेले दोष शांत होतात. त्यामधील मुख्य लाभ पुढे दिलेले आहेत.
ग्रह शांति: हे व्रत केल्याने मनाची चंचलता दूर होऊन रागावर नियंत्रण राहते.
तनाव पासून मुक्ति: मानसिक व अज्ञात भय पासून मुक्ती मिळते.
सफलता मिळते: व्यापार व नौकरी मधील बाधा दूर होतात.
संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनात सकारात्मक व अनुशाशीत बणण्याचे माध्यम आहे. जर हे व्रत नियम पाळून केलेतर भगवान गणेश आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
चंद्र दोषा पासून मुक्ती: ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पाच्या कृपेने जीवनात सुख-समृद्धी व सौभाग्यचे आगमन होते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रदोष आहे टु ह्या दिवशी व्रत केल्याने निघून जातो व नकारात्मक प्रभाव कमी होतो.
