Nag Panchami 2026 | 17 August Monday | Puja Vidhi, Shubh Muhurat & 5 Powerful Remedies for Kaal Sarp Dosh 

Nag Panchami 2026 17 August Monday Puja Vidhi
Nag Panchami 2026 | 17 August Monday | Puja Vidhi, Shubh Muhurat & 5 Powerful Remedies for Kaal Sarp Dosh

नागपंचमी 2026 विशेष! श्रावण सोमवार + नागपंचमी | पूजा विधी, मुहूर्त आणि कालसर्प दोषासाठी 5 प्रभावी उपाय

Nag Panchami 2026 | 17 August Monday | Puja Vidhi, Shubh Muhurat & 5 Powerful Remedies for Kaal Sarp Dosh 

श्रावण महिना चालू झाला की महिलांचे आवडतीचे सण सुरू होतात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नाग पंचमी होय. 17 ऑगस्ट 2026 सोमवार ह्या दिवशी नाग पंचमी हा सण साजरा करायचा आहे. नाग पंचमी श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी नाग देवताची मनोभावे पूजा करतात. नाग पंचमी हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण आहे. आधल्या दिवशी हातावर छान मेहंदी काढली जाते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी महिला छान नटून थटुन आपल्या मैत्रिणी बरोबर नागाच्या वारुळावर पूजा करायला जातात. पण आता महिला कामा निमिताने दिवसभर घराच्या बाहेर असतात त्यामुळे त्यांना वारुळावर जाऊन पूजा करता येत नाही व तेव्हडा वेळ सुद्धा नसतो.

पण आपण घरीच नाग पंचमीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने झटपट करू शकतो व आपण नाग देवताची पूजा केल्याचा आनंद सुद्धा घेऊ शकतो. आपण एका पांढऱ्या कागदावर नंगाच्या जोडीचे चित्र काढू शकता त्यामध्ये नाग-नगिन व त्यांची दोन बाळ असे चित्र काढून त्याची पूजा करू शकता त्याचा फोटो मी दाखवला आहे, किंवा आपण चौरंगावर साफ कापड घालून त्यावर तांदूळ वापरुन नागाची प्रतिमा काढू शकता व त्याची पूजा करू शकता.

आपण श्रावण महिना चालू झाला की आपल्या घराच्या देव्हाऱ्या जवळ जीवतीचा फोटो लावतो त्याची स्थापना आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा नाग पंचमी ह्या दिवशी करून त्याची पूजा करतो. जीवतीच्या कागदामध्ये सुद्धा नाग देवताची प्रतिमा आहे आपण त्याची सुद्धा मनोभावे पूजा करू शकतो.

नाग पंचमी महत्व:

नाग पंचमी ह्या दिवशी धन समृद्धी मिळण्यासाठी पूजा केली जाते. धार्मिक कारण असे आहे व नाग देवता माता लक्ष्मीची रक्षा करतात. नाग पंचमी ह्या दिवशी नाग देवताची विधी पूर्वक पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच बरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांनी त्यासाठी ह्या दिवशी पूजा अर्चा व उपवास करावा म्हणजे त्याचा दोष कमी होतो. ज्यांच्या स्वप्नात नाग येतात त्यांची ह्या दिवशी नाग दवताची जरूर पूजा करावी. म्हणजे भीती सुद्धा दूर होते. धार्मिक शास्त्रा नुसार ह्या दिवशी 12 नागाची पूजा करतात.

नाग पंचमी पूजाविधी:

1. ज्योतिष शास्त्रानुसार पंचम तिथीचे स्वामी नाग देवता आहेत. ह्या दिवशी अष्ट नागानची पूजा करतात.

2. अष्टनागानची नाव – अनन्त, वासुकि, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट व शंख आहे.

3. ह्या दिवशी जर उपवास करायचा असेलतर आधल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी एकदाच जेवण करावे मग नाग पंचमीह्या दिवशी उपवास करून संध्याकाळी उपवास सोडावा.

4. नाग देवताची पूजा करण्यासाठी लाकडी पाटावर मूर्ती किंवा फोटो ठेवावा मग पूजा करावी.

5. नागाच्या मूर्ती किवा फोटोवर हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पित कराव. मग कच्चे दूध, तूप, साखर मिक्स करून नाग मूर्ती किंवा फोटो समोर अर्पित करावे. तसेच दूर्वा व आघाडाची सुद्धा माळ करून घालतात.

6. नाग देवाची पूजा झाल्यावर आरती उतरवली जाते.

7. मग नाग देवाची कथा आईकतात.

8. बरेच लोक शिव मंदिरमध्ये जाऊन नाग देवताची पूजा करतात.

नाग पंचमी पूजा मुहूर्त :

नाग पंचमी पूजा शुभ वेळ: सकाळी 5:51 पासून 08:29  पर्यन्त पूजा काळ: 2 तास 37  मिनट

अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:59 पासून दुपारी 12:51 पर्यन्त

नाग पंचमी रवी शुभ योग आहे. ह्या वर्षी नाग पंचमीच्या दिवशी दोन विशेष योग येत आहेत. ह्या मध्ये पहिला रवी योग आहे. जो 17 ऑगस्ट सकाळी 5:51 सुरू होत असून सकाळी 8:04 पर्यन्त आहे. मग रवी योग 18 ऑगस्ट सकाळी 4:58 सुरू होत असून 5:52 मिनिट पर्यन्त आहे. ज्योतिष शास्त्रा नुसार रवी योग हा शुभ योग मानला जातो व ह्या काळात कोणते सुद्धा शुभ कार्य करण्यासाठी शुभ वेळ मानली जाते.

नाग पंचमी 17 ऑगस्ट 2026 सोमवार ह्या दिवशी साजरी करायची आहे व ह्याच दिवशी श्रावण सोमवार सुद्धा आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ शुभ योग आहे. नाग देवताची पूजा करण्याच्या बरोबर ह्याच दिवशी ज्यांना कालसर्प योगचा त्रास आहे त्यांनी काही विशेष उपाय केलेतर कालसर्प योगचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

Nag Panchami 2026 17 August Monday Puja Vidhi
Nag Panchami 2026 | 17 August Monday | Puja Vidhi, Shubh Muhurat & 5 Powerful Remedies for Kaal Sarp Dosh

नाग पंचमीच्या दिवशी नाग देवता व भगवान शिव ह्यांची पूजा विशेष मानली जाते. ह्या दिवशी काही सोपे उपाय करून पहा: 

1. शिवलिंगवर दुधानी अभिषेक करा: 

नागराज वासुकीचा संबंध भगवान शिव ह्यांच्याशी जोडला गेला आहे. म्हणून नाग पंचमीच्या दिवशी भगवान शिव ह्यांच्या बरोबर नाग देवताची आराधना करणे शुभ मानले जाते. ह्या दिवशी प्रथम भगवान शिव ह्यांची विधी पूर्वक पूजा करून शिवलिंगवर दुध अर्पित करा. मग महामृत्युंजय मंत्र चा जाप करा. असे केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होऊन मानसिक शांती मिळण्यासाठी मदत मिळेल.

2. पिंपळाच्या वृक्षाचा उपाय: 

नाग पंचमीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाशी जोडले गेलेले उपाय केले जातात. त्यासाठी पिंपळाच्या वृक्षा ला कच्चे दूध अर्पित करा व तुपाचा दिवा लावावा. मग गव्हाचे पीठ, तूप व गूळ वापरुन त्याचे लाडू बनवून अर्पित करा. असे केल्याने कालसर्प योग पासून होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

3. 41 दिवस चंदनाचा तिलक लावावा: 

नाग पंचमीच्या दिवशी कपाळावर चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रा नुसार नाग पंचमी पासून 41 दिवस रोज चंदनाचा तिलक कपाळावर लावल्याने नाकारात्मकता कमी होऊन मन शांत राहण्यास मदत मिळते, हा एक साधा सोपा उपाय आहे जो सहज करता येतो.

4. काळे तीळ व जल मिक्स करून शिवलिंगवर अभिषेक करा: 

नाग पंचमी ह्या दिवशी एका लोटयामध्ये थोडे काळे तीळ व जल घेऊन शिवलिंगवर अभिषेक करा व अभिषेक करताना भगवान शिव ह्यांचे नामस्मरण करा. असे केल्याने ग्रहा संबंधित नकारात्मक प्रभाव शांत होऊन कालसर्प दोष संबंधित त्रास कमी होण्यास मदत होते.

5. चांदीचा नाग-नागिण जोडी अर्पित करा: 

कालसर्प दोष पासून मुक्ती मिळण्यासाठी नाग पंचमीच्या दिवशी नाग-नागिण जोडीची पूजा करा. नाग पंचमी ह्या दिवशी चांदीचा नाग-नागिण आणून शिव मंदिरात जाऊन भगवान शिव ह्यांना अर्पित करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.