July 2026 Two Mrityu Panchak Dates | Exact Time, Rules, Remedies & What to Avoid
जुलै 2026 दोन वेळा मृत्यु पंचक तारीख,वेळ, काय करावे? काय करू नये? कोणते उपाय करावे?
जुलै 2026 मृत्यु पंचक कधी सुरू होत आहे? पंचक म्हणजे काय? पंचक नियम कोणते आहेत? काय करावे? काय करू नये? व मृत्यु पंचकमध्ये कोणते उपाय करावे? ह्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
जुलै 2026 मध्ये परत एकदा मृत्यु पंचकचा संयोग येत आहे. ज्योतिष शास्त्र अनुसार जेव्हा पंचक शनिवारी सुरू होते तेव्हा त्याला मृत्यु पंचक असे म्हणतात, म्हणून बरेच लोक ह्या दिवसाची तिथी, वेळ, व प्रभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. पण प्रतेक व्यक्तीच्या कुंडली मधील ग्रह दशे वर अवलंबून असते.
सनातन व ज्योतिष शास्त्र मध्ये पंचक हे एक विशेष व संवेदनशील वेळ मानली जाते. जेव्हा चंद्र कुंभ व मीन राशीमध्ये गोचर करतो तेव्हा त्या काळाला पंचक असे म्हणतात. ही वेळ शुभ कार्यसाठी चांगली मानली जात नाही.
पंचकच्या काळात बऱ्याच कार्यावर निर्बंध आहेत. जसे की घराचे स्लॅब किंवा छप्पर टाकणे, लाकडाशी जोडले केलेले काम करणे. असे म्हणतात की ह्या वेळेत केलेले काम कधी कधी त्याचे वाईट परिणाम देतात.
पंचक म्हणजे काय?
पंचक म्हणजे चंद्राची जी स्थिति कुंभ व मीन राशी मधून जाते ही वेळ म्हणजे 5 दिवसांची असते.
धार्मिक मान्यता अनुसार ही वेळ थोडी संवेदनशील मानली जाते. म्हणूनच लोक ह्या वेळेत नवीन कार्य सुरू करीत नाहीत.
जुलै 2026 पंचक कधी सुरू होणार व कधी समाप्त होणार:
ज्योतिष पंचांग अनुसार जुलै 2026 म्हणजे दोन वेळा पंचक आले आहे.
पहिले पंचक:
4 जुलै 2026 रात्री 12:48 मिनिट सुरू होत असून 8 जुलै 2026 संध्याकाळी 4 वाजे पर्यन्त आहे.
दुसरे पंचक:
31 जुलै 2026 सकाळी 6: 38 मिनिट ते 4 ऑगस्ट 2026 रात्री 9:54 पर्यन्त
पंचक मध्ये काय करू नये?
पंचकमध्ये काही कार्य करू नये कारणकी ती वेळ अशुभ मानली जाते.
पंचकमध्ये लाकडाचे काम, घास, इंधन एकत्र जाळणे करू नये.
ह्या वेळेत घराचे छत किंवा स्लॅब घालू नये ते अशुभ मानले जाते.
नवीन बेड, पलंग खरेदी करू नये.
दक्षिण दिशाची यात्रा करू नये किंवा ही दिशा यमाची दिशा मानली जाते.
कोणत्या सुद्धा नवीन कार्याची सुरुवात ज्योतीशाशी विचारसारणी केल्या शिवाय करू नये.
पंचकमध्ये काय केले पाहिजे:
खर म्हणजे पंचक हा अशुभ काळ मानला जातो पण ह्या मध्ये काही कार्य केली जाऊ शकतात.
पंचकमध्ये पूजा पाठ व धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते.
जर शुभ नक्षत्र असेलटर साखरपुडा, विवाह किंवा मुंज कार्य करू शकता. पण ज्योतिष सल्ला घेऊन मगच करा.
सरकारी काम किंवा कोर्टची कामे केली जाऊ शकतात.
रक्षाबंधन किंवा भाऊबीज ह्यासारखे सन साजरे केले जाऊ शकतात.
पंचकमध्ये मृत्यू झाला तर काय करावे?
धार्मिक मान्यता अनुसार पंचकमध्ये कोणाचा मृत्यू झालातर काही विशेष दोष लागण्याची भीती असते.
अश्या वेळी दाह संस्कार करताना पाच पिठाच्या बाहुल्या बनवून जळण्यात येतात, त्यालाच पंचक शांती असे म्हणतात. असे केल्याने दोष जर असेलतर त्याचा प्रभाव कमी होतो.

आता आय पाहूया पाच प्रकारचे पंचक कोणते आहेत त्यांचा प्रभाव व आवश्यक उपाय कोणते?
1. रोग पंचक:
जेव्हा पंचक काळ रविवारी सुरू होतो तेव्हा त्याला रोग पंचक असे म्हणतात.
ह्या काळात स्वास्थ संबंधित समस्या होऊ लागतात, व आजारी पडण्याचे चिन्ह दिसू लागते.
यज्ञ, हवन, प्रमुख धार्मिक अनुष्ठान किंवा शारीरिक श्रम करण्यापासून लांब राहावे.
तेव्हा भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करणे व महामृत्युंजय मंत्रचा जाप करणे लाभकारी मानले जाते.
2. राज्य किंवा नृप पंचक:
जेव्हा पंचक काळ सोमवारी ह्या दिवशी येतो तेव्हा त्याला राज्य किंवा नृप पंचक म्हंटले जाते.
सरकारी कार्य, नवीन नोकरी सुरू करण्यासाठी किंवा सरकारी योजनाचे नियोजन करण्यासाठी ही वेळा अशुभ मानली जाते.
जर ह्या काळात कोणते सुद्धा कार्य करणे आवश्यक आहे तर सर्वात पहिल्यांदा गणेश पूजन(गणेश भगवान ह्यांची उपासना) केली पाहिजे.
3. अग्नि पंचक:
मंगळवारी सुरू होणारे पंचक अग्नि पंचक म्हणून म्हंटले जाते.
ह्या वेळात निर्माण कार्य, गृह प्रवेश समारंभ किंवा भूमिपूजन किंवा संपत्ती संबंधित कामे अशुभ मानले जाते.
आग संबंधित दुर्घटना होण्याचा संभव वाढतो. म्हणून ह्या काळात काळजी घेतली पाहिजे.
अग्नि पंचक च्या काळात भगवान हनुमानजीनची पूजा व हनुमान चाळिसा चे पठन केल्याने सुरक्षा प्राप्त होते.
4. चोर पंचक:
जेव्हा पंचक काळ शुक्रवार ह्या दिवशी येतो तेव्हा त्याला चोर पंचक असे म्हणतात.
ह्या काळात प्रवास करणे टाळावे, कारणकी चोरी, धोका किंवा वित्तीय नुकसान होण्याचा संभव वाढतो.
लांबचा प्रवास करण्यापासून सावध राहिले पाहिजे व आपल्या सामानाची काळजी घेतली पाहिजे.
ह्या काळात लक्ष्मी माता व भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होतो.
5. मृत्यु पंचक:
जर पंचक काळ शनिवारी ह्या दिवशी आला तर त्याला मृत्यू पंचक असे म्हणतात.
ह्या काळात विवाह, साखरपुडा, गृह प्रवेश व कोणते सुद्धा शुभ कार्य करणे टाळावे.
मृत्यू पंचक ह्या काळात दुर्भाग्य किंवा दुर्घटना होण्याचा संभव असतो. म्हणून प्रार्थना व चांगले कर्म करावे.
ह्या काळात हवन केले पाहिजे व महामृत्युंजय मंत्र जाप करणे विशेष लाभकारी मानले जाते.
पंचकमध्ये करण्यात येणारे उपाय:
भगवान शिव व विष्णु ह्यांची पूजा करा: पंचकच्या काळात विष्णु सहस्त्रनाम व शिव मंत्र जाप केल्याने शांती मिळते.
दान करा: गरीब व जरूरतमंद लोकाना भोजन, कपडे व धान्य दान करा. त्यामुळे नकारात्मकता कमी होते.
पशुपक्षांना भोजन द्या: पंचकच्या काळात पशू पक्षी ना भोजन देणे पुण्य चे काम मानले जाते.
विशेष अनुष्ठान करा: हवन, रुद्राभिषेक किंवा नारायण पूजा सारखे अनुष्ठान केल्याने पंचकचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
नख किंवा केस कापू नका: परंपरागत पद्धती नुसार पंचक च्या काळात नख किंवा केस कापू नयेत कारणकी ते अशुभ मानले जाते.