Before 15 June 2026 Offer This Vaan to Cow | Adhik Maas Special Remedy for Prosperity & Blessings

Adhik Mass 2026
Adhik Maas 2026 Gau Seva Upay

15 जून आधी गाईला द्या अधिक मासचे वाण | दारिद्र्य दूर होऊन येईल सुख-समृद्धी | Adhik Maas 2026 Gau Seva Upay

Before 15 June 2026 Offer This Vaan to Cow | Adhik Maas Special Remedy for Prosperity & Blessings

आता 15 जून 2026 सोमवार अधिक मास समाप्त होत आहे. त्या अगोदर गाईला नक्की अधिक मासचे वाण द्या, आपले दारिद्रय, गरीबी जाऊन भरभराटीचे दिवस येतील.

अधिक मास मध्ये काय काय करायचे आहे त्याची माहिती आपण ह्या अगोदर पाहिली, तसेच कुलदेवीची ओटी कशी भरायची, आईची ओटी कशी भरायची, 33 दिव्यांचे महत्व काय आहे, ह्याची संपूर्ण माहिती पाहिली.

अधिकमास मध्ये गाईची सेवा करणे व तिला वाण देणे हे खूप महत्वाचे आहे. आपल्याला माहिती असेलच गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात असे म्हणतात, आपण गाईची पूजा करून तिला वाण दिले तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मास मध्ये श्री हरी विष्णु ह्यांची सेवा करतात त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळून सर्व दुख दूर होतात. भगवान विष्णु ह्यांना गाय अत्यंत प्रिय आहे.

आता आपण पाहूया अधिक मास मध्ये गाईला कधी, कसे व कोणते वाण द्यावे.
आपण ज्यादिवशी गाईला वाण देणार त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान करताना त्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकावे त्यामुळे आपले शरीर व मन शुद्ध होईल. मग साफ कपडे परिधान करावे. आपल्या देवघरातील देव स्वछ करावे देवांना हळद-कुंकू, फुले अप्रीत करावीत, दिवा आगरबती लावावी.

आता आपण गाईला वाण देण्यासाठी 30+3=33 पुरणाचे धोंडे बनवावे, धोंडे आकारांनी छोटे असावे व ते उकडून घ्यावे, तळून घेऊ नये. जर आपणाला नोकरी व्यवसायामुळे धोंडे बनवणे शक्यच नसेलतर आपण गाईला तूप लावलेली चपाती किंवा भाकरी किंवा गूळ व चणे किंवा हिरवा चरा देवू शकता, पण धोंडे वाण म्हणून दिले तर अतिउत्तम आहे. धोंडे बनवून झालेकी प्रथम गाईसाठी बाजूला काढून ठेवावे मग देवाला नेवेद्यसाठी बनवावे किंवा धोंडे खाण्यासाठी कोणला बोलावले असेलतर त्यांचे शेवटी बनवावे.

आता आपण पूजेची थाली मध्ये काय काय साहित्य घ्यायचे ते पाहूया. थाली आपण स्टीलची घ्यायची आहे प्लॅस्टिकची नाही, एक लोटा भरून जल, हळद-कुंकू, अक्षता, झेंडूच्या फुलाचा हार, दिवा, अगरबत्ती व धोंडे घ्यायचे आहेत.
आपण हा उपाय कधी सुद्धा करू शकता, आपण गाईच्या गोठ्यात जाऊन प्रथम गाईच्या पायावर पाणी सोडून मग हळद-कुंकू लावायचे आहे. मग कपाळावर हळद-कुंकू अक्षता लावाव्या, गाईला झेंडूच्या फुलांचा हार घालावा. मग गाईला ओवाळावे व आगरबती लाऊन बाजूला ठेवावी. मग केळीच्या पानावर धोंडे गाईली खाऊ घालावेत व तिच्या अंगावरून प्रेमळ पणे हात फिरवून नमस्कार करून प्रार्थना करावी. गाईची पूजा करताना “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा जाप करा. मग घरी यावे.

आपली आर्थिक तंगी असेल किंवा कर्ज झाले असेल किंवा मुले आईकत नसतील किंवा त्यांची अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा नोकरी-व्यवसायात अडचणी येत असतील तर हा उपाय मुलांच्या हातून करून घ्यावा, त्यामुळे मुलांची प्रगती होईल.
गाईची सेवा केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी नष्ट होतात, जर पती-पत्नी मध्ये नाते संबंध नीट नसतील तर ते सुधारलीत. कर्ज झाले असेलतर आर्थिक प्रगती होऊन कर्ज लवकर फिटेल.

Adhik Mass 2026
Adhik Maas 2026 Gau Seva Upay

जर आपल्याला गाईच्या गोठ्यात जाणे जमणार नसेल किंवा आपल्या घराच्या जवळपास गाईचा गोठा नसेलतर आपण आपल्या देवघरात देवांना व गाय-वासरूची मूर्ती असेलतर घरी सुद्धा वाण देवू शकता.

गाय ही पवित्र व शुभ मानली जाते त्यामुळे गाईची सेवा नियमित करा किंवा अधिकमास मध्ये जारून गाईची सेवा करा. आता अधिक मास लवकरच समाप्त होत असून परत 3 वर्ष आपल्याला गाईला वाण देता येणार नाही तर आता दोन दिवस राहिले आहेत तर जरूर हा उपाय करून आशीर्वाद प्राप्त करा.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.