Somvati Amavasya 2026 | Date, Puja Vidhi, Shubh Muhurat & Lakshmi Prapti Upay

Somvati Amavasya 2026
Somvati Amavasya 2026 | Date, Puja Vidhi, Shubh Muhurat & Lakshmi Prapti Upay

Somvati Amavasya 2026 | Date, Puja Vidhi, Shubh Muhurat & Lakshmi Prapti Upay

15 जून 2026 सोमवती अमावस्या 🔱 अधिक मासातील दुर्लभ योग | पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धनलाभ उपाय

15 जून 2026 अमावस्या आहे, ही अमावस्या सोमवारी आहे त्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्या अत्यंत पुण्य दायी मानली जाते. अधिक मासमध्ये ही अमावस्या सोमवारी आल्याने त्याचे महत्व अधिक आहे. सोमवती आमवस्याच्या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते.

हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र व महत्वपूर्ण मानले जाते. ह्या वर्षी बऱ्याच वर्षा नंतर अधिक मास मध्ये सोमवारी अमावस्या आली आहे त्यामुळे तिचे महत्व अधिक आहे. ह्या दिवशी भगवान शिव या माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी येऊन माता लक्ष्मी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. सोमवती अमावस्याचा दिवस पितरांना तर्पण करण्यासाठी उत्तम आहे. अधिक मास मध्ये अमावस्या आल्यामुळे ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे व दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.

सोमवती अमावस्या कधी आहे? 

पंचांग अनुसार ह्या वर्षी सोमवती अमावस्या अधिक मास मधील कृष्णपक्षमध्ये येत आहे. अमावस्या तिथी प्रारंभ 14 जून, रविवार दुपारी 12:20 मिनिट ते समाप्ती 15 जून, सोमवार सकाळी 8:24 मिनिट पर्यन्त आहे. उदय तिथी नुसार 15 जून 2026 सोमवारी सोमवती अमावस्या व्रत ठेवायचे आहे. ह्या दिवशी स्नान दान केले जाईल तसेच पितृ कार्य करण्यासाठी 14 जुन हा दिवस उत्तम आहे.

सोमवती अमावस्या 2026 शुभ मुहूर्त: 

अमावस्या तिथि प्रारंभ: 14 जुन 2026 दुपारी 12 वाजून 20 मिनट

अमावस्या तिथि समाप्त: 15 जून 2026 सकाळी 8 वाजून 24 मिनट

स्नान-दान शुभ वेळ:  ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 04 मिनट पासून सकाळी 4 वाजून 44 मिनट पर्यन्त

सोमवती अमावस्या महत्व:

सोमवती अमावस्या च्या दिवशी विवाहित महिला व्रत ठेवून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यसाठी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा अर्चा करतात. ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा मारतात. अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करतात. व दान देतात त्यामुळे पापांचा नाश होतो. त्याच बरोबर पितरांना तर्पण देऊन श्राद्ध करतात त्यामुळे पितृ दोष शांत होतो व पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

सोमवती अमावस्याच्या दिवशी काय करावे? व काय करू नये? 

सोमवती आमवस्या च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

भगवान शिव ह्यांचा अभिषेक करा व माता पार्वतीची पूजा करा.

ह्या दिवशी तर्पण व श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात.

अमावस्या च्या दिवशी दान-पुण्य आवश्य करावे.

तामसी भोजन करू नये कोणाचा अपमान करू नये.

सोमवती अमावस्या ह्या दिवशी कोणत्या वेळी दीप दान करावे? 

हिंदू धर्माच्या मान्यता अनुसार, अमावस्या ह्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात दिवा लावणे शुभ मानले जाते. प्रदोष काळ हा साधारणपणे सूर्यास्त च्या पहिले 45 मिनिट प्रारंभ होऊन सूर्यास्त झाल्यावर सुद्धा असतो.

सोमवती अमावस्या दीपदान शुभ वेळ कोणती आहे? 

दीपदान हा विजय मुहूर्त संध्याकाळी 4:33 मिनिट पासून संध्याकाळी 5:37 मिनिट पर्यन्त आहे. गोधुली मुहूर्त रात्री 9:54 मिनिट पासून रात्री 10:10 मिनिट पर्यन्त आहे.

Somvati Amavasya 2026
Somvati Amavasya 2026 | Date, Puja Vidhi, Shubh Muhurat & Lakshmi Prapti Upay

सोमवती अमावस्याच्या दिवशी कोण कोणत्या जागी दिवा लवावा व उपाय कोणते करावे: 

सोमवती अमावस्या च्या दिवशी घरात पाच ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ आहे. असे म्हणतात की दीपदान लेल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे परिवारात सुख-समृद्धी येते.

मुख्य दरवाजाच्या बाहेर: सोमवती अमावस्या च्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर माता लक्ष्मीसाठी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. अमावस्याच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवला पाहिजे. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात नेहमी वास करते.

दक्षिण दिशेला: सोमवती अमावस्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे, असे म्हणतात की त्यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन  वंश वृद्धीचा व आर्थिक प्रगतीचा आशीर्वाद देतात.

पिपळाच्या वृक्षाखाली: पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णु  व माता लक्ष्मी प्रसन्न होतात व त्यांच्या कृपेने धनलाभ होण्याचे मार्ग मिळतात.

तुळशीच्या रोपा जवळ: हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. अमावस्या च्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मीचे घरात आगमन होते. त्यामुळे जीवनात आर्थिक खुशाली येते.

नदीकाठी: आपल्या घराजवळ जर कोणती पवित्र नदी असेलतर संध्याकाळी कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा पाण्यात सोडावा, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून अखंड सौभाग्य लाभते.

पितृ तर्पण: पवित्र नदीमध्ये स्नान करून घरी आल्यावर तांब्याच्या भांड्यात दूध, पाणी, काळे तीळ, घालून  ‘ॐ पितृ देवताभ्यो नमः’ह्या मंत्राचा जाप करत पितरांना तर्पण द्यावे.

जीव जंतुना भोजन: गाईला चारा द्या किंवा 5 वेगवेगळी फळ खावू घाला, कावळ्याला रोटी द्या, मुंग्यांना साखर द्या, त्यामुळे आपके पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात.

नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रू बाधा दूर करण्यासाठी: संध्याकाळी चौकात एक लिंबू चिरून चार तुकडे करून चारी दिशेला टाकावे व घरी यावे त्यामुळे व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होते. तसेच तुपात बनवलेले गोड पराठे त्याला मोहरीचे तेल लाऊन कुत्र्याला खायला द्या त्यामुळे शत्रू शांत होऊन त्रास देणार नाहीत.

 

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.