Adhik Maas Purnima 2026 Puja Vidhi | Vishnu Lakshmi Puja, Moon Worship & Powerful Remedies

Adhik Maas Purnima 2026
Adhik Maas Purnima 2026 Puja Vidhi | Vishnu Lakshmi Puja, Moon Worship & Powerful Remedies

Adhik Maas Purnima 2026 Puja Vidhi | Vishnu Lakshmi Puja, Moon Worship & Powerful Remedies

अधिक मास पूर्णिमा शुभ संयोग, काही उपाय केलेतर बदलेल किस्मत

31 मे 2026 रविवार ह्या दिवशी अधिक मास पूर्णिमा आहे. धार्मिक ग्रंथ जसेकी स्कंद पुराण व पद्म पुराण मध्ये अधिक मास पूर्णिमाला “सर्व सिद्धिदायिनी पूर्णिमा” असे म्हणतात. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा व दान केल्याने विशेष फळ प्राप्त होते.

आता आपण पाहू या 30 मे किंवा 31 मेला पूर्णिमा तारीख, पूजा मुहूर्त व विधी
हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा ह्या तिथीला विशेष महत्व आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची सत्यनारायण रूपात पूजा केली जाते. जेव्हा पूर्णमा अधिक मासमध्ये येते तेव्हा त्याचे महत्व अधिक वाढते. अधिक मास मध्ये पूर्णिमा ह्या तिथीला भगवान विष्णु ह्यांची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन पापा पासून मुक्ती मिळते. अधिक मास हा दर तीन वर्षानी एकदा येतो.

ज्येष्ठ अधिकमास पूर्णिमा 2026 शुभ मुहूर्त:
पूर्णिमा तिथी सुरुवात 30 मे 2026 सकाळी 11:57 मिनिट
पूर्णिमा तिथी समाप्ती 31 मे 2026 दुपारी 2:14 मिनिट
उदय तिथी: 31 मे 2026 असून स्नान, दान, व्रत व पूजा करावी

पूजा व चंद्रोदय वेळ:
पूजा शुभ वेळ: सकाळी 7:08 पासून दुपारी 12:19 पर्यन्त
चंद्रोदय वेळ: रात्री 7:36 वाजता ह्या दिवशी चंद्राची पूजा करणे विशेष महत्वाचे आहे.

अधिक मास पूर्णिमा का खास आहे?
धार्मिक मान्यता अनुसार अधिक मास पूर्णिमा ह्या दिवशी व्रत, पूजा केल्याने सामान्य पूर्णिमाच्या तुलनेने किती तरी पटीने अधिक फळ प्राप्त होते. ह्या दिवशी भगवान विष्णु पूजा, सत्यनारायण पूजा, सत्यनारायण कथा आइकलयाने सर्व पापाचा नाश होऊन, सुख-समृद्धी व शांती मिळते, असे म्हणतात की ह्या दिवशी अन्न, वस्त्र, स्वर्ण, व गोदान केल्याने जीवनातील सर्व परेशानी दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जाचा दिवस:
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पूर्णिमा फक्त धार्मिक आस्था नसून, मानसिक संतुलन व सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिष शास्त्रा नुसार पूर्णिमाच्या दिवशी ध्यान व मेडिटेशन केल्याने मानसिक शांती मिळते व निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्याच बरोबर परिवारात व नातेसंबंधात पॉजिटिविटी वाढण्यास मदत होते.
पूर्णिमाच्या दिवशी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
जेवण व खाण्यात संयम ठेवा व एका वेळेसच जेवण करा.
जास्तीत जास्त मंत्र जाप व ध्यान साधना करा.
कोणाची निंदा नालस्ती करू नका.
भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चा करा.
भगवान विष्णु और मां लक्ष्मी की श्रद्धा से पूजा करें

अधिक मास मधील पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या बरोबर माता लक्ष्मीपूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णु ह्यांना अभिषेक करून एका चौरंगावर लाल रंगाचे कापड घालून त्यावर भगवान विष्णु ह्यांची मूर्ती स्थापित करून त्याबरोबर लक्ष्मी माताची पण मूर्ती स्थापित करून भगवान विष्णु ह्यांना चंदनाचा तिलक लाऊन माता लक्ष्मीला सिंदूर लाऊन विधी पूर्वक पूजा करा त्यामुळे भगवान विष्णु व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून सर्व कष्टा पासून मुक्ती मिळेल.

अधिक मास पूर्णिमा ह्या दिवशी पुढील उपाय केल्यास आपले नशीब पालटू शकते.
चंद्राला अर्ध्य द्या:
पूर्णिमा तिथीला चंद्र पूर्ण असतो. तसेच अधिक मास मधील पूर्णिमा तिथीला तुम्ही चंद्राला अर्ध्य द्याल तर आपल्या जीवनात त्याचे चांगले शुभ परिणाम दिसून येतील. एका तांब्याच्या कलशात पाणी त्यामध्ये थोडेसे कचे दूध टाकून चंद्राला अर्ध्य द्या त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होईल व आपल्याला चंद्राची पूर्ण ऊर्जा मिळेल.

Adhik Maas Purnima 2026
Adhik Maas Purnima 2026 Puja Vidhi | Vishnu Lakshmi Puja, Moon Worship & Powerful Remedies

जरूरतमंद लोकांना दान द्या:
पूर्णिमा तिथीला दान-पुण्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण अधिक मास पूर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते. आपण पूर्णिमा तिथीला जरूरत मंद लोकांना दान दिले तर त्याची शुभ फळ आपल्याला मिळतात. ह्या दिवशी धनाचे दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपली आर्थिक स्थिति चांगली होते.

सत्यनारायणची पूजा करा:
अधिक मास मधील पूर्णिमा तिथीला सत्यनारायण करणे किंवा सत्यनारायण कथा आइकणे अत्यंत शुभ मानले जाते. ह्या दिवशी आपण आपल्या घरात सत्यनारायण करावे व श्रद्धेने प्रसाद बनवावा व परिवारातील सर्वाना व आजूबाजूच्या लोकांना प्रसाद द्यावा. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.