स्वयंपाक घरासाठी वास्तु: वास्तुशास्त्रानुसार 10 महत्त्वाच्या टिप्स | Kitchen Vastu Tips Marathi
Kitchen Vastu Tips: 10 Important Vastu Shastra Rules for Kitchen | Marathi Vastu Guide
स्वयंपाक घरासाठी वास्तु: धन, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या 10 टिप्स
आपल्या घरातील स्वयंपाक घर म्हणजे प्रतेक गृहिणीचे आवडतीचे स्थान असते. आपण दिवसातील कितीतरी वेळ स्वयंपाक घरामध्ये घालवत असतो. स्वयंपाक घरातिल वस्तु किंवा आपला किचन ओटा किंवा भांडी धुण्याचे सिंक हे आपण वास्तु शास्त्रा प्रमाणे ठेवले तर त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या घरातील व्यक्तींवर पडतो. एक चांगले स्वयंपाक घर हे समृद्धी, स्वास्थ व सदभाव वाढवते. खर म्हणजे स्वयंपाक घरात वास्तु दोष असेलतर आर्थिक, अस्थिरता, स्वास्थ संबंधित समस्या किंवा घरगुती भांडण होऊ शकतात.
आपण जर आपले स्वयंपाक घर नवीन बनवणार असाल तर किंवा बनवायची योजना करीत असाल तर आपण काही वास्तु टिप्सचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपल्या स्वयंपाक घरात सकारात्मक ऊर्जा येईल.
आपण स्वयंपाक घरासाठी काही महत्वाच्या 10 टिप्स बघणार आहोत त्यामध्ये स्वयंपाक घराची योग्य दिशा, गॅसची शेगडी ठेवण्याची योग्य दिशा त्याच बरोबर सिंक कोणत्या दिशेला असावे व आदर्श रंग संगती व चुकीच्या जागी स्वयंपाक घर असेलतर काय करायचे ह्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
1. घरातील स्वयंपाक घराची सर्वात चांगली जागा:
आपल्या घरात स्वयंपाक घरासाठी आदर्श दिशा दक्षिण-पूर्ण कोन आहे. वास्तु शास्त्रानुसार अग्नि तत्व ह्या दिशेला नियंत्रित करते. त्यासाठी योग्य दिशा निवडली पाहिजे.
2. जर स्वयंपाक घर दक्षिण-पूर्व दिशेला नसेलतर काय करावे?
जर स्वयंपाक घर दक्षिण-पूर्व ह्या दिशेला बनवणे संभव नसेलतर उत्तरपश्चिम दिशा हा दूसरा चांगला विकल्प आहे.
स्वयंपाक घर उत्तर-पूर्व दिशेला कधी सुद्धा असू नये. कारणकी त्यामुळे आर्थिक नुकसान व स्वास्थ संबंधित समस्या होऊन शकतात.
स्वयंपाक घर जर दक्षिण-पश्चिम दिशा असू नये कारण की ह्या दिशा स्थिरताशी जोडल्या गेल्या आहेत व आगीशी संबंधित किंवा अशांतताशी जोडल्या गेल्या आहेत.
3. वास्तु शास्त्रा नुसार गॅस शेगडीची योग्य दिशा:
स्वयंपाक घरातील गॅस शेगडीची जागा सर्वात महत्वपूर्ण आहे. कारणकी ती अग्नि तत्वशी जोडली गेलेली आहे. गॅस शेगडीची जागा वास्तु शास्त्रा नुसार पाहिजे .
गॅस शेगडी नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवली पाहिजे.
स्वयंपाक करताना नेहमी आपले मुख पूर्व दिशेला पाहिजे, कारणकी त्यामुळे चांगले स्वास्थ्य राहून सकारात्मकता येते.
काही चुका करण्या पासून टाळा:
गॅसची शेगडी उत्तर किंवा उत्तर-पूर्व ह्या दिशेला ठेवू नये. त्यामुळे आर्थिक परेशानी येऊ शकते.
गॅसची शेगडी चुकून सुद्धा खिडकीच्या खाली किंवा प्रवेश द्वारा जवळ ठेऊ नये.
4. स्वयंपाक घरातिल सिंक व गॅस शेगडी वास्तु शास्त्रा नुसार कोठे असावी?
वास्तु शास्त्रा नुसार गॅस शेगडी (अग्नितत्व) व सिंक (जल तत्व) कधी सुद्धा एक दुसऱ्याच्या जवळ असू नये.
सर्वात योग्य स्थान:
सिंक नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला पाहिजे.
गॅस शेगडी व सिंक ह्यामध्ये योग्य अंतर असले पाहिजे, कारणकी आग व पाणी ह्या दोन्ही तत्व एकमेकाशी भिडली नाही पाहिजे.
जर समजा हे दोन्ही एक-दुसऱ्याच्या जवळ असतील तर काय करावे?
गॅस च्या जवळच सिंक असेलतर परिवारात भांडण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते.
जर समजा आपल्या स्वयंपाक घरात गॅस व सिंक जवळ असेलतर त्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे दोन्हीच्या मध्ये एक लाकडी पार्टिशन टाका
5. स्वयंपाक घराची दिशा व लेआऊट वास्तु शास्त्रा नुसार:
वास्तु शास्त्रा नुसार स्वयंपाक घराची योग्य दिशा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निर्माण करते.
करा किंवा करू नका:
स्वयंपाक घरातील गॅस शेगडी, माइक्रोवेव व ओव्हन दक्षिण-पूर्व दिशेला पाहिजे.
स्वयंपाक घरातील स्थिरता राखण्यासाठी रेफ्रीजरेटर दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे.
स्वयंपाक घरातील कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
स्वयंपाक घर बाथरूम किंवा पूजेच्या जागेच्या खाली बनवू नये.
6. स्वयंपाक घराचा दरवाजा ह्याची दिशा कोणती असावी:
स्वयंपाक घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी प्रवेश दार योग्य जागी पाहिजे.
दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा.
दरवाजा कधी सुद्धा दक्षिण-पश्चिम ह्या दिशेला नसावा.
7. स्वयंपाक घराला वास्तु शास्त्रा नुसार कोणता रंग द्यावा:
स्वयंपाक घरात रंग देण्याच्या अगोदर वास्तु शास्त्रा नुसार व वतावरणाशी जुळणारा रंग देणे महत्व पूर्ण आहे.
स्वयंपाक घरासाठी सर्वात चांगला रंग कोणता?
पिवळा रंग हा गरमी वाढवतो व सकारात्मकता वाढवतो.
नारंगी किंवा लाल रंग अग्नि तत्वचे प्रतिनिधित्व करतो व समृद्धी आणतो.
हिरवा रंग सदभाव व चांगले स्वास्थ वाढवण्यास मदत करतो.
काही रंग आपल्या स्वास्थ्यसाठी सकारात्मकता साठी वर्ज आहेत ते कोणते रंग आहेत?
काळा रंग नाकारात्मकता वाढवतो.
गडद नीला रंग परिवारात अस्तिरता निर्माण करतो.
8. स्वयंपाक घर व बथरूम संबंधित वास्तु शास्त्रा नुसार नियम:
स्वयंपाक घराची व बाथरूमची भिंत कधी सुद्धा एक नसावी. कारणकी स्वयंपाक घर हे अग्नि तत्वचे प्रतीक आहे तर स्नान गृह जल तत्वचे प्रतीक आहे. त्यामुळे दोन्ही ऊर्जाचा टकराव होऊ शकतो.
जर दोन्हीची भिंत एक असेलतर वास्तु संबंधी उपाय कोणता आहे?
जर दोन्हीची एकच भीत असेलतर त्याच्या मध्ये एक लाकडीचे विभाजन ठेवावे.
बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.
स्वयंपाक घरा व बाथरूम वास्तु शास्त्रा नुसार योग्य स्थिति कोणती?
वास्तु शास्त्रा नुसार घराचे डिझाईन करताना बाथरूम च्या दिशेचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे.
बाथरूम कधीसुद्धा स्वयंपाक घराच्या ठीक वरती किंवा खालती नसावे.
स्वयंपाक घरा कधीसुद्धा बाथरूमच्या जवळ नसावे, कारणकी त्यामुळे बनवलेल्या जेवणाची ऊर्जा दूषित होते.

9. जर आपले स्वयंपाक घर उत्तर दिशेला आहे तर धनाचे देवता भगवान कुबेर ह्याच्या ऊर्जेसाठी विपरीत आहे.
जर स्वयंपाक घर उत्तर दिशेला असेलतर कोणता उपाय करावा?
स्वयंपाक घरामध्ये तांब्याचे स्वस्तिक लावावे.
स्वयंपाक घरात निळ्या रंगाच्या शेडचा वापर करू नये.
ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी गॅस शेगडी दक्षिणपूर्व दिशेला ठेवावी.
10. पूर्वेच्या दिशेला घराचे मुक्या दार असेलतर उत्तर-पश्चिम दिशेला स्वयंपाक घर असावे.
जर आपले स्वयंपाक घर उत्तर-पश्चिम दिशेला असेलतर पुढील दिशांचे पालन करावे:
अग्नि तत्व संतुलित राखण्यासाठी गॅस शेगडी दक्षिण पूर्व दिशेला पाहिजे.
सकारात्मकता राहण्यासाठी पांढरा किंवा हलक्या रंगाचा वापर करा.
जर काही भारी सामान असेलतर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
निष्कर्ष काय आहेतर:
वास्तु अनुसार स्वयंपाक घर बनवले तर समृद्धी, चांगले स्वास्थ व सकारात्मक ऊर्जा सुनिश्चित होते. स्वयंपाक घराची दिशा, गॅस शेगडी ठेवण्याची जागा व सिंकची जागा व रंग संगती वास्तु शास्त्रा नुसार असेलतर घरात सामंजस्य वातावरण राहण्यास मदत होते. जर आपण नवीन स्वयंपाक घर बनवत असालतर वास्तु शास्त्रा नुसार बनवा त्यामुळे घरात संतुलित वातावरण व समृद्धी राहण्यास मदत होते.
