लक्ष्मी पूजन 2025 100 वर्षा नंतर महालक्ष्मी योग, लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त पूजा साहित्य-विधी प्रभावी मंत्र
Diwali Lakshmi Pujan 2025, Shubh Muhurat Puja Sahitya-Vidhi And Satik Mantra In Marathi
दिवाळी ला ह्या वर्षी 100 वर्षा नंतर महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. ह्या वर्षी लक्ष्मी पूजनाचा सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी 07:08 पासून रात्री 08:18 पर्यन्त आहे.
दरवर्षी कार्तिक अमावस्याला दिवाळी साजरी करतात. ह्या वर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर अमावस्या सुरू होत असून 21 ऑक्टोबर ह्या दिवशी लक्ष्मी पूजन करायचे आहे. साजरी करायची आहे. असे म्हणतात की दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी धर्तीवर भ्रमण करीत असते व आपल्या भक्तांना धन-धान्य, सुख-संपत्तिची वरदान देते. म्हणूनच दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा अर्चा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ह्या वर्षी दिवाळी सण खूप खास आहे. कारणकी ह्या वर्षी 100 वर्षा नंतर महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे.
2025 वर्ष लोकांच्यासाठी काही खास नव्हते कारणकी युद्ध, तनाव, शेयर बाजार मध्ये मंदी, होत होती. ह्या वर्षी महालक्ष्मी राजयोग आहे म्हणजे आर्थिक दृष्टीने खूप भाग्याचे आहे.
दिवाळीला चंद्र-मंगळ युती बनत आहे. बुध-शुक्रच्या राशी परिवर्तने राजयोग निर्माण होत आहे.
दिवाळीच्या दिवशी रांगोळी सजवताना दही व दूर्वाचा उपयोग जरूर करा. ज्योतिषमध्ये दही शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. ह्या दिवाळीमध्ये ह्या दोन्ही वस्तूचा उपयोग करणे खूप लाभकारी आहे.
दिवाळी पूजा शुभ मुहूर्त:
हलक्ष्मी पूजनला ह्या वर्षी तीन खास शुभ मुहूर्त आहेत. 3 पैकी कोणत्या सुद्धा शुभ मुहूर्तवर आपण पूजा करू शकता.
पहिला मुहूर्त (प्रदोष काळ) संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिट ते रात्री 8 वअजून 18 मिनिट पर्यन्त
दूसरा शुभ मुहूर्त: (वृषभ काळ) संध्याकाळी 7 वाजून 08 मिनिट ते रात्री 9 वाजून 03 मिनिट पर्यन्त
तिसरा शुभ मुहूर्त (सर्वात शुभ मुहूर्त) संध्याकाळी 7 वाजून 08 मिनिट पासून रात्री 8 वाजून 18 मिनिट पर्यन्त
हिंदू धर्मा मध्ये दिवाळी सण हा प्रमुख सण मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळी साजरी करतात. हिंदू धर्मा नुसार कार्तिक अमावस्या तिथीला भगवान राम लंकापती रावणचा वध करून 14 वर्षे वनवास संपवून माता सीता व भाऊ लक्ष्मण ह्यांना आयोध्या मध्ये घेऊन आले होते. म्हणून आयोध्यामध्ये सर्वांनी दिवे लाऊन त्यांचे स्वागत केले होते. तसेच ह्या दिवशी माता लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली हूटी. दिवाळीच्या शुभ मुहूर्तवर श्री गणेश-लक्ष्मी व कुबेर भगवान ह्यांची पूजा केली जाते.

पूजाविधी साहित्य:
श्री गणेश-लक्ष्मी मूर्ती किंवा फोटो, गुलाब व कमळाचे फूल, चौरंग,गंगाजल, तूप, साखर, मिठाई, दूर्वा, गणेश-लक्ष्मीजिनसाठी वस्त्र, कलश, चांदीचे कोईन,विडयाचे पान, पणत्या, अगरबत्ती,कपूर, धूप, तुलसी, अत्तर, कलवा, हिरवी वेलची, जल, साळीच्या लाह्या, बत्तासे, नारळ, हळद-कुंकू, जानवे, केसर, लौंग, मोहरीचे किंवा तिळाचे तेल, लाल कापड, कुबेर यंत्र, धने, चंदन इ.
श्री गणेश-लक्ष्मी पूजन कसे करावे:
दिवाळी पूजन्साठी घरातील इशान कोण किंवा उत्तर-पूर्व दिशाची साफ-सफाई करा. मग त्याजागी चौरंग ठेऊन त्यावर लाल रंगाचे कापड घाला आता त्यावर लक्ष्मी-गणेशजीनची मूर्ती स्थापित करा. त्या अगोदर श्री गणेश व लक्ष्मी माताच्या मूर्तीला गंगाजल नी स्नान घाला.
मग श्री गणेश व माता लक्ष्मी ना वस्त्र, हळद-कुंकू, अत्तर, अक्षता अर्पित करा, मग गुलाबाचे फूल किंवा कमळाचे फूल पुष्प हार अर्पित करा.
आपल्या कडे असणारे सोन्याचे दागिने, चांदीचे कॉईन पूजेमद्धे ठेवा त्यांची सुद्धा पूजा करा.
आता भोग अर्पित करून श्री गणेशजीनची व माता लक्ष्मीची आरती म्हणावी, मनोभावे प्रार्थना करून काही चूक झाली असलेतर माफी मागावी.
घरात लक्ष्मी पूजन प्रदोश काळात करणे खूप शुभ मानले जाते.
लक्ष्मी पूजन अत्यंत प्रभावी सटीक मंत्र:
”ॐ श्रीं हृीं श्री कमले कमलालये प्रसीद-प्रसीद ॐ श्रीं हृीं श्रीं महालक्ष्म्यै नम:”