11 पिंपळाच्या पानाचे अचूक उपाय टोटके शनि साडेसाती व बरबादी रोकू शकतो
आपल्याला माहिती आहे का पिंपळाच्या झाडाचा किंवा पानाचा तोटका किंवा उपाय केल्यास कधी सुद्धा वाया जात नाही. आज आपण ज्योतिष शास्त्रा मधील असा एक उपाय किंवा तोटका पाहणार आहोत त्यामुळे आपल्या जीवनाची बरबादी किंवा शनि साडेसातीचा त्रास थांबण्यास मदत होईल.
The text Peepal Ke Patte Ka Upay Totka Wealth in Marathi be seen on our You tube Chanel Peepal Ke Patte Ka Upay Totka
पौराणिक काळा पासून पिपळाच्या झाडाला खूप पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडाला देव वृक्ष सुद्धा म्हणतात. असे म्हणतात की पिंपळाच्या झाडामद्धे त्रिदेव म्हणजेच बुडाच्या ठिकाणी ब्रह्म देव, मध्य भागी भगवान विष्णु व वरती भगवान शिव ह्यांचा वास आहे. हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व बाधानची मुक्ती होऊ शकते. पिंपळाच्या झाडा बरोबरच पिंपळाच्या झाडाचे पान पण खूप चमत्कारी आहे. ज्योतिष शास्त्र नुसार पिंपळाच्या झाडाच्या पानाचे काही तोटके किंवा उपाय आहेत ते केलेतर आपल्या जीवनातील दुर्भाग्य दूर होऊन सुख शांती लाभेल व शनि साडेसाती व बरबादी दूर होईल.
पिंपळाच्या 11 पानांचे उपाय:
पिपळच्या झाडाची 11 पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या. पाने धुतान ती कुठे सुद्धा फाटली किंवा तुटली नाही पाहिजे. आता त्या पानांवर कुंकू, अष्टगंध अथवा चंदन मिक्स करून श्री राम असे लिहावे. नाव लिहिताना हनुमान चालीसा आवश्य म्हणावी. मग त्या सर्व पांनाची एक माळ बनवून हनुमानजीनच्या मंदिरात जाऊन श्री हनुमान ह्यांना अर्पित करावी.
मंगळवारी किंवा शनिवारी करा हे उपाय:
मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून त्याला गंगाजल नी धुवून हळद व दही मिक्स करून अनामिका उगली म्हणजे करंगळीच्या शेजारील बोटानि हीं असे पानावर लिहावे. मग त्याच्या पुढे दिवा लाऊन ते पान पर्समध्ये ठेवावे. असे दर मंगळवारी किंवा शनिवारी केल्यास धन संबंधित परेशानी दूर होतील. पान बदलताना पहिले पान स्वच्छ पवित्र ठिकाणी ठेवावे.
शिवलीगची पूजा करा:
धार्मिक मान्यता अनुसार पिंपळाच्या झाडाच्या खाली शिवलिंग स्थापित करणे फलदाई असते. पिंपळाच्या झाडाच्या खाली जर शिव लिंग असेल व त्याची नियमित पूजा केल्यास जीवनातील सर्व समस्या समाप्त होतात.
शनिवार ह्या दिवशी हे उपाय करा:
शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पित करा व मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने शनीची दशा समाप्त होऊन घरात सुख समृद्धी येते.
पितृ दोष पासून वाचण्यासाठी करा हा उपाय:
जर आपण पितृ दोष पासून परेशान आहात व त्यापासून छुटकारा पाहिजे असेलतर रोज पिपळाच्या झाडाला पाणी अर्पित करा त्यामुळे पितृ दोष नाहीसा होऊन शनि दोषापासून सुद्धा मुक्ती मिळेल.