एगलेस रवा केक बिना मैदा बिना बटर अगदी बेकरी सारखा
एगलेस रवा केक बिना मैदा बिना बटर अगदी बेकरी सारखा आपण घरी बनवू शकतो. रवा केक बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे. रवा केक बनवताना मैदा किंवा बटर किंवा अंडी वापरली नाहीत त्यामुळे आपण हा केक कधी सुद्धा बनवून खाऊ शकतो.
केक सर्वाना आवडतो लहान असो किंवा मोठे असो प्रतेक जण आवडीने खातो. रवा केक म्हणजेच सुजी केक मस्त चविष्ट लागतो. आपण कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा मुलांच्या पार्टीला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो.
एगलेस रवा केक बिना मैदा बिना बटर अगदी बेकरी सारखा आपण मायक्रो वेव्ह् किंवा कुकरमध्ये किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला एक कप मीठ घालून प्रीहीट करून मगच केक बेक करावा.
साहित्य:
1 ¼ कप बारीक रवा
¾ कप साखर
½ कप दही
½ कप दूध
¼ कप तेल
1 टी स्पून बेकिंग पावडर
½ टी स्पून ला थोडा कमी बेकिंग सोडा
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती: एका बाउल मध्ये बारीक रवा, साखर, दही, दूध व तेल चांगले मिक्स करून घेऊन 30 मिनिट बाजूला झाकून ठेवा.
मायक्रोवेव्ह् ओव्हन प्रीहीट करायला ठेवा. केकच्या भांड्याला आतून तेल लाऊन बटर पेपर लावा जे बटर पेपर नसेलतर तेल लाऊन मैदा भुरभुरा.
आता 30 मिनिट झाल्यावर मिश्रण एकदा सारखे करून घ्या. मग त्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एकदा टॅप करून घ्या. म्हणजे जर मिश्रणात एयर बबल असेलतर निघून जाईल. वरतून ड्रायफ्रूट ने सजवून घ्या.
मायक्रोवेव्ह् ओव्हन 180 डिग्रीवर 40-42 मिनिट कनव्हेकशन मोड वर सेट करून घेऊन केक बेक करून घ्या.
केक बेक झाल्यावर लगेच ओव्हन मधून बाहेर काढू नका तसाच ओव्हन मध्ये 15-20 मिनिट ठेवा. मग बाहेर काढून थंड होऊ द्या. केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा किंवा डब्यात भरून ठेवा.