Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth In Marathi

Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth
Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth

धन-संपति बाबतीत लकी असणारे मुलांक 9 ह्यांनी श्री हनुमानजीनची उपासना केल्यास सर्व समस्या दूर होतात ते कसे ते आपण पहाणार आहोत.

मुलांक 9 असणारे मजबूत, ऊर्जावान, साहसी व निडर असतात. प्रतेक संकटात बहादुरीनि सामना करतात. अशी लोक बोलण्यात सुद्धा माहिर असतात.

The text Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth Marathi be seen on our You tube Chanel Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth

आपल्या जीवनात अंकाचा बऱ्याच प्रमाणात फरक पडत असतो. अंकावरून सुद्धा व्यक्तिच्या आचार विचराचा किंवा हावभाव ह्याचा पत्ता लागू शकतो. त्यालाच अंक ज्योतिष शास्त्रामध्ये मुलांक असे म्हणतात. आपण पहात असाल की माता लक्ष्मी काही लोकांवर नेहमी मेहरबान असते. त्यांच्या कडे धन संपत्ति भरपूर असते व कश्याची कमी नसते. ज्योतिष शास्त्र नुसार आपले भविष्य कसे असणार टे आपल्या जन्म तारखेच्या मुलांक वरती आवलंबून असते. ज्या लोकांचा जन्म कोणत्या सुद्धा महिन्याच्या 9,18 किंवा 27 तारखेला असेलतर त्यांचा मुलांक 9 असा असतो. मुलांक 9 असणारे लोक धन-संपत्ति च्या बाबतीत भाग्यशाली असतात. ह्या मुलांकचे स्वामी मंगळ हा ग्रह आहे. मुलांक 9 असणाऱ्या लोकांचा स्वभाव व भविष्य कसे असते ते आपण पाहू या.

Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth
Worship of Hanuman by Birth No 9 People Attracts Wealth

बोलण्यामद्धे महिर असतात त्यामुळे समाजात त्यांची ओळख असते.
मुलांक 9 असणाऱ्या लोकनचे जीवन संघर्षानी भरलेले असते. हे लोक स्वाभिमानी असतात. मुलांक 9 असणाऱ्या लोकाना शिस्त प्रिय असते. तसेच त्याना आपले कौतुक केलेले आवडते. पण चहाडया केळ्यातर त्यांच्या अंगाशी येतात. म्हणून अश्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे. हे लोक शरीरानी मजबूत व ऊर्जावान असतात. त्याच बरोबर ते निडर व साहसी असतात व विपरीत परिस्थितिमध्ये टे बहादूरीने सामना करतात. ह्या लोकांचा आवाज थोडा वर असतो व बोलणे थोडे तिखट असते. असे म्हणतात की मुलांक 9 असणारे लोक बोलण्यात महिर असतात. म्हणून अश्या लोकांचे बोलणे कोणी सोडून देत नाहीत.

मुलांक 9 असणारे लोक बुद्धीनी तीव्र असतात
मुलांक 9 असणारे लोक नटखट व विनोद प्रिय असतात. हसणे व हसवणे ही त्यांची प्रवृत्ति असते. असे लोक मिटिंग व मित्र परिवार ह्याची जान असतात. ह्यांच्या बिना कोणाला करमत नाही पण मित्राना दुख दर्दमध्ये मदत करतात पण आपले दुख दुसऱ्यान बरोबर शेयर नाही करत. हे लोक तीव्र बुद्धीचे असतात. असे लोक घरात सधारणपणे मोठे असतात व ते घरात सगळ्याना मदत करतात. पण भावंडामध्ये मतभेद होण्याची स्थिति होत असते. लग्न झाल्यावर मुलांक 9 असणाऱ्या लोकांच्या स्वभावामुळे म्हणजे शिस्त, स्वाभिमान व अभिमान ह्यामुळे प्रेम संबंधात अडचण येवू शकते. मुलांक 9 असणारे लोक आपला जीवन साथी सुंदर व आज्ञाकारी असणारा जास्त पसंद करतात. हयना संतान सुख साधारण पणे मिळते.

मुलांक 9 असणारे लोक साहसी असून अडचणीवर मात करतात
मुलांक 9 असणारे लोक व्यापारात जोखीम अधिक घेतात. ले लोक इंजिनियर, डॉक्टर, आग, वीज ह्या कामाशी जोडले गेलेले असतात. त्याच बरोबर ते राजनीति, हॉटेल, टुरिझम किंवा सर्कस ह्याच्याशी जोडले जाऊ शकतात. मुलांक 9 असणारे लोक गव्हरमेन्टमध्ये अधिकारी असतात. हे लोक अगदी अवघड कामावर सुद्धा मात करतात. हे लोक खर्च खूप करतात पण ह्यांच्या कडे जमीन जायदाद असते. ह्यांना सासर कडून सुद्धा धन मिळते. त्याना काही अवघड कामातून सुद्धा धन मिळते. पण त्यांनी अश्या कामात सावधानी ठेवली पाहिजे.

मुलांक 9 असणाऱ्या लोकांना लाल रंग लकी आहे
प्रतेक महिन्यातील 9,18 किंवा 27 तारीख व रविवार, सोमवार, मंगळवार व गुरुवार हा शुभ दिवस आहे. ज्योतिष शास्त्रा नुसार मुलांक 9 असणारे लोकांनी लाल, गुलाबी, मेजेन्टा, फिकट मरून, केशरी, फिकट पिवळा हे रंग वापरावे टे शुभ आहेत. आपल्या आसपास सुद्धा ह्या रंगांचा जास्तीतजास्त वापर करावा त्यामुळे सफलता व भाग्य उजळण्यासाठी उपयोगी पडेल.

मुलांक 9 असणाऱ्या लोकानी दुर्घटना पासून सतर्क राहिले पाहिजे

मुलांक 9 असणारे लोक ताप, डोकेदुखी, जखम, रक्त विकार व उदर रोग ह्याच्याशी सामना करताना दिसतात. आग किंवा केमिकल पासून दुर्घटना होण्याचे भय असते. म्हणून अश्या लोकानी नेहमी काम करताना काळजी घेतली पाहिजे.

मुलांक 9 असणाऱ्या लोकानी श्री हमुमानजीची उपासना केल्यास यश मिळते

मुलांक 9 असणाऱ्या लोकांनी हनुमानजीनची उपासना केल्यास जीवनातील समस्या समाप्त होतील. जर घरात क्लेश असतील तर मंगळवार व शनिवार ह्या दिवशी सुंदरकांडचे वाचन केल्यास सर्व क्लेश दूर होतील. हनुमान चालीसाचे नियमित वाचन केल्यास आर्थिक समृद्धी, मान सन्मान व यश मिळते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.