Laung Totke to Change your Fortune in Marathi

Lavangache Totke
Laung Totke to Change your Fortune

एक लवंग लौंग टोटके आपले आयुष्य पालटू शकतो

लवंग म्हणजेच हिन्दी मध्ये लौंग व इंग्लिश मध्ये Cloves म्हणतात.
लवंग आपणास परिचयाचे आहे. आपण स्वयंपाक करतांना किंवा मसाले बनवताना ह्याचा वापर करतो. लवंगचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जसे फायदे आहेत तसेच त्याच्या उपायाने आपले रोजच्या व्यवहारि जीवनात सुद्धा खूप फायदे आहेत त्याच्या उपायाने आपले काही महत्वाचे प्रश्न किंवा अडचणीचे निराकरण होते ते कसे ते आपण ह्या विडियोमध्ये बघू या.

Lavangache Totke
Laung Totke to Change your Fortune

धन प्राप्ति, स्मरणशक्ति, नकारात्मक ऊर्जा, नोकरी मिळणे, मनशांती मिळते.

प्रतेकाला वाटते की आपण श्रीमंत व्हावे पण आपल्या पत्रिकेतील दोषामुळे ते शक्य होत नाही किंवा पत्रिकेत शनी पीडा असेलतर त्यासाठी एक उपाय करावा. मंगळवार ह्या दिवशी श्री हनुमान जी च्या फोटो किंवा मूर्ति समोर सरसुच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये दोन लवंग घाला व हनुमान चालीसाचे वाचन करा मग बघा चमत्कार तुम्हाला लगेच त्याची प्रचिती येईल व तुमची पैशाची आवक वाढेल.

जर आपले मूल अभ्यासात प्रगती करीत नाही किंवा त्याची स्मरणशक्ति चांगली नाही तेव्हा हा एक सोपा उपाय करा एका लाल रंगाच्या कापडात 11 लवंग ठेवून त्याची पुरचुंडी बांधा व आपल्या घरातील देव्हार्‍यात ठेवा व ॐ गं गणपतये नमः असे 108 वेळा म्हणा व पुरचुंडीमधील 1 लवंग रोज आपल्या मुलाला खायला द्या मग बघा आपल्या मुलाच्या बुद्धीतील बादल.

बर्‍याच वेळा आपली कामे अडून राहतात किंवा प्र्तेक कामात अडचणी येतात तेव्हा प्रतेक शनिवारी दिवा लावताना दिव्यामध्ये 3-4 लवंग घाला व घरात ज्या कोपर्‍यामध्ये अंधार असेल तेथे हा दिवा ठेवा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व आपले काम मार्गी लागेल.

आजकाल नोकरी मिळणे कठीण आहे किंवा आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही तेव्हा हा उपाय करा व पिवळे ताजे लिंबू घ्या व त्याच्या चारी बाजूला एक एक लवंग टोचा व ॐ हनुमते नमः असे 21 वेळा म्हणा. बघा तुम्हाला नोकरी मिळेल.

आपण काही कारणामुळे मानसिक चिंतेत आहात व आपल्याला मनशांती पाहिजे तर रोज 2-3 लवंग जाळून त्याची राख चाटायची म्हणजे तुम्हाला मनशांती मिळेल करून बघा.

तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामासाठी जाणार असाल तर जातांना आपल्या मुख्य दारावार 2-3 लवंग ठेवून त्यावर पाय देवून जा तुमचे काम नक्की होईल कोणती सुद्धा बाधा येणार नाही.

लाल रंगाच्या कापडात 5 लवंग व 5 कवड्या बांधून आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवा त्यामुळे तुमच्या धनामध्ये वाढ होईल.

लवंगचा हा सोपा सरळ तोटका कोणी सुद्धा करू शकतो पण हा तोटका करतांना पूर्ण श्रद्धेने करा म्हणजे तुम्हाला लगेच त्याचे फळ मिळायला सुरवात होईल.

The Marathi language video Cloves Home Remedies can be seen here –  Lavangache Chamatkari Totke Marathi Madhye

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.