Categories
Chatpata Chowpatty Corner Recipes in Marathi Sauce Recipes

Fast Food Stall Style Kacchi Dabeli Recipe in Marathi

कच्छी दाबेली: कच्छी दाबेली ही एक अगदी प्रतेक प्रांत्तात लोकप्रिय डीश आहे. ही डीश नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा लहान मुलांच्या वाढदिवसाला बनवायला छान आहे. खर म्हणजे गुजरात मधील ही स्ट्रीट फास्ट फूड डीश आहे. ह्यामध्ये तिखट व आंबटगोड चटणी वापरली आहे. तसेच बटर मध्ये शालो फ्राय केली आहे त्यामुळे ह्याची चव अगदी न्यारीच लागते.

ह्यामध्ये दाबेलीचा मसाला वापरण्याच्या आयवजी मी पावभाजी मसाला व चाट मसाला वापरला आहे व वरतून चीज घातले आहे त्यामुळे ह्याची चव अप्रतीम लागते.

The English language version of this Fast Food Dish can be seen here – Recipe for Making Kacchi Dabeli at Home

The video of this Kacchi Dabeli recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=bYZN8zKmd-U

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ लादी पाव (८ पाव)
२ मोठ्या आकाराचे बटाटे (उकडून, सोलून, किसून)
१ छोट्या आकाराचा कांदा (चिरून)
२ टे स्पून शेंगदाणे (भाजून, सोलून)
२ टे स्पून डाळींब दाणे
१/२ टे स्पून तेल
१/२ टी स्पून चाट मसाला
१ टी स्पून पाव भाजी मसाला
१ टे स्पून हिरवी तिखट चटणी
३ टे स्पून चिंचेची आंबटगोड चटणी
मीठ चवीने
बटर पाव फ्राय करण्यासाठी
चीज वरतून सजावटीसाठी

Kacchi Dabeli
Fast Food Stall Style Kacchi Dabeli

कृती: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. कांदा चिरून घ्या. हिरवी चटणी व चिंचेची आंबटगोड चटणी तयार करून घ्या.

कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून २ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चाट मसाला, पावभाजी मसाला, थोडे शेंगदाणे, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये तिखट हिरवी चटणी व चिंचेची आंबटगोड चटणी घालून मिक्स करून उकडलेले बटाटे घालून मिक्स करून २- ३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. भाजी परतून झाल्यावर एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून त्यावर शेंगदाणे, डाळींब दाणे व कोथंबीरने सजवा.

लादी पाव घेवून मधोमध चिरून घ्या व त्यामध्ये एक टे स्पून भाजी भरून पाव थोडा दाबून घ्या म्हणजे भाजी घट्ट बसेल.

तवा गरम करून पाव दोनीही बाजूनी बटर घालून छान खमंग भाजून घ्या.

गरम गरम कच्छी दाबेली सर्व्ह करतांना वरतून किसलेले चीज घाला.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *