Nutritious Mixed Vegetable Soup Recipe in Marathi

Nutritious Vegetable Soup
Nutritious Mixed Vegetable Soup

मिक्स व्हेजिटेबल सूप: मिक्स व्हेजिटेबल सूप हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ह्या सुपामध्ये भाज्या आहेत. थंडीच्या काळात गरम गरम सूप अगदी चवीस्ट लागते. लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा सूप आवडते. मिक्स व्हेजिटेबल सूप घरी बनवायला अगदी सोपे आहे व पटकन होणारे आहे. तसेच मिक्स व्हेजिटेबल सूप हे डाएटिंग करणाऱ्या अगदी फायदेशीर आहे. हे सूप बनवतांना मैदा वापरण्याच्या आयवजी मुगाची डाळ वापरली आहे.

The English language version of this Veg Soup recipe and the preparation method can be seen here – Mixed Veg Soup

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
१०० ग्राम केशरी ताजी गाजर
१ कप कोबी (चिरून)
१ कप पातीचा कांदा
१/२ कप मटार
१/२ कप श्रावण घेवडा (बीन्स)
१ छोटा बटाटा
५-६ पालकची पाने
१/२ कप कॉलीफ्लावर
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ मध्यम आकाराचा टोमाटो (चिरून)
१ टे स्पून मुगाची डाळ
१ टे स्पून बटर
मीठ व मिरे पावडर चवीने
४ कप पाणी

Nutritious Vegetable Soup
Nutritious Mixed Vegetable Soup

कृती:
प्रथम सर्व भाज्या धुवून साफ करून बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरमध्ये एकदा ग्राईंड करून घ्या.
बटर किंवा तूप कुकरमध्ये गरम करून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. जर तुम्हाला मैदा घालायचा असेल तर १ टे स्पून मैदा घालून गुलाबी रंगावर परतून घेऊन १/२ कप पाणी घालून एक उकळी आणा.
उकळी आल्यावर चिरलेल्या भाज्या घालून मुगाची डाळ पाहिजे असेलतर घाला नाहीतर मैदा कसा वापरायचा ते सांगितले आहे. मग त्यामध्ये ४ कप पाणी घालून कुकरचे झाकण लाऊन ८-१० मिनिट शिजू द्या.
कुकर थंड झाल्यावर सूप गाळून घेऊन मीठ, मिरे पावडर घालून एक उकळी आणून गरम गरम सूप सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.