Categories
Dessert Recipes Maharashtrian Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Zatpat Mango Kheer Recipe in Marathi

आंब्याची खीर: आपण आंब्याच्या रसाचे विविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याच्या रसा पासून आमरस, आंब्याचे लाडू , वड्या, आंब्याची बर्फी, कारंजी, मोदक असे नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याची खीर ही अप्रतीम लागते. ही खीर पुरी बरोबर किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करता येते. आंब्याची खीर बनवतांना हातानी बनवलेल्या शेवया वापरल्या आहेत तसेच दुध, वेलचीपूड व ड्रायफ्रुट वापरले आहेत. लहान मुलांना आंब्याची खीर फार आवडेल.

The English language version of this Mango Kheer recipe preparation method can be seen here – Tasty Maharashtrian Ambyachi Kheer

बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
१/२ लिटर दुध
१ कप आंब्याचा रस
१/२ कप शेवया
१/४ कप साखर
१/४ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून साजूक तूप
१/४ कप ड्रायफ्रुट तुकडे (काजू,बदाम)

Aam Kee Kheer Recipe in Marathi
Delicious Mango Kheer

कृती:
२ आंबे धुवून त्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या.

एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया दोन मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये दुध मिक्स करून एक उकळी आणा. नंतर त्यामध्ये साखर घालून दोन-तीन मिनिट गरम करून घेवून वेलचीपूड घालून थंड करायला ठेवा. खीर थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा जूस घालून मिक्स करून फ्रीझमध्ये दोन तास थंड करायला ठेवा.
आंब्याची खीर सर्व्ह करताना वरतून ड्राय फ्रुटने सजवून थंड थंड खीर सर्व्ह करा.

Share this Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *