गणपती गौरीची पूजा कशी करावी

Ganesh Utsav
Sarvajanik Ganesh Utsav

||श्री गणेशाय नमः||

श्रावण महिना संपला की सर्वाना गणपतीचे वेध लागतात. भाद्रपद महिन्यातील गणपती गौरीची पूजा ही घरोघरी केली जाते. गणपती हे आपले आराध्य देवत आहे. महाराष्ट्रात तर गणपतीचा सण हा खूप धामघुमीत साजरा करतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. अगदी लहान मुलांन पासून आजी-आजोबा सर्व जण आनंदाने सगळ्यात भाग घेत असतात. सगळीकडे एकप्रकारची नव चैतन्याची लहर येते. महाराष्ट्रात तर गणपती उत्सव अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण कालांतराने त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. ह्या सणामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून हा सण साजरा करतात. गणपती पुढे आरस करून रोज वेगवेगळे करमणुकीचे कारक्रम केले जातात.

गणपती म्हणजे शंकर पार्वतीचे सुपुत्र. गणपती बाप्पा म्हणजे आपली सर्व संकटे दूर करणारा व बुध्दी देणारा आहे.

भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकाव्रत करतात. आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून जसे पार्वतीने व्रत केले होते तसेच ह्या दिवशी लग्न न झालेल्या मुली पार्वतीची पूजा आराधना करून पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. पूजा करतांना पार्वतीची मूर्ती पाटावर स्तानापन्न करून पाना फुलांनी सजवतात, फळे ठेवून पूर्ण दिवस दिवा लावतात. आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून अर्चना करतात. रात्री आजू बाजूच्या मुली व महिला जागरण करून झीमां, फुगडीचे खेळ खेळतात.

Ganesh Utsav
Sarvajanik Ganesh Utsav

भाद्रपद शुक्लचतुर्थीस गणपती बाप्पाचे आगमन होते. घरोघरी आनंदी आनंद व मंगलमय वातावरण असते. गणपती बाप्पाचे आगमन ढोल ताशांनी केले जाते. आपल्या गुरुजी कडून गणपती बाप्पाची स्थापना यथा विधी पूर्वक करून घेतली जाते. लहानमुले गणपती बाप्पाची आरस करण्यात मग्न असतात, तसेच घरातील स्त्रिया पंचपक्वान्न बनवण्यात मग्न असतात. गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात म्हणून त्यादिवशी वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक बनवतात. रोज सकाळ, दुपार व संध्याकाळी आरती करून प्रसाद दिला जातो. ह्या दिवशी उपवास पण करतात व चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडतात.

Modak for Ganesha
Colourful Modak for Ganesha

द्रपद शुक्ल पंचमीला ऋशीपंचमी म्हणतात. ह्या दिवशी स्त्रिया पूर्ण दिवस उपवास करून गणपती बाप्पा समोर बसून अथर्वशीर्ष म्हणतात. श्री गणेश अथर्वशीर्ष एक शिघ्र फलदायी उपासना आहे. ह्या दिवशी आपण आपल्या श्रमाच खातो त्यामुळे स्वकष्टाची किंमत माणसाला कळते. ह्या दिवशी ऋषींची भाजी करायची पध्दत आहे.

जेष्ठ गौरी पूजन म्हणजे स्त्रीयांचा अगदी आवडता सण आहे. त्यासाठी काय-काय सामग्री व साहित्य लागते त्याची आगोदरच तयारी करून ठेवावी.

पूजेची सामग्री : सर्व उपकरणे तांब्याची किंवा चांदीची वापरावीत, ह्यामध्ये ताम्हण, पळी-पात्र, तांब्या, पूजेचे ताट, समई, निरंजन, अगरबत्तीचे घर, घंटा, धूपपात्र, कपूरपात्र इ.

पूजेचे साहित्य : हळद-कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, सुपाऱ्या, नारळ, विड्याची पाने, गुळ-खोबरे, बदाम, खारका, तांदूळ, गहू, पंचामृत, दुध, दही, तूप, मध. साखर, ५ प्रकारची फळे, सुगंधी तेल, नाणी

फुले : फुलांचा हार, सुटी फुले, कमळ, केवडा, जाई, जुई, शेवंती

पत्री : आघाडा, बेल, दुर्वा, चाफा, डाळीब, धोत्रा, तुळस

अलंकार : बांगड्या, मणीमंगळसूत्र, साडी, हिरवी चोळी, खण व काही दागिने

भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेष्ठगौरीचे आगमन होते. तेव्हा घरोघरी उत्साही वातावरण असतं. दृढ श्रद्धा व उत्कट भक्तीने गौरीचे पूजन होते. महाराष्ट्रातील स्त्रिया सौभाग्य संवर्धनाच्या हेतूने हा सण मोठ्या आवडीने करतात. देवी पार्वती ही या गौरीच्या रूपाने माहेरी येते अशी समजूत आहे. गौरी ही स्त्रीची जीवाभावाची सखी आहे. काही जणी नदीकाठावरून आणलेले दोन खडे तर काही जणी तेरड्याची रोपे अशी प्रतीकात्मक गौर बसवितात तर काही जणी मुखवटे असलेली, भरजरी शालू नेसलेली, दागीन्यांनी नटलेली, साजरी गौर बसवताना दिसतात. जशी आपल्या घ्ररात प्रथा आहे तशी गौर बसवून पूजा करतात.

आजकालच्या धकाधकीच्या दिवसात घरसंसार, नोकरी, आपले करीयर सांभाळून तारेवरची कसरत करून अगदी आवडीने व तितक्याच श्र्धेनी गौरी पूजन करून आपल्या घराला यश, संपती, संतती व कीर्ती मिळावी म्हणून वर मागतात.

गौरीच्या पूजेची तयारी अगोदरच करावी म्हणजे आईन वेळेस पंचाईत होणार नाही. गौरी आणण्या पूवी घरातील प्रतेक कोपऱ्यात हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत. म्हणजे गौर घरात आली आहे असे म्हणतात. घरामध्ये गौरी बसवतांना भोवती आरस करतात. देवी पुढे फराळाचे जीन्नस ताट भरून ठेवतात. कुंची घातलेली बाळ बसवतात. पंचारतीने, उद्बतीने, अत्तर, गुलाबाने, हळद-कुंकुवाने, अ चंदनाच्या उटीने देवीची पूजा करतात. त्या दिवशी शेपूची भाजी/मेथीची भाजी, खीर, वडे, अनारसे, लाडू व भाकरीचा नेवैद्य दाखवतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी मनोभावे पूजा करून नेवेद्यासाठी चटणी, कोशीबीर, पुरणपोळी, काटाची आमटी, भजी, अळूच्या वड्या, भात करतात. त्यादिवशी संध्याकाळी इतर स्त्रीयांना हळद-कुंकू साठी बोलवतात व रात्री गौर जागवतात. वेगवेगळे खेळ खेळले जातात गौरीची गाणी म्हटली जातात.

तिसऱ्या दिवशी गौरीच्या ओटीसाठी तांदूळ, खारीक, खोबरे, लेकुरवाळे, हळद-कुंकू, पानसुपारी घेतात. खारीक खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे पिवळ्या दोऱ्यात सात ठिकाणी गाठ्वून गळ्यात बांधतात. त्यादिवशी घावन घटले, दही-भात, गव्हल्याची खीर बनवून नेवेद्या दाखवतात.

काही जणांच्या घरी पाच दिवस, सात दिवस गणपती बाप्पा बसवतात. सत्यनारायणची पूजा केली जाते. अनंतचतुर्दशी भाद्रपद शुल्क ह्या दिवशी गणपती बाप्पांना ढोल ताशाने वाजत-गाजत निरोप देतात. त्या दिवशी सगळीकडे मंगलमय वातावरण असते पण गणपती बाप्पांना निरोप देतांना पुढल्या वर्षी लवकर या म्हणून अगदी जड अंतकरणाने निरोप देतात.

अनंतचतुर्दशी झालीकी प्रतिपदा श्राद्ध म्हणजे पितृ-पंधरवडा चालू होतो. तेव्हा आपले आजी-आजोबा, पणजोबा, पूर्वज या दिवंगतां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस आहेत. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजाच्या श्रमामुळे. या विषयी आदर बाळगला पाहिजे. आपण म्हणतो की पितृ-पंधरवडा अशुभ आहे. पण उलट तो अशुभ न म्हणता तो आपल्या पुर्वजांचे स्मरण देणारा पवित्र पंधरवडा आहे. आपण त्याच्या तिथी प्रमाणे त्यांच्या तस्विरी समोर रांगोळी काढून, अगरबत्ती लावून, केळीच्या पानावर जेवण वाढावे व ते पान ठेवावे मग ते जेवणाचे पान गाईला द्यावे. दुसरे अजून एक जेवणाचे पान कावळ्याला द्यावे.

For Gauri – Hartalika [ Mahalaxmi] Pujan see this – Article

Published
Categorized as Tutorials

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.