Methi Batata Bhaji Marathi Recipe
मेथी- बटाटा भाजी : मेथी-बटाटा भाजी ही चवीला फार छान लागते. मेथी हे थोडी कडवट लागते पण ह्यामध्ये बटाटा तळून घातला तर त्याची चव वेगळीच लागते. तसेच बटाट्याला मेथीच्या भाजीची टेस्ट येते. मुलांना ही भाजी डब्यात चपाती बरोबर द्यायला छान आहे.
The English language version of the Methi Batata Bhaji is given in the article – Here
साहित्य : २ कप मेथीची पाने (बारीक चिरून), १ छोटा बटाटा, १ टे स्पून तूप, मीठ चवीने
फोडणी साठी : १/२ टी स्पून तूप, १/२ टी स्पून मोहरी, १/२ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, ४-५ लसूण पाकळ्या (ठेचून) , २ हिरव्या मिरच्या
कृती : मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून मग चेरून घ्या. बटाटे सोलून त्याचे तुकडे करा (फ्रेंच फ्राईज सारखे)
कढई मध्ये तूप गरम करून बटाट्याचे (फ्रेंच फ्राईज) तळून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून मोहरी, जिरे, हिंग, ठेचलेला लसूण घालून हिरव्या मिरच्या, मीठ व चिरलेली मेथी भाजी घालून थोडे शिजण्या पुरते पाणी घाला व मंद विस्तवावर भाजी शिजू द्या. भाजी शिजल्यावर त्यामध्ये तळलेले बटाट्याचे (फ्रेंच फ्राईज) घालून मिक्स करा.
ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते.
Leave a comment