मेथीची भाजी : मेथीच्या पानांची भाजी रुचकर व चवीस्ट लागते. तसेच ती आपल्या स्वाथ्य साठी फार गुणकारी आहे. मेथीची भाजी थोडी कडवट लागते पण तिच्या मध्ये जे गुण आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. मेथीच्या भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, बलकारक आहे. मेथीच्या पानांची भाजी बनवायला एकदम सोपी आहे व पटकन होणारी आहे. ही भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते.
साहित्य : १ मेथीची जुडी, ५-६ लसून पाकळ्या (ठेचून), २ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), मीठ चवीने
फोडणीसाठी : १/२ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून हळद
कृती : मेथीची भाजी निवडून ४-५ वेळा धुवून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, लसूण, हिरव्या मिरच्या घालून मग लगेच मीठ व मेथीची पाने घालून १/४ कप पाणी घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर भाजी शिजू द्यावी. पाणी आटले की भाजी खाली उतरवावी.
गरम गरम भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.