Tasty Dalia Upma Recipe in Marathi

द्लीयाचा उपमा: द्लीयाचा उपमा हा नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान  आहे. दलिया हे गव्हाच्या पासून बनवले जाते. त्यामुळे हा उपमा पौस्टिक आहे. परत ह्यामध्ये गाजर, बीन्स व हिरवे ताजे मटार वापरले आहे. आपल्याला ह्यामध्ये शिमला मिर्च पण वापरता येते. द्लीयाचा शिरा व खीर सुद्धा फार छान लागते. दलिया चा उपमा बनवायला सोपा व लवकर होणारा आहे.

The English language version to the same Upma/Upit recipe and its preparation method can be seen here – Daliya Upma

बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप दलिया
१ टी स्पून तेल
१ मोठा कांदा (चिरून)
१ मध्यम आकाराचे गाजर
७-८ श्रावण घेवडा
१/४ कप हिरवे मटार
१ टी स्पून लिंबूरस
साखर व मीठ चवीने

फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
७-८ कडीपत्ता
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ टी स्पून हळद

Dalia Upma

Tasty Dalia Upma

कृती:
कढाई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दलिया घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन बाजूला ठेवा.
कढाईमध्ये तेल रम करून मोहरी, जिरे, कडीपत्ता, घालून चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून २ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये दलिया, मीठ व चार कप कोमट पाणी घालून मिक्स करून कढाईवर झाकण ठेवा. दलिया शिजल्यावर त्यामध्ये लिंबूरस, साखर घालून मिक्स करा.
दलिया उपमा सर्व्ह करतांना कोथंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा,

About Sujata Nerurkar (1897 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*