29 सप्टेंबर 2026 भरणी श्राद्ध, यमराजची कृपा मिळण्यासाठी करा हे काम, पितृ कृपा मिळण्यासाठी उपाय
Bharani Shraddha 2026: September 29 Rituals, Yamaraj’s Blessings & Powerful Pitru Remedies
पितृ पक्षमध्ये भरणी श्राद्धचे विशेष महत्व आहे. 29 सप्टेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी भरणी श्राद्ध आहे. ह्या दिवशी यमराजच्या कृपेने पितरांच्या आत्माला शांती मिळून गया श्राद्ध समान फळ प्राप्त होते. तसेच पितृ पक्ष मध्ये मुख्य दरवाजाशी जोडले गेलेले वास्तु उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.
हिंदू धर्मामध्ये पितृ पक्षमध्ये पितरांच्या श्राद्धसाठी अधिक महत्वपूर्ण मानले जाते. पितृ पक्षमध्ये बऱ्याच प्रकारची श्राद्ध केली जातात. त्यामधील एक आहे भरणी श्राद्ध, जे महत्वपूर्ण मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार भरणी नक्षत्रचे स्वामी यमराज आहेत, म्हणून ह्या नक्षत्रमध्ये पितरांचे श्राद्ध व तर्पण देणे खूप चांगले मानले जाते.
भरणी श्राद्ध 2026 कधी आहे?
सण 2026 महा भरणी श्राद्ध 29 सप्टेंबर, मंगळवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी भरणी नक्षत्र सकाळी 9 वाजून 03 मिनिट सुरू होत असून 30 सप्टेंबर सकाळी 7 वाजून 36 मिनिट पर्यन्त आहे. ह्या मध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकता व त्यांना तर्पण देवू शकता.
भरणी श्राद्ध महत्व काय आहे?
पितृ पक्षमध्ये अपराहन काळात भरणी नक्षत्र येते. तेव्हा भरणी श्राद्ध केले जाते. ह्यालाच महा भरणी श्राद्ध सुद्धा म्हंटले जाते. भरणी नक्षत्रचे स्वामी यमराज देव आहेत, म्हणून पितरांच्यासाठी ह्या दिवशी केलेले कर्म त्यांच्या आत्माला शांती देते.
गया श्राद्ध समान फळ मिळते: धार्मिक मान्यता अनुसार भरणी नक्षत्र मध्ये गया श्राद्ध गया मध्ये केलेले श्राद्ध समान मानले जाते. जर आपण आपल्या पितरांची श्राद्ध, पिंडदान, तर्पण करीत असाल तर त्याचे विशेष फळ प्राप्त होते.
कुतुप मुहूर्त मध्ये करा श्राद्ध:
ह्या दिवशी विधी पूर्वक श्राद्धसाठी कुलूप मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. 29 सप्टेंबर 2026 कुलूप मुहूर्त सकाळी 11 वाजून 47 मिनिट पासून 12 वाजून 35 मिनिट पर्यन्त आहे. आपल्याला सांगत आहोत की, हिंदू पंचांग अनुसार कुलूप मुहूर्तचा आठवा मुहूर्त असतो, व पितृ पक्षमध्ये श्राद्ध, तर्पण व पिंडदान करण्यासाठी सर्वात पवित्र वेळ मानली जाते.
पितृ पक्षमध्ये भरणी श्राद्ध एक महत्वपूर्ण दिवस आहे, आपण आपल्या पितरांचे तिथी नुसार श्राद्ध करू शकता व त्यांना तर्पण देवू शकता.
पितृ पक्ष मध्ये मुख्य दरवाजाशी जोडले गेलेले वास्तु उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.
पितृ पक्षमध्ये घरच्या मुख्य दरवाजाशी जोडले गेलेले वास्तु नियम पालन केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. मुख्य दरवाजाची सजावट व व्यावस्था सुख-समृद्धी आणते व त्यामुळे पितर प्रसन्न होतात. पितृ पक्षमध्ये सर्वजण आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांना घरात श्रद्धेने आमंत्रण देतात. त्याच बरोबर लोक ह्या काळात पितरांना तर्पण, श्राद्ध व पिंडदान करतात. पितृ पक्षमध्ये काही वास्तु नियम सांगितले आहेत त्याचे पालन झालेतर पितृ खुश होतात.
वास्तु अनुसार घराचा मुख्य दरवाजा महत्वाचा मानला जातो. त्याला घराच्या उर्जेचा प्रवेश प्रमुख मार्ग मानला जातो. म्हणून पितृ पक्ष मध्ये मुख्य दरवाजा साफ ठेवणे जरूरत मंद आहे.
1. मुख्य दरवाजा नीट साफ करून घ्या:
पितृ पक्षमध्ये मुख्य दरवाजा साफ करून घ्या, दरवाजा जवळ धूल, माती व घाण जमा नको. जर दरवाजा जवळ जाळी झाली असतील तर ती साफ करून घ्या. तसेच मुख्य दरवाजा जवळ जुने डब्बे, तुटलेले समान, कबाड, व बेकार वस्तु ठेवू नका, वास्तुचे प्रवेश दार साफ-सुतरे असणे शुभ मानले जाते.

2. बूट-चप्पल नीट व्यवस्थित ठेवा:
मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल, जुते नीट न ठेवल्यास घराची सुंदरता खराब होते. त्याच बरोबर बाहेरून आपले घर अव्यवस्थित दिसू शकते. म्हणूनच ते नीट ठेवावे. वास्तु अनुसार चप्पल-जुते दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे सर्वात चांगले मानले जाते.
3. तोरण व रांगोळीने सजवा:
पितृ पक्ष काही लोक शोक ची वेळ समजतात. पण ते एक पर्व सारखे मानले पाहिजे ह्या काळात आपले पितृ आपल्या बरोबर आपल्या घरात राहायला येतात. म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लाऊन रांगोळी काढावी. काहीजण आंब्याची किंवा अशोकाची पाने व झेंडूची फुले लावून तोरण लावतात. त्यामुळे प्रवेश दार सुंदर दिसते.
4. दरवाजाचा आवाज आला नाही पाहिजे:
पितृ पक्षमध्ये मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज नाही आला पाहिजे. जर असे होत असेलतर ते दुरुस्त करून घ्यावे किंवा तेल टाकावे. तसेच घरात शांतता ठेवावी ते पितरांना आवडते. .
5. मुख्य दरवाजावर संध्याकाळी दिवा लावावा:
संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा. त्यामुळे पितरांना घरात येताना अंधार जाणवत नाही व प्रवेश दार साफ दिसू लागते.
6. शुभ झाड आसपास लावावी:
पितृ पक्ष चालू असताना मुख्य दरवाजा जवळ तुळशी, अशोका व शमीचे झाड लावू शकता. ही झाडे शुभ मानली जातात.
