29 सप्टेंबर मंगळवार अंगारकी चतुर्थी व महाभरणी श्राद्ध का खास दिवस आहे?
Angarki Chaturthi & Maha Bharani Shraddha 2026 | 29 September | Chandrodaya Time, Puja & Vrat Parana
29 सप्टेंबर 2026 मंगळवार अंगारकी चतुर्थी व महाभरणी श्राद्ध दिवस आहे. चला तर मग पाहू या चतुर्थी तिथी, भरणी नक्षत्र, चंद्रोदय, व पूजा महत्व काय आहे.
हिंदू पंचांग नुसार 29 सप्टेंबर 2026 मंगळवार खूप खास दिवस आहे. ह्या दिवशी भगवान गणेशना समर्पित अंगारकी चतुर्थी व्रत ठेवायचे आहे. तर दुसरे म्हणजे पितृ पक्ष मधील विशेष महाभरणी श्राद्ध आहे. म्हणजे एकाच दिवशी गणपती पूजा व श्राद्ध तर्पण आहे. पण गणेश पूजा वेळ व श्राद्ध पूजा वेळ दोन्ही वेगवगळे आहे.
29 सप्टेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी अंगारकी चतुर्थी का आहे?
प्रतेक महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत ठेवले जाते. पण जेव्हा चतुर्थी मंगळवार ह्या दिवशी येते त्याला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. 29 सप्टेंबर ह्या दिवशी विघ्नराज संकष्टी सुद्धा आहे. म्हणून विघ्नराज संकष्टी, अंगारकी चतुर्थी ह्या रूपात साजरी करायची आहे.
पंचांग अनुसार चतुर्थी तिथी 29 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजून 09 मिनिट पासून सुरू होत असून 30 सप्टेंबर दुपारी 2 वाजून 55 मिनिटनी समाप्त होत आहे. संकष्टी चतुर्थी चंद्र दर्शन व अर्ध्य दिल्यावर व्रत सोडले जाते.
29 सप्टेंबर मंगळवार ह्या दिवशी महा भरणी आहे. पितृ पक्ष मध्ये जेव्हा भरणी नक्षत्र अपराहन काळात येते तेव्हा भरणी श्राद्ध केले जाते. त्यालाच महाभरणी श्राद्ध सुद्धा म्हंटले जाते.
भरणी श्राद्ध 29 सप्टेंबर सकाळी 9 वाजून 03 मिनिट सुरू होत असून 30 सप्टेंबर सकाळी 7 वाजून 36 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून पितृ पक्ष महाभरणी श्राद्ध 29 सप्टेंबर ला करायचे आहे.
भरणी नक्षत्रचा संबंध यमदेवशी आहे. म्हणून पितृ पक्षमध्ये ह्या नक्षत्रमध्ये पितरांचे श्राद्ध विशेष मानले जाते. महाभरणी च्या दिवशी तर्पण, पिंडदान, ब्राह्मण भोजन व जरूरतमंद लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करण्याची परंपरा आहे.
दोन्ही पूजा एकाच ठिकाणी केली पाहिजे का?
नाही, एकच तारीख आली म्हणून ह्याचा अर्थ हा नाही की दोन्ही कर्म एकाच वेळी करावी. महाभरणी श्राद्ध दिवसाच्या अपहारण काळात केले जाते तर संकष्टी गणेश पूजा संध्याकाळी चंद्र दर्शनच्या वेळी पूजा केली जाते.
29 सप्टेंबर ह्या दिवशी दिवसा पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते तर संध्याकाळी भगवान गणेश ह्यांची पूजा चंद्र दर्शन झाल्यावर केली जाते.

29 सप्टेंबर हा खास दिवस आहे ह्या दिवशी पितरांचे स्मरणशी जोडले गेलेले महाभरणी व विघ्नहर्ता गणेश ह्यांची अंगारकी चतुर्थी आहे. धार्मिक दृष्टीने हे दोन्ही वेगवेगळी परंपरा व महत्व आहे.
29 सप्टेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी अंगारकी विघ्नराज संकष्टी चतुर्थी आहे.
29 सप्टेंबर 2026 महाभरणी श्राद्ध सुद्धा आहे.
अंगारकी संकष्टी का व्रत कधी सोडायचे आहे?
संकष्टीचे व्रत रात्री चंद्र दर्शन झाल्यावर चंद्राला अर्घ्य दिल्यावर सोडायचे आहे.
अंगारकी चतुर्थी चंद्रोदय रात्री 8 वाजून 08 मिनिटांनी होणार आहे.
