Pitru Paksha 2026: What to Do & What NOT to Do? Shraddha, Tarpan & Daan Rules

Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026: What to Do & What NOT to Do? Shraddha, Tarpan & Daan Rules

Pitru Paksha 2026: What to Do & What NOT to Do? Shraddha, Tarpan & Daan Rules

पितृपक्ष श्राद्ध, तर्पण, दान, काय करावे व काय करू नये, मंत्र व महत्वाचे नियम कोणते?

26 सप्टेंबर 2026 शनिवार पासून पितृपक्ष सुरुवात होत असून 10 ऑक्टोबर 2026 शनिवार रोजी समाप्त होत आहे. आपण माहिती करून घेणार आहोत की ह्या 15 दिवसांत तर्पण व श्राद्ध चे कोणते नियम आहेत, काय करावे? काय करू नये? कोणत्या चुका करू नयेत व काय खावे ह्याचे नियम कोणते आहेत.

हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष खूप खास मानले जातात, आता 26 सप्टेंबर 2026 शनिवार ह्या दिवसा पासून पितृपक्ष सुरू होत आहे. असे म्हणतात की ह्या दिवसांमध्ये आपले पूर्वज धर्तीवर येतात व आपल्या परिवाराच्या भेटीसाठी येतात. आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी व त्यांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी ह्या दिवसांमध्ये त्यांना तर्पण व पिंडदान करण्याची पद्धत आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्राद्ध कर्म कधी पूर्ण होते जेव्हा नीट नियम पाळून श्रद्धा पूर्वक श्राद्ध केले जाते. आता आपण ह्याची सर्व माहिती पाहू या ह्या 15 दिवसांत कोण कोणत्या नियम लक्षात घेतले पाहिजेत.

श्राद्धमध्ये काय खावे-प्यावे व कोणती परंपरा आहे?
पितृपक्षमध्ये भोजन शुद्धताचे खूप महत्व आहे. ह्या 15 दिवसांत घरात सात्विक भोजन बनवले पाहिजे. डाल-चावल, हिरव्या भाज्या, साधे जेवण उत्तम मानले जाते. मांस-मदिरा व मसालेदार भोजन पासून लांब रहा. श्राद्धच्या जेवणात दूध, तूप, मध, जवस व तीळ जरूर वापरले पाहिजेत. जो कोणी श्राद्धचे जेवण बनवणार आहे त्यांनी प्रथम स्नान घेऊन साफ कपडे परिधान करून मगच किचनमध्ये आले पाहिजे.

भारतमध्ये प्रतेक परिवारात वेगवेगळी परंपरा असते, जसेकी बंगाल,आसाम व दक्षिण भारत मध्ये श्राद्धचे जेवणमध्ये पितरांचे आवडतीचे पदार्थ बनवतात, म्हणजे मांसाहार किंवा मासे बनवण्याची परंपरा आहे. म्हणजे ते जीवंत असताना जे पदार्थ आवडीने खात होते तेच पदार्थ श्राद्धच्या वेळी बनवले जातात.

श्राद्ध करण्याची योग्य वेळ व जागा:
तर्पण व श्राद्ध नेहमी दुपारच्या वेळी करणे योग्य आहे. हे कर्म कधी सुद्धा सूर्यास्तच्या वेळी करू नये. पूजा करताना आपले मुख नेहमी दक्षिण दिशाला पाहिजे. कारणकी दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा श्राद्ध नेहमी आपल्या जमिनीवर, कोणत्या देवळात किंवा पवित्र नदी काठी करतात. कोणत्या दुसऱ्याच्या घरी श्राद्ध कर्म करणे बरोबर नाही. तर्पण करण्याच्या वेळी काळे तीळ व कुक्षा (एक पवित्र गवत) वापरने जरुरीचे आहे.

ब्राह्मण भोजन व पंचबलीचे महत्व काय आहे?
श्राद्धच्या दिवशी 2 ब्राह्मणना घरी बोलावून सन्मान पूर्वक सात्विक भोजन द्या. मग त्यांना दान-धर्म करून (कपडे-अनाज) देवून मगच विदा करा. कारणकी बिना दान श्राद्ध पूर्ण होत नाही. त्याच बरोबर भोजन मधील एक हिस्सा जेवतान, गाय, कुत्रा, कावळा व मुंग्याना जरूर द्या. ह्यालाच पंचबली म्हणतात. जो पितरान पर्यन्त जेवण पोचवण्याचे साधन मानले जाते.

वास्तुशी जोडल्या गेलेल्या गोष्टी:
आपल्या कडील काही लोक श्राद्धमध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो मंदिर, बेडरूम किंवा घरात मधोमध लावतात. जे वास्तु शास्त्र नुसार चुकीचे आहे. पूर्वजांचे फोटो घरातील दक्षिण किंवा दक्षिण- पश्चिम च्या भिंतीवर लावले पाहिजे. त्याच बरोबर ह्या 16 दिवसांमध्ये संध्याकाळी आपल्या घरच्या मुख्य दरवाजा जवळ वात असलेला मोहरीच्या तेलाचा दिवा जरूर लावावा.
पितृपक्ष मध्ये पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण, तर्पण, व पिंडदान केले पाहिजे. तसेच कोणते सुद्धा मंगलकार्य किंवा मसालेदार भोजन टाळले पाहिजे.

पितृपक्षमध्ये काय करावे?
तर्पण व पिंडदान: दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यात काळे तीळ, जवस व कुश मिक्स करून आपल्या पितरांना तर्पण द्या.
पंचबली भोग: जेवणातील काही भाग गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या व अतिथि किंवा ब्राह्मण ह्यांना आवश्य द्या.
दान-पुण्य: आपल्या क्षमता अनुसार गरीब व जरूरतमंद लोकांना अन्न, वस्त्र व धान्य दान करा.
सात्विक जीवन: घरातील साफ-सफाईचे विशेष ध्यान ठेवा. त्याच बरोबर सात्विक आचरण व भोजन ठेवा.

Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026: What to Do & What NOT to Do? Shraddha, Tarpan & Daan Rules

पितृपक्षमध्ये काय करू नये किंवा काय केले नाही पाहिजे
मंगलकार्य: पितृपक्ष मध्ये 16 दिवस विवाह, साखरपुडा, गृह प्रवेश किंवा कोणते सुद्धा शुभ कार्य करू नये.
तामसिक भोजन: लसूण, कांदा, मांस, मदिरा किंवा अंडी बिलकुल सेवन करू नये.
केस किंवा दाढी कापू नये: धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवसांत केस, दाढी करू नये. नख कापू नयेत.
नवीन वस्तु खरेदी करणे: नवीन कपडे, चप्पल, बूट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा वाहन खरेदी करू नये.
क्रोध व कलह: घरात वाद-विवाद, गुस्सा, कोणाचा अपमान करू नये व घरात शांत वातावरण ठेवावे.

पितृपक्ष मध्ये पूजा करताना पुढे दिलेल्या मंत्रा पैकी कोणता सुद्धा मंत्र जाप करावा.
1. ॐ पितृ देवतायै नम:
2. ॐ पितृ गणाय विद्महे जगतधारिणे धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात्।
3. ॐ महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नः शिवः प्रचोदयात्॥

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.