Bhadrapada Purnima 2026: Date, Shubh Muhurat, Moonrise Time, Puja Vidhi & 4 Powerful Remedies

Bhadrapada Purnima 2026
Bhadrapada Purnima 2026: Date, Shubh Muhurat, Moonrise Time, Puja Vidhi & 4 Powerful Remedies

भाद्रपद पूर्णिमा 2026 कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्व व सटीक उपाय

Bhadrapada Purnima 2026: Date, Shubh Muhurat, Moonrise Time, Puja Vidhi & 4 Powerful Remedies

हिंदू धर्मामध्ये भाद्रपद पूर्णिमा ही तिथी विशेष महत्वाची मानली जाते. भाद्रपद पूर्णिमा 2026 मध्ये सप्टेंबर महिन्यात येत आहे. ह्या दिवशी स्नान, दान व पूजा-पाठ करणे विशेष महत्वाचे मानले जाते. आता आपण पाहू या भाद्रपद पूर्णिमा तिथी तारीख, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्व व सटीक उपाय कोणते आहेत.

आपल्याला माहीत आहेच हिंदू धर्मामध्ये भाद्रपद पूर्णिमा ह्या तिथीला विशेष महत्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष ह्या दिवशी पूर्णिमा येते त्याला भाद्रपद पूर्णिमा असे म्हणतात. धर्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान विष्णु, माता लक्ष्मी व चंद्र देव ह्यांची पूजा अर्चा करतात. व स्नान, दान, व व्रत केल्याने शुभ फळ प्राप्त होतात. ह्या दिवशी सत्यनारायण पूजा सुद्धा करतात त्याचे खूप महत्व आहे. ह्या वर्षी भाद्रपद पूर्णिमा सप्टेंबर ह्या महिन्यात येत आहे व लगेच दुसऱ्या दिवशी पासून पितृ पक्ष सुरुवात होत आहे.

भाद्रपद पूर्णिमा 2026 कधी आहे?
हिंदू पंचांग अनुसार भाद्रपद महिना शुक्ल पक्षची पूर्णिमा 26 सप्टेंबर 2026 शनिवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु, माता लक्ष्मी व चंद्र देव ह्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. पूर्णिमाच्या दिवशी स्नान, दान व धार्मिक अनुष्ठान करणे शुभ मानले जाते. भाद्रपद पूर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी पासून लगेच पितृ पक्ष सुरुवात होत आहे. म्हणून ह्या दिवसाचे धार्मिक महत्व वाढते.

भाद्रपद पूर्णिमा 2026 तिथि व वेळ:
पूर्णिमा तिथि सुरुवात: 25 सप्टेंबर 2026 रात्री 11:06 मिनिट
पूर्णिमा तिथि समाप्त: 26 सप्टेंबर 2026, रात्री 10:18 मिनिट
चंद्रोदय: 26 सप्टेंबर 2026, संध्याकाळी 5:25 मिनिट
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:36 मिनिट ते 05:24 मिनिट पर्यन्त
सूर्योदय: सकाळी 06:11 मिनिट
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:48 मिनिट ते दुपारी 12:36 मिनिट पर्यन्त
सत्यनारायण पूजा शुभ सकाळी: सकाळी 07:42 मिनिट ते 09:12 मिनिट पर्यन्त
सूर्यास्त: संध्याकाळी 06:13 मिनिट पर्यन्त

भाद्रपद पूर्णिमा धार्मिक महत्व:
भाद्रपद पूर्णिमाच्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा बरोबर चंद्र देव ह्यांना अर्ध्य देण्याची परंपरा आहे. काही श्रद्धालु ह्या दिवशी सत्यनारायण भगवान ची पूजा करतात व कथा आईकतात. धार्मिक मान्यता अनुसार, श्रद्धा बरोबर पूजा-पाठ व दान केल्याने सुख-शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. ह्या दिवशी पितरांचे स्मरण व तर्पण करण्याची परंपरा आहे. करणकी भाद्रपद पूर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी लगेच पितृ पक्ष आरंभ होते आहे. पवित्र नदीमध्ये स्नान व जरूरतमंद लोकांना दान करणे हे धार्मिक कार्य मानले जाते.

पूर्णिमा ह्या दिवशी चंद्राला अर्ध्य का द्यावे ते शुभ आहे का?
धार्मिक मान्यता अनुसार व ज्योतिषीय मान्यता अनुसार चंद्रमा ला मन व भावना ह्याचा संबंध आहे असे का मानले जाते. पूर्णिमा व चंद हे पूर्ण स्वरूप मानले जाते. म्हणून ह्या दिवशी चंद्र देवची पूजा व अर्ध्य देण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की चंद्रमाला अर्ध्य अर्पित कल्याने मनाला शांतता मिळते व सकारात्मक भावनामध्ये वाढ होते. श्रद्धालु आपल्या परिवारासाठी सुख-शांतीसाठी प्रार्थना करतात.

भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी चंद्र देवाला अर्ध्य कसे दिले जाते?
चंद्र देवाला चंद्रोदय झाल्यावर अर्ध्य देण्याची परंपरा आहे. त्यासाठी संध्याकाळी स्नान करून साफ कपडे परिधान करा.
मग भगवान विष्णु, माता लक्ष्मी व चंद्र देवाचे स्मरण करा.
एक तांब्याचे किंवा चांदीचे पात्र घेऊन त्यामध्ये साफ जल घ्या मग त्यामध्ये अक्षता व फूल घाला.
चंद्रोदय झाल्यावर चंद्राच्या बाजूनी मुख करून श्रद्धा पूर्वक जल अर्पित करा. व सुख-शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करा.
धार्मिक मान्यता अनुसार पूजा करताना मन शांत ठेवणे व श्रद्धा पूर्वक प्रार्थना करण्याचे विशेष महत्वाचे मानले जाते.

Bhadrapada Purnima 2026
Bhadrapada Purnima 2026: Date, Shubh Muhurat, Moonrise Time, Puja Vidhi & 4 Powerful Remedies

भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी स्नान व दान:
भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करणे शुभ मानले जाते. जर ह्या वेळी स्नान करणे शक्य नसेलटर सूर्योदयच्या वेळी स्नान केले तरी चालेल. स्नान केल्या नंतर देवाचे स्मरण व पूजा करा. मग आपल्या आयपती नुसार दान धर्म केल्याने पुण्य मिळते. ह्या दिवशी अन्न, फळ, वस्त्र व जरूरतमंद लोकांना दान व वस्तु देणे शुभ मानले जाते. भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी स्नान झाल्यावर पितरांना तर्पण देण्याची परंपरा आहे.

भाद्रपद पूर्णिमा सोपे सटीक उपाय:
1. भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी रात्री चंद्राचे दर्शन घेऊन दुधामध्ये पाणी मिक्स करून चंद्राला अर्ध्य द्या. त्यामुळे मन शांत व सकारात्मकता वाढेल.
2. भाद्रपद पूर्णिमाच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लाऊन लक्ष्मीमाताची विधी पूर्वक पूजा करून तुपाचा दिवा लावावा. त्याच बरोबर कमळ फूल व मिठाई अर्पित करा. त्यामुळे धन वृद्धी होते.
3. भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी तांदूळ, दूध, पांढरे कपडे व अन्न दान करा असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
4. भाद्रपद पूर्णिमा ह्या दिवशी पितरांचे श्राद्ध करावे व तर्पण द्यावे असे केल्याने पितृ प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.