Anant Chaturdashi 2026: Do This Ganpati Puja Before Visarjan | Remove All Obstacles & Sorrows

Anant Chaturdashi 2026
Anant Chaturdashi 2026: Do This Ganpati Puja Before Visarjan | Remove All Obstacles & Sorrows

अनंत चतुर्दशीवर विसर्जन पूर्वी बाप्पाची पूजा केल्याने सारे कष्ट व दुख विघ्नहर्ता सोबत घेऊन जातील

Anant Chaturdashi 2026: Do This Ganpati Puja Before Visarjan | Remove All Obstacles & Sorrows

अनंत चतुर्दशीचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. ह्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होते. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याच्या अगोदर विधीपूर्वक पूजा करूनच मग विसर्जन केल्याने आपली सारे विघ्न दूर होतात.

धार्मिक मान्यता अनुसार, विसर्जन करण्याच्या अगोदर बाप्पाची पूजा अर्चा केल्याने सर्व विघ्न दूर होतात व कामातील येणाऱ्या अडचणी दूर होतात. आपण सुद्धा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान केले आहेत तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्याच्या अगोदर गणेश भगवान ह्यांची पूजा जरूर करावी. आपण पुढे गणेश पूजा कशी करायची ते पाहू या, अश्या प्रकारे पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात व भक्ताच्या जीवनाला शुभ आशीर्वाद मिळतात.

विसर्वजन पूर्वी पूजा कशी करावी?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्याच्या अगोदर साफ कपडे परिधान करा, पूजाच्या जागी गंगा जल शिंपडा व जागा शुद्ध करा.
भगवान गणेश ह्यांची पूजा करण्याच्या अगोदर तुपाचा दिवा तयार करा.
भगवान गणेश ह्यांना हळद-कुंकू, अक्षता, चंदनचा तिलक लावावा.
21 दूर्वाची जुडी अर्पित करा.
गणेश विसर्जनच्या वेळी लाल किंवा पिवळे कापड घेऊन त्यामध्ये नारळ, गूळ, तांदूळ (अक्षता) , मोदक, व कॉईन बांधून मूर्तीच्या जवळ ठेवावे.
मग गणेश भगवान ह्यांची विधी पूर्वक आरती करा.
भगवान गणेश चालीसाचे वाचन करून मंत्र जाप करा.
भगवान गणेश ह्यांच्या जवळ सुख-शांतीच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करा व पूजा करताना काही चूक झाली असेलतर क्षमा मागा.
मग भगवान गणेश ह्यांचा जयजयकार करून मगच विसर्जन करा.

अनंत चतुर्दशी 2026 शुभ मुहूर्त:
भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथी सुरुवात: 24 सप्टेंबर 2026 शुक्रवार रात्री 11 वाजून 18 मिनिट
भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथि समाप्त: 25 सप्टेंबर 2026 शनिवार रात्री 11 वाजून 08 मिनिट
वैदिक पंचांग अनुसार, 25 सप्टेंबर 2026 शुक्रवार ह्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. ह्या दिवशी श्री गणेश ह्यांचे विसर्जन करायचे आहे.
अनंत चतुर्दशी पूजा मुहूर्त: सकाळी 6 वाजून 11 मिनिट पासून रात्री 11 वाजून 06 मिनिट पर्यन्त आहे.

अनंत चतुर्दशी विसर्जन

गणेश विसर्जनसाठी शुभ चौघड़िया मुहूर्त:
प्रातः मुहूर्त (लाभ, अमृत): सकाळी 06 वाजून 21 मिनिट ते सकाळी 10 वाजून 21 मिनिट ते 10 वाजून 52 मिनिट पर्यन्त
अपराह्न मुहूर्त (शुभ): दुपारी 12 वाजून 23 मिनिट ते 01 वाजून 53 मिनिट पर्यन्त
संध्याकाळी मुहूर्त (चर)- शामसंध्याकाळी 04 वाजून 54 मिनिट ते 06 वाजून 25 मिनिट पर्यन्त
रात्रि मुहूर्त (लाभ)- रात्री 09 वाजून 24 मिनिट ते 10 वाजून 53 मिनिट पर्यन्त
रात्रि मुहूर्त (शुभ, अमृत, चर)- रात्री 12 वाजून 23 मिनिट ते 4 वाजून 52 मिनिट पर्यंत (म्हणजेच 26 सप्टेंबर)

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.