Shravan Friday Jivti Puja 2026 | How to Worship Jivti Mata & Bless Children

Shravan Friday Jivti Puja 2026
Shravan Friday Jivti Puja 2026

श्रावण शुक्रवार जिवती पूजा कशी करायची, मुलांना कसे ओवाळावे? मुले बाहेरगावी आहेत काय करावे?

Shravan Friday Jivti Puja 2026 | How to Worship Jivti Mata & Bless Children

आता श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 गुरुवार ह्या दिवसा पासून सुरू होत आहे. श्रावण महिना चालू झाला की पहिल्या शुक्रवारी किंवा बुधवारी आपल्या घरातील देवघरा जवळ जीवतीचा कागद लावतात व प्रतेक शुक्रवारी त्याची श्रद्धेने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी त्याचे सर्व मंगल व्हावे म्हणून पूजा करतात. आपल्याला बाजारात जीवतीचा कागद अगदी सहज उललब्ध होतो.

आता श्रावण 13 ऑगस्ट 2026 गुरुवार पासून सुरू होत आहे पहिला शुक्रवार लगेच 14 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. मग शुक्रवारी सकाळी लकवर उठून घर साफ करून अंगणात सडा-रांगोळी काढून देवाची पूजा करून मग देवघरा जवळ जीवतीचा फोटो किंवा कागद चिटकवावा. मग फोटोला हळद-कुंकू अक्षता, फुले अर्पित करावी कापसाची माळ अर्पित करावी. मग दूर्वा व आघडाची माळ बनवून फोटो ला घालावी. गणपती बापाची स्थापना करून पूजा करावी. पान-सुपारी ठेवावे, गूळ-खोबरे व एखादा गोड पदार्थ ठेवावा. फळे ठेवावीत. मग तुपाचा दिवा, समई व आगरबती लावावी. जीवतीची कहाणी आईकवी व जीवतीची आरती म्हणावी.

मग संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी जिवती समोर दिवा, आगरबत्ती लावावी. आपल्या मुलांच्या औक्षणासाठी एक ताट तयार करावे, त्यामध्ये हळद-कुंकू अक्षता घ्याव्या अक्षता कधी सुद्धा नुसत्या पांढऱ्या घेवू नये त्याला हळद-कुंकू लाऊन रंगीत कराव्या, एक दिवा घ्यावा दिव्यामध्ये तेल घालून दोन वातीची एक वात बनवून ठेवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा तुपाचा घ्यायचा नाही कारणकी तुपाचा दिवा आपण देवा जवळ लावतो. एक सुपारी व सोन्याची अंगठी घ्यावी एखादा गोड पदार्थ घ्यावा.

Shravan Friday Jivti Puja 2026
Shravan Friday Jivti Puja 2026

संध्याकाळी पूर्व-पश्चिम दिशेला पाट ठेवून भोवती छान रांगोळी काढून त्यावर मुलाला बसवावे डोक्यावर रुमाल ठेवावा. मुलांना हळद-कुंकू, अक्षता लावाव्या, मग सुपारी व सोन्याच्या अंगठी कपाळाला लावावी, मग अगदी मानपासून क्लॉक वाईज 5 वेळा ओवाळावे व ओवाळताना जिवती मातेला प्रार्थना करावी माझ्या मुलाचे रक्षण कर, त्याच सर्व मंगल होऊ दे त्याला दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यावर कोणते सुद्धा संकट येवू नको दे. मग गोड पदार्थ खायला द्यावा.

जर आपली मुले शिक्षणासाठी किंवा काही कामा निमित्याने बाहेर गावी असतील तर संध्याकाळी जिवती समोर दिवा लावून झाल्यावर आरतीच्या ताट चारही दिशेला फिरवत आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी.

मग शनिवारी जीवतीची पूजा उचलून फुले विसर्जित करून जीवतीचा कागद देव्हाऱ्यात तसाच ठेवावा मग श्रावण महिन्यात जेव्हडे शुक्रवार येतात तेव्हा अश्या पद्धतीने पूजा करावी. शेवटच्या शुक्रवारी पुरणाचा नेवेद्य दाखवावा व शनिवारी पूजा विसर्जित करावी.

पहिला शुक्रवार 14 ऑगस्ट 2026
दूसरा शुक्रवार 21 ऑगस्ट 2026
तिसरा शुकवार 27 ऑगस्ट 2026
चौथा शुक्रवार 04 सप्टेंबर 2026
पाचवा शुक्रवार 11 सप्टेंबर 2026

श्रीजिवतीची आरती:
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥

श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥

पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥

सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.