Nirjala Ekadashi 2026 | Donate This One Thing For Wealth & Prosperity | Vishnu Blessings
भाग्य बदलायचे आहे, निर्जला एकादशी एक वस्तु दान करा, गोल्डन टाइम चालू होईल
निर्जला एकादशी 25 जून 2026 गुरुवारी आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा करण्याचे जेव्हडे महत्व आहे तेव्ह्डेच महत्व दान धर्म करण्याला आहे. ह्या दिवशी जल, फळ, सौभाग्य साहित्य व चप्पल-बूट दान केल्याने सुख-समृद्धी व आर्थिक उन्नती प्राप्त होते.
सर्व एकादशी तिथीमध्ये निर्जला एकादशी ही सर्वात कठीण व महत्वपूर्ण मानली जाते. हे व्रत जेष्ठ मास मध्ये शुक्ल पक्ष एकादशी तिथीला केले जाते. वैदिक पंचांग अनुसार, ह्या वर्षी निर्जला एकादशी व्रत 25 जुन 2026 गुरुवार ह्या दिवशी करायचे आहे.
धार्मिक मान्यता अनुसार, ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची आराधना व व्रत केल्याने सर्व पापा पासून मुक्ती मिलते व जीवनात सुख-समृद्धी कायम राहते.
ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष एकादशी तिथि प्रारंभ: 24 जून संध्याकाळी 06:12 मिनट
ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष एकादशी तिथि का समाप्त: 25 जून रात्री 08:09 मिनट
व्रत पारण वेळ:26 जून सकाळी 05:25 मिनिट पासून 08:12 मिनिट पर्यन्त
निर्जला एकादशी ह्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे. दान केल्याने भगवान विष्णु व माता लक्ष्मी प्रसन्न होते व दारिद्रीयचा नाश होऊन घरात सुख समृद्धीचे आगमन होते. आपल्याला सुद्धा आपले जीवन आनंदी पाहिजे असेलतर निर्जला एकादशीच्या दिवशी पुढे दिलेल्या वस्तुचे दान जरूर करा. त्यामुळे जीवनात आर्थिक उन्नती व शुभ फळ प्राप्त होईल.
1. जल: निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी भरलेला घडा दान करणे म्हणजे महादान मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार, ह्या दिवशी पाणी भरलेला घडा मंदिरमध्ये किंवा गरीब लिकांना दान केल्याने धनाचे मार्ग उघडे होऊन जीवनात सुख-समृद्धी व शांती राहते. त्याच बरोबर जीवनात कशाची सुद्धा कमतरता होत नाही.
2. फळांचे दान: आपल्याला जर शुभ फळाची प्राप्ती पाहिने असेलतर, निर्जला एकादशी च्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा केल्यावर फळ दान करा. धार्मिक मान्यता अनुसार निर्जला एकादशीच्या दिवशी फळ दान केल्याने अडकलेले पैसे परत मिळू शकतात व भगवान विष्णुह्यांची कृपा प्राप्त होते.
3. सौभाग्य अलंकार व पिवळे वस्त्र दान: आपल्याला जर आपले विवाहिक जीवन सुखी पाहिजे असेलतर विवाहित महिलांना सौभाग्य अलंकार दान करावे. त्याच बरोबर पिवळे वस्त्र, चनाडाळ व हळद पण दान करू शकता. असे म्हणतात की ह्या वस्तु दान केल्याने आर्थिक तंगीच्या समस्या दूर होऊन वैवाहिक जीवन सुखी होते.

4. बूट किंवा चप्पल दान: जीवनात येणाऱ्या कष्टा पासून मुक्ती पाहिजे असेलतर निर्जला एकादशीच्या दिवशी बूट चप्पल दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे भक्ताच्या जीवनात सुख-शांतीचे आगमन होऊन बिघडलेली कामे पार पडतात. त्याच बरोबर व्यवसायात सफलता प्राप्त होते.
हिंदू धर्मामध्ये मुंडन संस्कार (जावळ) काढण्याचे महत्व:
हिंदू सनातन संस्कृतिमध्ये 16 संस्कारचे विशेष महत्व आहे. त्यामधील एक संस्कार म्हणजे मुंडन संस्कार (जावळ काढणे) अत्यंत महत्व पूर्ण मानले जाते. शास्त्रा नुसार गर्भ चे केस काढणे म्हणजे बाळाचे मागील जन्माच्या कर्मा पासून बाळाला मुक्ती मिळून बाळाची बौद्धिक, मानसिक व शारीरक विकास तीव्र गतीने होतो. कारण की हा संस्कार बाळाच्या स्वास्थ व बुद्धीशी जोडला गेलेल्या आहे. म्हणून मुंडन संस्कार शुभ मुहूर्तवर करणे अनिवार्य आहे.
धार्मिक मान्यता अनुसार निर्जला एकादशी हा दिवस मुंडन संस्कार (जावळ) अत्यंत शुभ दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी या तिथी मुंडन कार्यासाठी अत्यंत शुभ असतात.
