Nirjala Ekadashi 2026 | 25 June Rare Auspicious Yog | Puja Vidhi, Vrat Rules & Parana Time
निर्जला एकादशी 2026 | 25 जूनला बनतोय दुर्लभ योग | पूजा, व्रत, पारण वेळ व खास उपाय
25 जून 2026 गुरुवार ह्या दिवशी निर्जला एकादशी आहे. ह्या दिवशी रवि, शिव, सिद्ध व गुरुवार हा दुर्लभ संयोग बनत आहे.
एका वर्षात 24 एकादशी येतात पण त्यामध्ये निर्जला एकादशीही सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते. भगवान विष्णु ह्यांना समर्पित असणारी एकादशी, ह्या दिवशी व्रत केल्यास अपार पुण्य प्राप्त होते. म्हणूनच ह्या दिवशी लाखों विष्णु भक्त श्रद्धा पूर्वक पूजा अर्चा करतात.
25 जून 2026 गुरुवार ह्या दिवशी निर्जला एकादशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी चार शुभ योग येत असून दुर्लभ संयोग बनत आहे. त्यामुळे हा दिवस पूजा, जप, पट, दान व धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी खास मानला आहे.
निर्जला एकादशी 2026 तारीख व वेळ:
हिंदू पंचांग अनुसार जेष्ठ महिन्यातील शुल्क पक्ष मध्ये येणारी एकादशी तिथी 24 जून 2026 बुधवार रात्री 8:09 मिनिट पासून आरंभ होत असून 25 जून 2026 गुरुवार ह्या दिवशी रात्री 9:14 मिनिटांनी समाप्ती होत आहे.
एकादशी तिथी 25 जून सूर्योदयच्या वेळेस मानली आहे. म्हणून 25 जून 2026 गुरुवार ह्या दिवशी निर्जला एकादशी व्रत करायचे आहे.
निर्जला एकादशी 4 शुभ योग:
निर्जला एकादशीच्या दिवशी 4 अत्यंत पवित्र व दुर्लभ संयोग बनले आहेत. म्हणून ह्या दिवशी पूजा, अर्चा, प्रार्थना व दान-पुण्य करणे खास मानले आहे. चार महत्वपूर्ण संयोग पुढे दिलेले आहेत.
रवि योग
शिव योग
सिद्ध योग
गुरुवार चा दिवस
ह्या चार योग मध्ये धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी सर्वात शुभ मानले आहेत.
निर्जला एकादशीच्या दिवशी भद्राकाल वेळ:
ह्या वर्षी निर्जला एकादशीच्या दिवशी भद्राची सावली पाहायला मिळणार आहे. पंचांग नुसार भद्रा नक्षत्र 25 जून 2026 गुरुवारी सकाळी 7:08 मिनिट ह्या वेळी आहे. ज्योतिष शास्त्रा नुसार भद्रा नक्षत्र पाताळ लोकात स्थित आहे. म्हणूनच त्यामुळे व्रत पूजा संबंधित कोणते सुद्धा अनुष्ठान किंवा बाधा राहणार नाही. म्हणजेच पूजा, अनुष्ठान किंवा दानधर्म करताना कोणती सुद्धा अडचण राहणार नाही.
निर्जला एकादशी उपासना करण्यासाठी शुभ वेळ:
जे विष्णु भक्त आहेत ते निर्जला एकादशी च्या दिवशी खास पूजा अर्चा करण्याचा विचार करीत आहेत त्यांनी पुढे दिलेल्या शुभ मुहूर्तवर पूजा करावी.
पहिला शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त- सकाळी 4:05 मिनिट ते सकाळी 4:45 मिनिट पर्यन्त
ही वेळ ध्यान, मंत्र जाप व आध्यात्मिक अभ्याससाठी सर्वात पवित्र शुभ मुहूर्त मानला आहे.

दूसरा शुभ मुहूर्त:
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:56 मिनिट ते 12:52 मिनिट
हे दोन्ही मुहूर्त धार्मिक विधी व प्रार्थनासाठी खूप शुभ मानले गेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण दिवस रवि योग मध्ये आध्यात्मिक अभ्यास करण्यासाठी महत्व पूर्ण आहे.
निर्जला एकादशी पारण वेळ?
निर्जला एकादशीचे व्रत ज्यांनी ठेवले आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जून 2026 शुक्रवार ह्या दिवशी व्रताचे पारण करायचे आहे.
पारण करण्यासाठी शुभ वेळ सकाळी 5:25 मिनिट ते 8:13 मिनिट पर्यन्त आहे.
धार्मिक परंपरा नुसार पारण सकाळी 8:13 च्या व्रत सोडणे शुभ मानले जाते.
निर्जला एकादशी का जरूरी?
भगवान विष्णु ह्यांना समर्पित निर्जला एकादशी अत्यंत श्रद्धा पूर्वक मानली जाते. निर्जला एकादशीचे व्रत बिना अन्न व पाणी ठेवले जाते. म्हणूनच ह्याला निर्जला एकादशी व्रत असे म्हणतात म्हणजेच बिना पाणी व्रत ठेवणे.
