अधिक मास 33 देव व 33 वस्तु का व कोणत्या दान (लिस्ट) कराव्या, सर्व मनोकामना पूर्ण होतील
पुरुषोत्तम मास 2026 | 33 वस्तू लिस्ट | दान करण्याचे गुप्त महत्व | मिळेल अक्षय पुण्य व विष्णू कृपा
Adhik Maas 2026: Donate These 33 Things for Wealth, Prosperity & Vishnu Blessings
अधिक मास अत्यंत पवित्र महिना आहे, त्याच बरोबर ह्या महिन्यात मंगल कार्य करणे निषेध आहे. पण ईश्वर आराधना करण्यासाठी व दान पुण्यसाठी अत्यंत शुभ मानला जातो. नावावरूनच स्पष्ट होते की ह्या महिन्यात दान केल्याने अधिक पुण्य मिळते.
अधिक मास लाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा धोंडयाचा महिना असे म्हणतात. हा महिना भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. अधिक मास 17 मे 2026 रविवार ह्या दिवशी सुरू होत असून 15 जून 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. अधिक मास ज्येष्ठ महिन्यात लागत आहे त्यामुळे त्याला ‘ज्येष्ठ अधिक मास’असे म्हणतात. ह्या वर्षी ज्येष्ठ 30 दिवसांचा नाहीतर 60 दिवसांचा आहे. आपल्याला माहीत असेलच जेव्ह अधिक मास येतो तेव्हा त्या वर्षात अजून एक महिना जोडला जातो. अधिक मास दर 3 वर्षानी येतो.
अधिक मास मध्ये दान-पुण्य करणे विशेष महत्वाचे मानले जाते. शास्त्रा नुसार अधिक मास मध्ये दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. त्यांच बरोबर पापांचा नाश होतो व अडकलेली कामे पूर्ण होतात व आर्थिक उन्नती सुद्धा होते. ज्योतिष शास्त्रा नुसार अधिक मास मध्ये काही खास वस्तु दान करणे खूप फलदायी आहे. चला तर मग पाहू या त्या कोणत्या वस्तु आहेत.
अधिक मास मध्ये 33 वस्तुच का दान कराव्या? त्याचे नियम काय आहेत व कोणत्या वस्तु दान कराव्या.
अधिक मासचे 33 देवता मानले आहेत. विष्णु, महाविष्णु, हरि, कृष्ण, अधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविन्द, वामन, श्रीश, श्रीकान्त, विश्वाक्षी, नारायण, मधुरिपु, अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव, प्रधुम्न, दैत्यारि, विश्वोमुख, जनार्दन, पद्मनाभ, दामोदर, श्रीपते, श्रीधर, गरुडध्वज, ऋषिकेश ह्या 33 देवतांना प्रसन्न करण्यासाठी 33 वस्तु दान करणे आवश्यक आहे.
कृष्ण पक्षमध्ये कोणते दान करावे:
(1) तुपाचा चांदीचा दिवा (2) सोन्याचे किंवा तांब्याचे पात्र (3) कच्चे चने (4) खारीक (5) गूळ, तुरडाळ (6) लाल चंदन (7) गोड रंग (8) कपुर,केवडा अगरबत्ती (9) केसर (10) कस्तूरी (11) गोरेचन (12) शंख (13) गरूड़ घंटी (14) मोती किंवा मोतीची माळ (15) हीरा किंवा पन्ना एक नग
शुक्ल पक्ष मध्ये कोणते दान करावे:
(1) माल पुआ (2) खीर भरून वाटी (3) दही (4) सूती वस्त्र (5) रेशमी वस्त्र (6) ऊनी वस्त्र (7) तूप (8) तीळ-गूळ (9) तांदूळ (10) गेहूं (11) दूध (12) कच्ची खिचड़ी (13 ) साखर किंवा मध (14) तांब्याचे भांडे (15) चांदीचे भांडे (16) जल म्हणजेच पाणी (17) फळे किंवा भाज्या (18) अन्नदान

आपण दान करण्याच्या वस्तुची लिस्ट पाहिली त्यानुसार दान केलेतर आपली उन्नती 100% होईल. वर दिलेल्या लिस्ट शिवाय आपण छत्री, चप्पल दान करणे खूपच फलदायी मानले जाते कारणकी आपण जेव्हा दान करतो त्यांच्या कर्माची फळ आपल्याला त्या नुसार मिळतात. आपण छत्री दान केली तर आपला मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुखकर होतो, किंवा चप्पल दान केलीतर आपल्या वाटेवर येणारे काटे दूर होतात, एक गोष्ट लक्षात ठेवा आपण आपल्या आयपती नुसार दान करावे, ब्रह्मणाला नक्की भोजन द्यावे,. अधिक मास मध्ये 33 ह्या अंकाला खूप महत्व आहे म्हणून आपण 33 देवतांची पूजा करतो, 33 दिवे लावतो व 33 वस्तु दान करतो. अधिक मास सुरू झाला की आपण एक संकल्प करावा व त्यानुसार दान करावे, अधिक मास दर तीन वर्षांनी येतो त्यामुळे हे दान तीन वर्षासाठी असते.
जल व अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानले जाते:
अधिक मास मध्ये जल व अन्न दान हे खूप पुण्यकारी मानले गेले आहे. जेष्ठ महिन्यात गरमी असते त्यामुळे सारखी तहान लागते त्यामुळे तहानलेल्या जल देणे पुण्याचे काम आहे. जल दान करताना पाणपोई सुरू केलीतर अति उत्तम एक मटका भरून घराच्या बाहेर ठेवावा. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी मिळेल व आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल.
मालपुआ दान करावा:
अधिक मास मध्ये मालपुवा दान करणे लाभदायक आहे. मालपुवा दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते त्यामुळे अधिक मास मध्ये 33 मालपुवा दान करण्याचे विशेष महत्वाचे आहे. तांब्याच्या ताटात 33 मालपुवे किंवा अनारसे दान केल्याने पितृ दोष दूर होतो. त्याच बरोबर धन व समृद्धी प्राप्त होते.
धार्मिक पुस्तक दान करा:
अधिक मास मध्ये श्रीमद्भागवत गीता या विष्णु सहस्रनाम अशी धार्मिक पुस्तके दान करा. त्यामुळे मान-सन्मान वाढतो. त्याच बरोबर आपले ज्ञान वाढून मानसिक शांति मिळते.
पिवळे वस्त्र दान करा:
अधिक मास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. म्हणून ह्या महिन्यात ब्राह्मण किंवा जरूरतमंद व्यक्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने करियर व व्यापार मधील अडचणी दूर होतील त्याच बरोबर कुंडिली मधील ‘गुरु’ (बृहस्पति) ग्रह मजबूत बनतो. त्याच बरोबर करियर व व्यापार मधील येणाऱ्या अडचणी दूर होतील.
दीपदान आवश्य करावे:
अधिक मास मध्ये दीपदान करणे विशेष महत्वाचे आहे. अधिक मास मध्ये कोणत्या सुद्धा मंदिरात किंवा पवित्र नदीच्या किनारी किंवा तुळशीच्या रोपा जवळ संध्याकाळी दीप दान करावे त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व माता लक्ष्मीचा वास राहतो.
