शनि जयंती 2026 99% लोक एक चूक करतात, शनि जयंतीला करा नियमांचे पालन राशी नुसार दान
Shani Jayanti 2026: Avoid These Mistakes | Zodiac Wise Donations & Powerful Remedies
16 मे 2026 शनिवार शनि जयंती आहे. जेव्हा शनिवारी अमावस्या येते तेव्हा दुर्लभ संयोग येतो ह्या दिवशी शनि देवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. पण काही चुका झाल्या तर आपल्या अडचणी वाढू शकतात. शनि जयंती ह्या दिवशी काय करावे व काय चुका करू नये, तशनि देवाची कृपा मिळण्यासाठी काय करावे.
16 मे 2026 शनिवार ह्या दिवशी शनि देव ह्यांचा जन्म दिवस आहे जो जेष्ठ महिन्यात अमावस्या ह्या तिथीला साजरा केला जातो. ह्या दिवशी विधी पूर्वक पूजा केल्याने शनि देव ह्यांची विशेष कृपा प्राप्त होऊन जीवनातील कष्ट दूर होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे व ज्याना शुभ फळ मिळत नाहीत त्यांच्या साठी हा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. ह्या दिवशी प्रतेक व्यक्ति पूजा करू शकतो कारणकी शनि देव कर्मफलदाता व न्यायाचे देवता आहेत.
शनिदेव आपल्या कर्मा नुसार फळ देतात. आपल्या जीवनात परेशानी, अन्याय व संघर्ष चालू आहे त्यांनी ह्या दिवशी पूजा केलीतर त्यांना अडचणी पासून मुक्ती मिळते. असे म्हणतात की मनोभावे पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन कष्ट दूर करतात. ह्या वर्षी शनि जयंती खास आहे कारणकी ह्या दिवशी जेष्ठ अमावस्या आहे व शनिवार सुद्धा आहे. ह्या दिवशी काही चुका करण्या पासून सावध राहिले पाहिजे.
टीप: शनिदेवचे दर्शन घेताना भक्त नेहमी त्यांच्या मूर्तीच्या समोर उभे राहतात पण असे अशुभ आहे कारणकी समोर उभे राहिलेतर दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यात बघितले जाते पण ते बरोबर नाही. कारणकी शनिदेव ची नजर थेट तुमच्या वर पडते त्यामुळे तुमच्या जीवनात अजून काही अडचणी येऊ शकतात. म्हणून शनि देवाची पूजा करताना त्यांच्या चरणाकडे पाहून नमस्कार केला पाहिजे.
अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा:
बरेच लोक शनीदेवाच्या डोक्यावर तेल सोडतात, ही खूप मोठी चूक आहे. शास्त्रा नुसार शनि देवाच्या डोक्यावर नाहीतर अंगठ्यावर तेल सोडले पाहिजे.
शनि जयंतीच्या दिवशी काय करू नये:
1. मांसाहार व दारू सेवन करू नये.
2. गरीब, वरिष्ठ व जरूरत मंद व्यक्तिचा अपमान करू नये.
3. खोटे, छल कपट व चुकीची कामे करू नये
4. बिना कारण भांडण तंटे वादविवाद करू नये.
5. दान करताना खराब किंवा बेकार वस्तु देवू नये.
6. पूजा करताना मनोभावे पूजा करा.
शनि जयंतीच्या दिवशी पुढील काम करा शनिदेवची कृपा मिळेल:
1. सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करा.
2. जवळच्या शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते व निळी फूल अर्पित करावी.
3. ॐ शं शं शनैश्चराय नमः’ ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करा.
4. शनिदेवना काळ्या रंगाची वस्तु अर्पित करा म्हणजे काळे तीळ, उडद किंवा काळे वस्त्र
5. गरीब व जरूरतमंद लोकांना भोजन द्या.
6. काळी छत्री, चप्पल, मोहरीचे तेल किंवा लोखंडी वस्तु दान करा.
7. सकाळी व संध्याकाळी शनि मंदिरमध्ये जाऊन आरती करा.
8. संपूर्ण दिवस शांत राहून सात्विक जीवनशैली ठेवा.

राशि अनुसार विशेष उपाय करा:
मेष : गूळ, फळ, पाण्याचा मातीचा मटका
वृषभ: पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व काळे तीळ दान करावे
मिथुन: काळे उडीद, बूट-चप्पल, किंवा वस्त्र
कर्क: निळ्या रंगाचे वस्त्र, व शनि मंत्र जाप
सिंह: फळे
कन्या: मोहरीचे तेल, हिरवे वस्त्र दान करणे लाभदायक आहे.
तुला: काळ्या गाईला गूळ व चपाती सेवन करायला द्या
वृश्चिक: जल, अन्न, वस्त्र दान करणे शुभ
धनु: उलनची कंबळ, छत्री दान करणे लाभदायक
मकर: वरिष्ठ व्यक्तिला मदत करा
कुंभ: निळे वस्त्र, काळे तीळ व लोखंडी वस्तु दान करा
मीन: पिवळी फळ, मिठाई व तांदूळ दान करा
