ज्येष्ठ अमावस्या 2026 पितरांच्या शांतीसाठी करा सोपे सटीक उपाय, नाराज पूर्वज होतील प्रसन्न
Jyeshtha Shani Amavasya 2026: 11 Powerful Remedies for Pitru Dosh, Peace & Prosperity
सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथी खूप खास आहे. दर महिन्यात अमावस्या तिथी येते. ह्या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी काही उपाय केले जातात. आपल्या घरात जर पितृ दोष असेलतर अमावस्याच्या दिवशी काही उपाय केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. असे म्हणतात की ह्या दिवशी दान, तर्पण व पूजापाठ केल्याने पितृ दोष दूर होतो व काही उपाय केल्याने पूर्वजांच्या आत्माला शांती मिळून परिवारात सुख समृद्धी मिळते. आपल्या जीवनात सारख्या अडचणी येत असतील व परिवारात अशांती असेलतर ज्येष्ठ अमावस्या ह्या दिवशी पुढे दिलेले उपाय करून पूर्वजांची नाराजी दूर होईल.
अमावस्या तिथी प्रारंभ: 16 मे 2026 शनिवार पहाटे 5:13
अमावस्या तिथी समाप्ती: 17 मे 2026 रविवार पहाटे 1:33 मिनिट (उदयतिथीनुसार १६ मे रोजी मानली जाईल) अमावस्या ही शनिवारी आली आहे त्यामुळे तिला शनि अमावस्या म्हणतात तर ह्या दिवशी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा, निळी फुले, काळे तीळ अर्पित करावे व हनुमान चाळिसाचे पठन करावे.
1. ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण द्या:
ज्येष्ठ अमावस्या ह्या दिवशी सकाळी स्नान करून घराच्या दक्षिण दिशेला मुख करून पूर्वजांना तर्पण द्या. जर आपण पवित्र नदीजवळ जाऊन तर्पण केलेतर शुभ मानले जाते. ह्या दिवशी पाण्यात काळे तीळ घालून तर्पण करा. तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळून पूर्वज प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात.
2. गरीब व जरूरतमंद लोकांना दान द्या:
ज्येष्ठ अमावस्या ह्या दिवशी जरूरतमंद लोकांना आवश्यकता अनुसार काही वस्तु दान केल्यातर पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. पितरांच्या शांतीसाठी दान करणे महत्वपूर्ण आहे. ह्या दिवशी काळे तीळ, तांदूळ, वस्त्र, अन्न व धान्य दान केले पाहिजे. तसेच ब्राह्मण लोकांना भोजन दिले पाहिजे त्यामुळे पूर्वजांची नाराजी दूर होईल.
3. पिंपळाच्या झाडाची पूजा करा:
ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पिपळाच्या वृक्षाची पूजा करा पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ दिवा लावल्याने आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते व पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करा व संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो. म्हणून ह्या वृक्षाची पूजा केल्याने पितृ कृपा मिळते व पूर्वजांची नाराजी दूर होते.
4. पितृ स्तोत्र जाप करा:
ज्येष्ठ अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावांनी मंत्र जाप करणे अत्यंत फलदायी आहे. ह्या दिवशी ‘ॐ पितृदेवाय नमः’ ह्या मंत्राचा जाप करणे लाभदायक आहे. ह्या दिवशी पितृ स्तोत्र पाठ करणे अत्यंत फलदायी मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनात मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा येते व पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
5. ज्येष्ठ अमावस्या दिवशी घरात दीप दान करा:
ज्येष्ठ अमावस्या ह्या दिवशी संध्याकाळी घरातील देवघरात दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावावा त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. दीपदान केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल व पितरांची कृपा मिळेल. ह्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजा जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते.
6. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी:
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी रात्री 8 बदाम व 8 काजळाच्या डब्या एका काळ्या कापडात बांधून आपल्या पैशाच्या कपाटाच्या किंवा तिजोरीच्या खाली रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्या असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील.
7. विवाहित जीवनातिल अडचणी दूर करण्यासाठी:
आपल्या विवाहिक जीवनात म्हणजेच पती-पत्नी मध्ये सारखे वादविवाद होत असतील तर अमावस्याच्या दिवशी थोडे दूध घेऊन त्यामध्ये एक चिमुट साखर मिक्स करून कोणत्या सुद्धा विहिरीमध्ये टाकून द्या. जर आपल्या घराच्या जवळ पास विहीर नसेलतर घराच्या बाहेर जमिनीवर थोडे दूध व त्यावर थोडी साखर टाकावी व त्यावर माती टाकावी असे केल्याने आपल्या जीवनसाथी बरोबर आपले संबंध आपोआप सुधारतील.
8. कर्ज मुक्तीसाठी उपाय:
आपण कर्ज घेऊन परेशान आहात, तर अमावस्याच्या दिवशी थोडीशी मोहरी हातात घेऊन रात्री घराच्या जवळील चौकात किंवा घराच्या छतावर 3 प्रदक्षिणा मारत टाकावी. व थोडीशी मोहरी दाही दिशेला टाकावी. अमावस्याच्या दिवशी हा तोटका केल्याने लवकरच आपली कर्जातुन मुक्ती होईल.

9. धन प्राप्तीसाठी उपाय:
अमावस्याच्या दिवशी एक पाणी असलेला नारळ घेऊन शंकर भगवान ह्यांच्या फोटो किंवा मूर्ती समोर धन प्राप्तीची मनोकामना सांगून नारळ फोडावा व नारळाचे तुकडे भगवान शंकर ह्यांच्या फोटो किंवा मूर्ती समोर रात्र भर ठेवावे मग सकाळी उठल्यावर नारळाचे तुकडे घरातील सदस्यांना द्यावेत असे केल्याने धन प्राप्ती होते.
10. करियरमध्ये सुधारणा होण्यासाठी उपाय:
करियरमध्ये नवीन दिशा मिळण्यासाठी अमावस्याच्या दिवशी एक पाणी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल रंगाचा धागा 7 वेळा गुंडाळून आपल्या इष्ट देवतांचे स्मरण करून वाहत्या पाण्यात विसर्जित करा असे केल्याने करियर मध्ये नवीन दिशा मिळेल.
11. व्यापारात उन्नती होण्यासाठी उपाय:
अमावस्याच्या दिवशी स्नान झाल्यावर दुर्गा माताची विधी पूर्वक पूजा करा कपूर लाऊन आरती करा मग हलवा व चणे भोग म्हणून दाखवा असे केल्याने व्यापारात उन्नती होईल.
