अधिक मास 33 दिव्यांचा उपाय 33 दिवे कसे बनवावे कधी व कसे दान करावे सुख-समृद्धी व अक्षय पुण्य मिळेल
33 Wicks Lamp in Adhik Maas 2026 | Secret of 33 Crore Deities & Deepdaan Benefits
अधिक मास मध्ये 33 वातीचा दिवा लावण्याचे रहस्य, त्यामुळे मिळेल 33 कोटी देवी-देवतांचा मिळेल आशीर्वाद ते कसे? तसेच दिपदानांचे महत्व, पद्धत, तुलसी पूजन व दीपदान कसे करावे त्यामुळे सुख-समृद्धी व अक्षय पुण्य मिळेल त्यासाठी हा सोपा उपाय आहे.
हिंदू धर्मामध्ये अधिक मास हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. असे म्हणतात की ह्या महिन्यात अगदी छोटेसे दान केलेतरी त्याचे अक्षय पुण्य मिळते. आपल्याला माहीत आहे का ह्या महिन्यात 33 ह्या संखेचे रहस्य काय आहे? आता आपण पाहूया ह्या अधिक मास मध्ये आपण आपल्या जीवनातील अंधकार कसा दूर करणार.
33 दिव्याचे रहस्य व 33 कोटी देवी-देवता म्हणजे काय? पौराणिक मान्यता अनुसार आपल्या हिंदू संस्कृतिमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे असे म्हणतात. अधिक मास मध्ये दीप दानाचा अर्थ आहे “अंधकार वरती प्रकाशाचा विजय”
आपण जेव्हा 33 वतींचा एक दिवा असे 33 दिवे लावतो तेव्हा ते दिवे 33 कोटी देवी-देवताना समर्पित आहेत. असे केल्याने सर्व देवी-देवतांची दिव्य शक्तिचा आशीर्वाद प्राप्त होतो.
अधिक मास 2026 17 मे 2026 रविवार ह्या दिवसा पासून सुरू होत असून 15 जून 2026 पर्यन्त सोमवार आहे ह्या काळात दीपदान करणे विशेष महत्वाचे आहे. त्यामुळे सुख-समृद्धी व पुण्यची प्राप्ती होते. संध्याकाळी घरातील देवघरात, तुलसीच्या समोर, पिंपळाच्या वृक्षा जवळ, गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावावा. भगवान विष्णु ह्यांच्या जवळ दिवा लावल्याने दारिद्रता दूर होऊन आर्थिक प्रगती होते.
आता आपण पाहू या दीप दान कसे करावे? दिवा लावताना मनोभावे लावावा, त्यासाठी दोन पद्धती आहेत आपल्याला जी पद्धत सोईस्कर आहे ती वापरावी.
महा दीपक: त्यासाठी आपल्याला 33 वाती घेऊन त्याचा एक दिवा बनवावा मग तो लावावा त्यामुळे अनंत फळ प्राप्त होते.
पृथक दीप: आपण 33 छोटे छोटे दिवे सुद्धा लाऊ शकता.
दिवा लावताना कोणते तेल वापरावे: जर आपण गाईच्या तुपाचा दिवा लाऊ शकत नासल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. देव आपली श्रद्धा बघतात आपण कोणत्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला आहे ते नाही पहात.
अधिक मास मध्ये आपण फक्त घरातील देवघरात दिवा लावायचा नाहीतर पुढे दिलेल्या जागी सुद्धा दीपदान करू शकता त्यामुळे आपले नशीब बदलू शकते.
तुलसीपूजन: अधिक मास मध्ये तुलसी जवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
आकाश दीप: आपले पूर्वज एका उंच ठिकाणी लटकलेला दिवा लावायचे त्याला आकाश दीप असे म्हणतात तो दिवा आपल्या पितरांना मार्ग दाखवण्यासाठी होता.
नदी किंवा सरोवर: वाहत्या पाण्यात दीप दान केल्याने अकाल मृत्यूचे भय समाप्त होते.

एक टीप: जर अधिक महिन्यात आपण संपूर्ण महिना रोज दीप दान केलेतर खूपच छान पण जर शक्य नसेलतर एकादशी, पूर्णिमा ह्या दिवशी 33 वाती घेऊन त्याचा दिवा बनवून दीप दान करावे त्यामुळे महिना भराचे पुण्य प्राप्त होते. 33 दिव्यान पैकी रोज एक दिवा असे 30 दिवस लावावे व राहिलेले 3 दिवे शेवट्याच्या तीन दिवशी रोज एक तुळशीच्या रोपा जवळ लावावा.
दीप दान वेळ: दीप दान करताना संध्याकाळी 5:00 ते 7:45 ह्या वेळेत करावे ही वेळ उत्तम आहे. दिवा लाऊन भगवान विष्णु ह्यांना हात जोडून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा व ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ह्या मंत्राचा जाप करा.
आपल्याला जर 30 दिवस रोज दिवा लावणे शक्य नसेलतर 11 जुन एकादशी पासून 15 जुन पर्यन्त दिवा लावावा. आपण काय करायचे आहे एक स्वस्तिक बनवून त्याच्या चारी टोकाला एक एक दिवा ठेवायचा आहे व मध्य भागी एक दिवा ठेवायचा आहे. ह्याला स्वस्तिक व्रत असे म्हणतात.\, असे केल्याने घरात लक्ष्मी माताचा वास राहतो. आपले मृत्यू नंतरचा मार्ग चांगला राहतो. व स्वर्ग प्राप्ती होते.
