Power of Angarki Sankashti Chaturthi 2026: 10 Life-Changing Remedies in Marathi
अंगारकी चतुर्थीला करा हे १० शक्तिशाली उपाय घरामध्ये येईल सुख-समृद्धी आणि अपार धनदौलत!
अंगारकी चतुर्थी अगदी महत्वपूर्ण दिवस भगवान गणेश ह्यांना समर्पित आहे. अंगारकी चतुर्थी नेहमी मंगळवार ह्या दिवशी येते त्यामुळे ती विशेष फलदायी आहे. महिला आपल्या मुलांच्या दीर्घआयुष्यसाठी व आपल्या परिवाराच्या सुख शांतीसाठी व्रत ठेवते. गणेश पूजा करून रात्री चंद्राला अर्ध्य देवून व्रत पूर्ण होते. ह्या दिवशी व्रत केल्याने जीवनातील बाधा, संकटे जाऊन सकारात्मकता येते.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्याने जीवनातील सर्व बाधा नष्ट होतात. ह्या दिवशी महिला मनोभावे पूजा अर्चा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडतात ह्या दिवशी गणेश भगवान व चंद्र देवाची पूजा केल्याने आपल्या कार्यात येणाऱ्या अडचणी, आर्थिक समस्या व कर्ज संबंधित परेशानी दूर होतात. असे म्हणतात की त्यामुळे जीवनात सकारात्मकता येते.
अंगारकी चतुर्थी संध्याकाची पूजा:
रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाला जल, अक्षता, चंदन, व फूल अर्पित करा. मग नमस्कार करून भगवान गणेश ह्यांची कथा आइका, त्याच बरोबर चंद्र दर्शन व पूजा झाल्यावर व्रत सोडावे. व्रत सोडताना गणपती बापांचे आवडीचे मोदक भोग दाखवून मग सेवन करावे.
महत्वपूर्ण सूचना अंगारकी चतुर्थी 2026:
5 मे 2026 मंगळवार
चतुर्थी तिथि प्रारंभ: 5 मे 2026, सकाळी 05:24 वाजता
चतुर्थी तिथि समाप्ति तिथि: 6 मे 2026, सकाळी 7:51 वाजता
अंगारकी चतुर्थी 10 पावरफुल उपाय- Powerful Remedies
1. विवाह लवकर व्हावा किंवा विवाहमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी ह्या दिवशी ‘ॐ ग्लौम गणपतयै नमः’ ह्या मंत्राचा 11 माळा जाप करावा, गणेश स्तोत्र पठन करून गणेश भगवान ह्यांना मोदकाचा नेवेद्य दाखवावा.
2. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांचे नामस्मरण करावे. गणेश मंदिरात जाऊन पूजा करावी असे केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतील.
3. भगवान गणेश ह्यांना गूळ-तुपाचा नेवेद्य दाखवून मग गाईला खायला द्यावा, असे केल्याने घराची आर्थिक परिस्थिति सुधारते.
4. “जमीन (भूमी) मिळवण्यासाठी संकटनाशन गणेश स्तोत्र आणि ऋणमोचन मंगल स्तोत्राचे ११ पाठ करा, जमीन मिळण्याचे प्रबळ योग तयार होतील.

5. श्री गणेश मंत्रा बरोबरच चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चालीसा, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी सूक्तचे वाचन करावे, असे केल्याने संपत्ति मिळण्याचे शुभ योग येतात.
6. आपले स्वतःचे घर पाहिजे असेलतर श्री गणेश पंचरत्न स्तोत्र व माता भुवनेश्वरी चालीसा किंवा भुवनेश्वरी स्तोत्र पाठ केल्याने लाभ मिळतो.
7. अपार धन दौलत पाहिजे असेलतर धनदाता गणेश स्तोत्र किंवा कुबेर मंत्र ‘ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः’ ह्या मंत्राचा 11 माळा जाप करावा. असे केल्याने निश्चित धन लाभ होईल.
8. घरातील सर्व नकारात्मक शक्ति दूर करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी घरातिल देवघरामध्ये पांढऱ्या गणपतीची स्थापना करून पूजा अर्चा करावी.
9. कोणत्या सुद्धा महत्वाच्या कामासाठी जाताना भगवान श्री गणेश ह्यांच्या आपल्या कपाळावर तिलक लावावा मग प्रार्थना करून घरा बाहेर पडावे.
10. घरात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी 108 दूर्वाची जुडी बनवून लाल कापडात बांधून गणपती बाप्पाला अर्पित करा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात व नोकरीमध्ये प्रमोशन मिळते. किंवा 21 दूर्वाची जुडी बनवून गणपती बाप्पाला अर्पित करून गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी किंवा समस्या दूर होण्यास मदत होते.
