वैशाख बुद्ध पूर्णिमा 2026 करा 5 कामे मिळेल अपार पुण्य, आणा 5 वस्तु सुख समृद्धी मिळेल
Vaishakh Purnima Buddha Purnima 2026 In Marathi
हिंदू धर्मा मध्ये पूर्णिमा तिथीला खास महत्व आहे. वैशाख महिन्यातील पूर्णिमा तिथीला बुद्ध पूर्णिमा असते त्यादिवशी बुद्ध जयंती म्हणून सुद्धा साजरी करतात. पूर्णिमा तिथी खूप पुनयदायी मानली जाते. ह्या वर्षी 1 मे ह्या दिवशी बुद्ध पूर्णिमा साजरी करायची आहे. ह्या दिवशी बुद्ध ह्यांचा जन्म झाला होता व ह्याच दिवशी त्यांचे महानिर्वाण सुद्धा झाले होते. हिंदू मान्यता अनुसार भगवान विष्णु ह्यांनी आपला नववा अवतार बुद्ध ह्यांच्या रूपात घेतला होता. तसेच ह्या दिवशी भगवान बुद्ध ह्यांची उपासना केली जाते.
वैशाख पूर्णिमा आध्यात्मिक महत्व:
वैशाख पूर्णिमा ह्या दिवशी सत्यनारायण पूजा करून कथा आईकली जाते, चंद्राला अर्ध्य व देवी लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते. असे म्हणतात की जे लोक ह्यादिवशी उपवास करतात त्यांना दिव्य शक्ति प्राप्त होते त्याच बरोबर त्यांच्या घरी माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो. ह्या दिवशी लोक गंगा स्नान किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करतात. दान पुण्य करतात बुद्ध पूर्णिमा ह्या तिथीला गौतम बुद्धह्याची जयंती म्हणून साजरी करतात.
भगवानचे तीन अवतार:
ग्रंथा नुसार ह्या तीन दिवसांत भगवान विष्णुचे तीन अवतार उत्पन्न झाले होते. त्रयोदशीच्या दिवशी नृसिंह जयंती, चतुर्दशी च्या दिवशी कूर्म जयंती व पूर्णिमा ह्या दिवशी बुद्ध जयंती (बुद्ध पूर्णिमा).म्हणूनच वैशाख महिन्याच्या शेवटी स्नान, दान, पूजन केले पाहिजे. त्यामुळे पापाचा नाश होतो. व संसारीक सुखाचा आनंद मिळून, सुख समृद्धी मिळेल.
बुद्ध पूर्णिमा काय करावे तर ह्या दिवशी गीता पाठ केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळेल ह्या तीन दिवसांत श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ केल्याने कधी सुद्धा नसंपणार पुण्य फळ मिळेल.
वैशाख शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथी 30 एप्रिल 2026 रात्री 9:13 पासून सुरू होत असून समाप्ती 1 मे रात्री 10:53 होत आहे. उदय तिथी 1 मे रोजी आहे त्यामुळे वैशाख पूर्णिमा शुक्रवार रोजी आहे.

वैशाख पूर्णिमाच्या दिवशी घरी यांना पवित्र वस्तु येईल सुख समृद्धी
बुद्धची मूर्ती किंवा फोटो त्यामुळे मिळेल मानसिक शांती व ज्ञान
श्री यंत्र त्यामुळे मिळेल धन लाभ व समृद्धी
दक्षिण वर्ती शंख त्यामुळे सकारात्मक ऊर्जा व वैभव
एकाक्षी नारियल त्यामुले मिळेल सौभग्य व सफलता
तुळशीचे रोप त्यामुळे मिळेल आरोग्य व शुचिता
