Paush Putrada Ekadashi 2025 Shubh Muhurat, Vidhi, Vrat Paran Wa Upay In Marathi
पुत्रदा एकादशी व्रत 2025 शुभ मुहूर्त विधी व्रत पारण व उपाय
आता पौष महिना सुरू झाला असून ह्या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. पौष पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांना समर्पित आहे, ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे धनलाभ होतोत व व्रत केल्याने सर्व पापा पासून मुक्ती मिळते.
धार्मिक मान्यता अनुसार जे विवाहित दांपत्य संतान प्राप्तीची इच्छा ठेवतात व आपली संततीचे भविष्य चांगले व्हावे म्हणून मनोकामना करतात त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे. ह्या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा मिळते.
वैदिक पंचांग नुसार 30 डिसेंबर ह्या दिवशी ह्या वर्षातील शेवटची एकादशी पौष पुत्रदा एकादशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीचु पूजा अर्चा करून व्रत केले पाहिजे.
धार्मिक मान्यता अनुसार पौष पुत्रदा एकादशी व्रत केल्याने साधकाच्या जीवनातील दुख दूर होऊन सुख समृद्धी मध्ये वृद्धी होते. ह्या व्रताचे पारायण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी हया दिवशी केले जाते.
पौष पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त:
पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर 2025 मंगळवार ह्या दिवशी असून सकाळी 7:50 मिनिटांनी सुरू होत असून 31 डिसेंबर 2025 बुधवार ह्या दिवशी सकाळी 5 वाजता समाप्ती होत आहे.
पौष पुत्रदा एकादशी व्रत 2025 पारण वेळ:
एकादशी पारायण दुसऱ्या दिवशी केले जाते. पौष पुत्रदा एकादशी पारण 31 डिसेंबर 2025 बुधवार ह्यादिवशी केले जान आहे. ह्या दिवशी व्रत पारण करण्याची वेळ दुपारी 1:29 मिनिटांनी सुरू होत असून 3:33 मिनिटांनी समाप्ती होत आहे. ह्या वेळेत कोणत्या वेळी सुद्धा पारण करू शकता.

पौष पुत्रदा एकादशी व्रत पारण विधि:
सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाला अर्ध्य द्या, मग घरतील देवघर साफ करून गंगाजल शिंपडा. मग जगाचे पालनहार भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा. मग दिवा लाऊन आरती करा. मंत्र जाप व विष्णु चालीसाचा पाठ करा. सात्विक भोजन करा. जेव्हा भोग दाखवल तेव्हा तुळशी पत्र ठेवायला विसरू नका. मग प्रसाद सेवन करा. ह्या दिवशी मंदिर किंवा गरीब लोकांना अन्न-दान व जीवनावश्यक वास्तु दान करा. द्वादशीच्या दिवशी दान केल्याने व्रत केल्याचे पूर्ण फळ मिळते व आपल्याला जीवनात कशाची कमतरता होत नाही.
पुत्रदा एकादशी उपाय:
आपल्या नवीन वर्षांची सुरवात ही पुत्रदा एकादशीनी होत आहे. म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे. ह्या दिवशी स्नान करून भगवान विष्णुची पूजा करून विष्णु सहस्त्रनामचे पठन करावे, पिवळ्या रंगाच्या वस्तु दान कराव्या त्याच बरोबर दीप दान केल्याने घरात सुख-समृद्धी सकारात्मक ऊर्जा येते.
