13 February 2026 Jaya Ekadashi Vrat, Shubh Muhurt, Puja Vidhi Wa Mahatw In Marathi

Jaya Ekadashi
13 February 2026 Jaya Ekadashi Vrat, Shubh Muhurt, Puja Vidhi Wa Mahatw

13 फेब्रुवारी 2026 जया/विजया एकादशी व्रत, शुभ मुहूर्त, पूजाविधी, महत्व व कथा

13 February 2026 Jaya Ekadashi Vrat, Shubh Muhurt, Puja Vidhi Wa Mahatw In Marathi

विजया एकादशी व्रत तिथी मुहूर्त वेळ:
वैदिक पंचांग अनुसार, फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी तिथी 12 फेब्रुवरी 2026 शुक्रवार दुपारी 12:21 वाजता आरंभ होत असून 13 फेब्रुवरी दुपारी 2:26 वाजता समाप्त होत आहे.
उदय तिथी नुसार व्रत 13 फेब्रुवरी ला ठेवावे.
पारण तिथी: 14 फेब्रुवरी 2026 सकाळी 7:00 पासून 9:14 मिनिट पर्यन्त

विजया एकादशी व्रत अभिजीत मुहूर्त:
विजया एकादशीच्या दिवशी अभिजीत मुहूर्त 12:13 पासून 12:58 पर्यन्त आहे हा मुहूर्त पूजा पाठ करण्यासाठी अत्यंत शुभ महूर्त आहे. अभिजीत महूर्त मध्ये पूजा पाठ केल्यास भगवान विष्णु लवकर प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना लगेच पूर्ण करतात. पूजा करताना विष्णु सहस्त्रनाम, विष्णु चालीसा किंवा विष्णु स्तोत्रचे पठन करणे फलदायी आहे.

हिंदू धर्मामध्ये एकादशी एक महत्वपूर्ण तिथी आहे. म्हणूनच जया एकादशीचे धार्मिक महत्व सुद्धा खूप आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी विष्णु भक्त विधी पूर्वक व्रत ठेवून पूजा अर्चा करेल त्याच्या प्रतेक कार्यात सफलता मिळेल.

विजया एकादशी व्रत पूजा विधि:
● एकादशीच्या आढल्या दिवशी सात धान्य घेऊन एका स्वच्छ जागेवर ठेवा.
● मग सोने, चांदी, तांब्याचा किंवा मातीचा एक कलश त्या सप्त धान्यावर ठेवा.
● एकादशी च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
● कलश स्थापना झाल्यावर भगवान विष्णु ह्यांच्या मूर्तीची स्थापना करावी.
● धूप, दीप, चंदन, फल, फूल व तुलसी इ श्री हरी ह्यांना अर्पित करावे.
● उपवास करताना त्याच्या बरोबर भगवान विष्णु ह्यांची कथा आइकावी.
● रात्रि श्री हरि ह्यांच्या नामस्मरणा बरोबर भजन कीर्तन करीत जागरण करावे.
● द्वादशी च्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देवून कलश दान करावा.
● मग एकादशी व्रत पारण करावे.

व्रत करण्या अगोदर सात्विक भोजन सेवन करावे व ब्रह्मचार्यचे पालन करावे. अश्या प्रकारे व्रत विधी पूर्वक व्रत केल्याने कठीण प्रसंगां मधून बाहेर पडून विजय प्राप्त होऊ शकतो.

विजया एकादशी महत्व:
सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत ही प्राचीन व्रत मानले जाते. पद्म पुराण मध्ये स्वतः महादेवह्यांनी नारद जिना उपदेश केला होता की “ एकादशी ही व्रत महान पुण्य देणारे व्रत आहे. असे म्हणतात की, मनुष्य विजया एकादशी व्रत ठेवतो तेव्हा त्याचे पितृ व पूर्वज ही स्वर्ग मध्ये जातात. व व्यतिच्या जीवनात प्रतेक कार्यात सफलता प्राप्त होते. व पूर्व जन्मा पासून आताच्या जन्मा मधील सर्व पापान पासून मुक्ती मिळते.

Jaya Ekadashi
13 February 2026 Jaya Ekadashi Vrat, Shubh Muhurt, Puja Vidhi Wa Mahatw

विजया एकादशी व्रत कथा:
असे म्हणातात की त्रेता युगामध्ये भगवान श्री राम लंका वर लढाई करण्यासाठी समुद्र तीरावर पोचले तेव्हा श्री राम ह्यांनी समुद्र देवताला मार्ग देण्यासाठी प्रार्थना केली पण समुद्र देवतांनी श्री राम ह्यांना लंकेला जाण्यासाठी मार्ग दिला नाही तेव्हा श्री राम ह्यांनी वकदालभ्य मुनि ह्यांना आज्ञा करून विजय एकादशी चे व्रत विधी पूर्वक केले मग वकदालभ्य मुनि ह्यांनी प्रभू राम ह्यांना मार्ग दाखविला. त्याच बरोबर रावण ला हरवून श्री राम ह्यांनी विजय मिळवला होता. म्हणूनच ह्या तिथीला जया किंवा विजया एकादशी असे संबोधले जाते.

विजया एकादशी व्रत केल्याने जीवनात विजय, सुख व समृद्धी प्राप्त होते. विधी पूर्वक व्रत केले तर शत्रू पराजित होऊन सर्व कार्यमध्ये सफलता प्राप्त होते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.