सावधान नवीन वर्षाचे 2026 कॅलेंडर लवताय? जागा तर चुकत नाही ना? कोणती योग्य दिशा आहे?
वास्तु टिप्स: नवीन वर्ष कॅलेंडर घरात लावण्याची योग्य जागा जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावले तर काय होते
Vastu Tips: New Year Calendar 2026 Where To Hang? In Marathi
आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपण दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा नवीन वर्षाचे कॅलेंडर आणले असेल किंवा आणणार असाल. पण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणले की ते योग्य दिशेला लावावे नाहीतर त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतील.
आपण आपल्या घरात नवीन वर्षाचे 2026 कॅलेंडर लावत आहोत, तर आपण पुढे दिलेल्या काही टिप्स किंवा काही गोष्टी लक्षात घ्याव्यात, त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होईल.
आपण वास्तु शास्त्रा नुसार घरात कोणती सुद्धा वस्तु घेताना योग्य रितीने ठेवणे व योग्य दिशेला ठेवणे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येवून सुख-शांती, समृद्धी येवू शकते. नवीन वर्षाची सुरवात करताना आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणतो. पण त्याची योग्य दिशा लक्षात घेणे महत्व पूर्ण आहे. कारण की नवीन वर्षाची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होते.
घरातील जुने कॅलेंडर काढून ठेवा:
नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना घरातील जुने कॅलेंडर काढून टाकणे खूप जरुरीचे आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरवात करणे व जुने कॅलेंडर ठेवणे म्हणजे जुन्या आठवणी लक्षात येणे. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जाचे कारण बनू शकते.
एक गोष्ट लक्षात ठेवा मागील वर्षातचे कॅलेंडर घरात कुठे सुद्धा ठेवू नये किंवा नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या मागे सुद्धा लावू नये.
घरातील जुन्या कॅलेंडरवर कोणत्या सुद्धा देवाचे चित्र असेलतर टाकून न देता ती चित्रे कापून आपण घरात लावू शकतो किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकतो. पण कॅलेंडर असेच कचऱ्यामध्ये टाकून देवू नका त्यामुळे देवाची चित्रे सुद्धा तशीच कचऱ्यात जाऊ शकतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जाच्या प्रभावानी आपण वाचू शकतो.
घरात नवीन वर्षांचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे:
वास्तु शास्त्रा नुसार नवीन कॅलेंडर पश्चिम किंवा पूर्व दिशेला लावणे चांगले मानले जाते. पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह चांगला होतो. तसेच आपली आर्थिक स्थिति सुद्धा अजून चांगली होण्यास मदत होते.
उत्तर दिशा सुद्धा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य दिशा मानली जाते. कारणकी ही दिशा भगवान कुबेर ह्यांची मानली जाते. आपल्याला माहिती आहेच भगवान कुबेर हे धन व समृद्धीचे देवता आहेत.
कोण कोणत्या दिशा नवीन कॅलेंडर लावण्यास वर्ज आहेत:
घरातील काही दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावल्यास त्यामुळे वास्तु दोष होऊ शकतो, तसेच त्यामुळे घरातील व्यक्तिची प्रगती होण्यास अडचणी येवू शकतात म्हणून पुढे दिलेल्या दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य नाही.
घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नये. कारण की त्यामुळे आर्थिक नुकसान होऊन आरोग्याच्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात. तसेच दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणून चुकून सुद्धा ह्या दिशेला कॅलेंडर लाऊ नये.
तसेच एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की आपण जेव्हा उत्तर दिशेला कॅलेंडर लावतो तेव्हा सहजच आपण कॅलेंडरमध्ये तिथी किंवा अजून काही माहिती बघत असतो तेव्हा आपण दक्षिण दिशेला बघून वाचतो व दक्षिण दिशा ही यामची दिशा आहे त्यामुळे शक्य असेलतर कॅलेंडर नेहमी पश्चिम किंवा पूर्व दिशेला लावावे. हीच गोष्ट आपण वॉल क्लॉक लावताना सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.

कॅलेंडर लावताना आपण हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा लाऊ शकता. महिला साधारण पणे स्वयंपाक घरात कालनिर्णय किंवा महालक्ष्मीचे कॅलेंडर लावणे पसंद करतात. कारण की आपण जास्त वेळ स्वयंपाक घरात असतो त्यामुळे आपल्याला ते जास्त सईस्कर पडते.
नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे किंवा खिडकीच्या जवळ किंवा मुख्य दरवाजा च्या जवळ लावू नये. कारणकी त्यामुळे परिवारातील सदस्याचे प्रगती होत नाही व नकारात्मक येते.
आपण जर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्याच्या वेळी काही वास्तु टिप्स लक्षात घेतल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा येऊन सुख-शांती व समृद्धी येते. तसेच नवीन वर्ष चालू होताना मागील वर्षाच्या कटू आठवणी सुदून द्याव्यात.
