New Year First Day 2026 Buy 5 Lucky Items For Wealth & Prosperity In Marathi
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात 5 वस्तु आणा पूर्णवर्ष माता लक्ष्मीची कृपा होऊन तिजोरी भरेल
गुरुवारी 1 जानेवारी 2026 म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला आपण घरात पुढे दिलेल्या 5 वस्तु आणल्या तर अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की ह्या 5 वस्तु 1 जानेवारी ला घरात आणल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल व वर्षभर घरात माता लक्ष्मीचा वास राहील, चला तर मग पाहूया नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी कोणत्या शुभ वस्तु घरी आणायच्या आहेत.
प्रतेक व्यक्तीला वाटते नवीन वर्ष आपल्याला व आपल्या परिवाराला सुख-समृद्धी व आरोग्यदायी जावो. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवी देवतांची पूजा अर्चा करून काही सोपे उपाय केले पाहिजेत.
वास्तुशास्त्रा नुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही खास वस्तु घरी आणा त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढून वास्तु दोष दूर होईल व घरात पैशाचा ओघ सुरू होईल. आर्थिक तंगी पासून चुटकरा मिळेल.
चला तर मग पाहू या कोणत्या 5 वस्तु आहेत:
1. नारळ: वास्तु शास्त्रामध्ये नारळ म्हणजेच श्रीफळ ह्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात छोटा नारळ खरेदी करून आणा व लाल रंगाच्या कापडात गुंडाळून माता लक्ष्मी च्या फोटो किंवा मूर्तीच्या जवळ ठेवून त्याची विधी पूर्वक पूजा करून मग आपल्या तिजोरीच्या जागी किंवा आपण जेथे धन ठेवतो तेथे ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मीची प्रसन्न होऊन घरात नेहमी धनाचा प्रवाह ठेवील व अनावश्यक खर्च होण्या पासून आपला बचाव करील.
2. धातूचे कासव: वास्तु शास्त्रामध्ये कासवही सौभाग्य व दीर्घायुषचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चांदी किंवा तांब्याचे कासव जरूर खरेदी करून आणा व उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने नोकरी व्यवसायमध्ये सफलता मिळून घरातील व्यक्तीची प्रगती होईल.
3. तुळशीचे रोप: आपल्या घरात तुळशीचे रोप नसेलतर किंवा सुकले असेलतर 1 जानेवारी ह्या दिवशी तुळशीचे रोप आणून लावावे. घरात तुळशीचे रोप लावल्याने वास्तु दोष दूर होईल व माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळेल त्याच बरोबर घरात सकारात्मक ऊर्जा येईल.

4. मोरपिस: 1 जानेवारी ह्या दिवशी घरात मोरपिस आणणे शुभ मानले जाते. भगवान श्री कृष्ण ह्यांचे अतिप्रिय मोरपिस घरात ठेवल्याने वास्तु दोष दूर होतो व घरात सुख शांती व समृद्धी येते.
5. लाफिंग बुद्धा: वास्तु शास्त्रा नुसार घरात लाफिंग बुद्धा ठेवणे म्हणजे खुशालीचे संकेत आहेत. लाफिंग बुद्धा घरात किंवा ऑफिसमध्ये उत्तर-पूर्व (इशान कोन) किंवा घराच्या मुख्य दरवाजा समोर ठेवावे म्हणजेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची लगेच त्याच्या वर नजर जाईल असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
एक गोष्ट लक्षात ठेवा आपण 1 जानेवारी ह्यादिवशी ह्या 5 वस्तु पैकी कोणती सुद्धा एक वस्तु घरात आणणार असाल तर किंवा खरेदी करणार असालतर शुभ मुहूर्तावर खरेदी करा किंवा आणा त्यामुळे त्याचा लाभ चांगला होईल.
1 जानेवारी 2026 गुरुवार राहुकाळ दुपारी 1:49 टे दुपारी 3:09 पर्यन्त आहे.
