धार्मिक दृष्टीने नवीन वर्षाचा पहिला संपूर्ण दिवस काय करावे? मग संपूर्ण वर्ष सुखी, समाधानी व आरोग्यदायी जाईल
Tips For How To Start New Year 1st January 2026 In Marathi
आपण 1 जानेवारी 2026 गुरुवार संपूर्ण दिवस पूजा-पाठ, संयम व शुभ कार्य करून घालवावा, त्यामुळे आपले संपूर्ण नवीन वर्ष सुख-शांती व समृद्धीचे जाईल. चला तर मग आपण जाणून घेवू या नवीन वर्षांच्या
पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळ पासून रात्री पर्यन्त कशी करायची.
नवीन वर्ष म्हणजे फक्त नवीन वर्षांचे कॅलेंडर बदलणे असे नाहीतर आपल्या जीवनात नवीन दिशा व सकारात्मक ऊर्जा आणण्याची चांगली संधी आहे. धार्मिक मान्यता अनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण कसा घालवतो त्यावर संपूर्ण वर्ष तसे जाते. म्हणजे त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षावर पडतो.
1 st जानेवरी 2026 गुरुवार ह्या दिवशी पूजा-पाठ, संयम व शुभ कार्य करून घालवला तर संपूर्ण वर्ष सुख-शांती, व समृद्धी मिळते. चला तर मग पाहू या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळ पासून रात्री पर्यन्त काय काय धार्मिक कार्य करायला पाहिजे.
सकाळी उठल्यावर सुरुवात कशी करायची:
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्त वर उठणे शुभ मानले जाते, उठल्या बरोबर देवाचे नामस्मरण करून मनातल्या मनात नवीन वर्षासाठी कृतज्ञता व्यक्त करा. मग स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा, स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल टाकायला विसरू नका. घरातील पूजाघर स्वच्छ करून दिवा लावावा, भगवान सूर्य देवांना जल अर्पित करा, अर्ध्य देताना पूर्ण आत्मविश्वास, स्वास्थ व सकारात्मक ऊर्जा होतो.
पूजा-पाठ व संकल्प करा:
सकाळी भगवान गणेश, लक्ष्मी माता व भगवान विष्णु ह्यांची पूजा करा. ह्या वर्षी नवीन वर्षात प्रदोश व्रत सुद्धा आहे. ह्या दिवशी भगवान शिव ह्यांची आराधना करा. त्याच बरोबर ॐ नाम: शिवाय किंवा ॐ गं गणपतये नम: ह्या मंत्राचा जाप करा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प जरूर करा की, सत्याच्या मार्गावर चालील , नियमित पूजा पाठ करेल व योग्य त्या मार्गावर चालेल.
दान-धर्म व शुभ कार्य:
दुपारच्या वेळी जरूरतमंदना अन्नदान , वस्त्र किंवा धन दान करणे खूप शुभ मानले जाते. दान केल्याने ग्रह दोष दूर होऊन लक्ष्मीचा वास घरात नेहमी राहतो. ह्या दिवशी गरीब किंवा वृद्ध व्यक्तीच्या आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा दान करताना श्रद्धा व विनम्रताने करा.
संपूर्ण दिवस आपला व्यवहार कसा असावा:
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वाणी व व्यवहार करताना संयम ठेवावा. कोणाशी भांडण, कटू शब्द किंवा नकारात्मक विचार ठेवू नये. धार्मिक दृष्टीने असे म्हणतात किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेले व्यवहार संपूर्ण वर्ष परत परत घडू शकतात. म्हणूनच प्रेमानी, शांतीने व सहयोगानी वागा.

संध्याकाळी व रात्री काय करावे?
संध्याकाळी देवघरात दिवा लावावा व तुळशीच्या रोपा समोर सुद्धा दिवा लावावा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. रात्री झोपताना देवाचे आभार मानून प्रार्थना करा व संपूर्ण दिवस जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागा व आपले नवीन वर्ष सुखी समाधानी व आरोग्यदायी जावो म्हणून प्रार्थना करा.
अश्या प्रकारे आपण 1 जानेवारी 2026 गुरुवार संपूर्ण दिवस घालवला तर आपल्याला नवीन वर्ष नक्की चांगले जाऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी व मानसिक शांती मिळेल.
