31 December Delicious Rich Creamy Malai Bread Pudding Dessert Recipe In Marathi
31 डिसेंबरला डिलीशीयस रिच व क्रिमी मलई ब्रेड कस्टर्ड पुडिंग बनवा सगळे खुश
31 डिसेंबर काय डेझर्ट किंवा पुडिंग बनवावे अगदी सोपी झटपट रेसीपी आहे, आपण नेहमी ब्रेड कस्टर्ड बनवतो पॅन आज अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत,
डिलीशीयस रिच व क्रिमी मलई ब्रेड कस्टर्ड पुडिंग बनवायला अगदी सोपे आहे व 31 डिसेंबरला ही डिश अगदी परफेक्ट आहे.
साहित्य: कस्टर्ड बनवण्यासाठी:
1/2 लीटर फूल क्रीम दूध
4 टे स्पून साखर
2 टे स्पून कस्टर्ड पावडर
1/4 टी स्पून व्हनीला एसेन्स
सजावटीसाठी ड्रायफ्रूट
मलई ब्रेड बनवण्यासाठी:
6 ब्रेड स्लाइस
4 टे स्पून फ्रेश क्रीम2 टे स्पून मिल्क पावडर
1 टे स्पून पिठीसाखर
1/2 टी स्पून वेलची पावडर

कृती: प्रथम जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर व 1/2 कप दूध मिक्स करून घ्या, मग दूध चांगले गरम झालेकी त्यामध्ये साखर घालून 1 मिनिट गरम करून घ्या म्हणजे साखर विरघळेल मग त्यामध्ये कस्टर्डचे मिश्रण घालून मंद विस्तवावर मिक्स करून मिश्रण थोडेसे घट्टसर होई पर्यन्त गरम करून घ्या, मिश्रण थोडेसे घट्ट वाटले तर लगेच विस्तव बंद करून कस्टर्ड थंड करायला बाजूला ठेवा.
आता ब्रेडच्या बाजूच्या कडा कापून घ्या. मलईचे जे मिश्रण बनवले आहे त्याचे एक सारखे 3 भाग करून घ्या. ब्रेडच्या एका बाजूस मलईचे मिश्रण लावा व त्यावर दूसरा ब्रेड ठेवून अगदी हळुवार पणे दाबून घ्या, मग त्याचे दोन त्रिकोणी तुकडे कापून घ्या. अश्या प्रकारे बाकीच्या ब्रेडचे मलई लाऊन ब्रेड कट करून घ्या.
एका काचेच्या पसरट बाउलमध्ये सर्व ब्रेडच्या कट केलेल्या स्लाइस ठेवा मग त्यावर व बाजूनी बनवलेले कस्टर्ड घालून वरतून ड्रायफ्रूट नी सजवून पूडिंग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
आता थंडगार रिच व क्रिमी मलई ब्रेड कस्टर्ड पुडिंग सर्व्ह करा.
