Datta Jayanti 21 Diwanchi Prabhawi Swami Sewa konti Karaychi In Marathi
दत्त जयंती 2025 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 21 दिवसांची प्रभावी स्वामी सेवा करा सर्व मनोकामना पूर्ण होतील
4 डिसेंबर 2025 गुरुवार ह्या दिवशी दत्त जयंती आहे. दत्त जयंती व गुरवार दिवस हा खूप चांगला योग जुळून येत आहे. दत्त जयंती पर्यन्त कोणती सेवा आपण करायची ते आपण पाहणार आहोत.
आपण कोणती सुद्धा सेवा करणार असाल तर त्याच्या अगोदर आपण ठरवले पाहिजे की आपण ही सेवा कोणत्या कारणासाठी करणार आहोत ते अगोदर निश्चित केले पाहिजे. आपल्याला माहिती असेलच स्वामी सेवा ही सर्वात प्रभवी सेवा आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी, प्रश्न, येत असतील तर स्वामी सेवा केल्यानी सर्व अडचणी दूर होतात किंवा आपल्या कोणत्या मनोकामना असतील तर त्या सुद्धा पूर्ण होतात. आपण स्वामी सेवा सुरू केली की आपल्याला लवकरच चांगली प्रचिती येते.
आपण कोणती सुद्धा सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प केला पाहिजे.
आता आपण पाहू या संकल्प कसा करायचा.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर आसन घालून बसावे व स्वतः ला गंध लाऊन घ्यावे. एका तांब्यात पाणी घ्यावे व ताम्हण व पळी घ्यावी. मग हातात पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करीत आहोत ते सांगावे. मग हातातील पाणी ताम्हणात सोडावे.
आता 4 डिसेंबर 2025 गुरुवार ह्या दिवशी दत्त जयंती आहे. तर त्यासाठी आपण 21 दिवसांची स्वामींची सेवा करू शकता, त्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांचे ‘श्री स्वामी समर्थ सारामृत’ संक्षिप्त ह्याचे पारायण करायचे आहे. ‘श्री स्वामी समर्थ सारामृत’ मध्ये 21 अध्याय आहेत. तर आपल्याला रोज 1 ते 21 अध्यायचे वाचन करायचे आहे. ही सेवा 21 दिवसांची आहे. आपल्याला 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यन्त करायची आहे.
आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करायची असेलतर सोपे काही नियम पाळायचे आहेत.
* आपण ही सेवा सकाळी किंवा दिवस भरामद्धे कधी सुद्धा करू शकता. पण आपण रोज शक्यतो रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यावर करणार असालतर रोज सकाळीच करा, किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळी करा, रोज वेळत बदल करू नका.
* सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून दिवा व आगरबती लाऊन आसन घालून बसावे. आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देवू नये.

* सेवा सुरू केली की मांसाहार करू नये. पण आपल्या घरातील व्यक्तिना पाहिजे असेलतर बनवून द्यावा पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून मगच बनवावा.
* सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये जर घरातील व्यक्ति वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे म्हणजे आपल्या सेवे मध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेलतर तेवहडे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेर गावी जाणार असालतर आपण बाहेर सुद्धा वाचन करू शकता. जर आपली मासिक पाळी ह्या 21 दिवसांच्या मध्ये येणार असेलतर आपण ही सेवा 13 तारखेच्या आता करू शकता किंवा दत्त जयंती झाल्यावर सुद्धा पूर्ण करू शकता.
* सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते.