सांधे दुखीवर रामबाण उपाय एक ग्लास मेथीचे पाणी
A Glass Of Fenugreek Water Is A Panacea For Joint Pain In Marathi
ज्या व्यक्तिना सांधे दुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात मेथीच्या दाण्यांचा जरूर उपयोग केला पाहिजे. करून पहा नक्की फायदा होईल.
सांधे दुखी म्हणजे खूप त्रास होतो व हा त्रास आपले वय वाढायला लागले की वाढत जातो. कधी कधी अर्थराइटिस त्रास आपल्या शरीराला जास्त कष्ट झाले की सुरू होतो. मग आपण पेनकीलर्स घ्यायला सुरुवात करतो. मग पेनकीलर्स घेऊन त्याचे साइड इफेक्ट व्हायला लागतात. जर आपण नैसर्गिक पद्धतीने आपले दुखणे थांबवले तर चांगलेच आहे. त्यासाठी आपण मेथीच्या दाण्यांचे पाणी रोज सेवन केले पाहिजे.
मेथीच्या दाण्यात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-ऑक्सीडेंट व दुखणे कमी करण्याचे गुण आहेत. जे सांधे आखडने, दुखणे, बोचेण कमी होण्यास मदत करते. तसेच ज्यॉइंटचे ल्यूब्रिकेट योग्य राखण्यास मदत करते. त्यामुळे दुखण्या पासून आराम सुद्धा मिळतो.
आता आपण पाहू या मेथीच्या दाण्याचा आपल्या सांधे दुखीवर काय परिणाम होतो.
मेथीच्या दाण्यामद्धे एंटी-इंफ्लेमेटरी प्रोपर्टीज असतात:
मेथीच्या दाण्यामद्धे फ्लेवोनोइड्स, एल्कलॉइड्स व सैपोनिन सारखे कंपाऊंड आहेत. जे संध्यामद्धे आलेली सूज कमी करण्यास मदत करते. ते सांधे दुखणे व आखडणे कमी करण्यास मदत करते, त्यामुळे आरामशिर चलता येते व दुखणे सुद्धा कमी होते.
न्याचरल पेन रिलीव्हर सारखे काम करते:
मेथी दाण्याचे सेवन करणे ह्या साठी सुद्धा चांगले जाते की ते न्याचरल पेन रिलीव्हर सारखे काम करते. खर म्हणजे मेथी मध्ये असलेले एल्कलॉइड शरीराचे दुखणे थांबवण्याचे संकेत देते. मग त्यामुळे सांधे दुखी पासून मुक्ती मिळते. ज्यांना अगदी सांधे दुखीचा जुना आजार आहे त्यांना सुद्धा ह्याच चांगला उपयोग होतो.
ज्वॉइंट्स करते ल्यूब्रिकेट:
सांधे दुखी सुरू झाली की सांधे आखडण्याची तक्रार सुरू होते व हालचाल करण्याच मुश्किल होते. पण मेथी दाणे ज्वॉइंट्स ल्यूब्रिकेशन बरोबर हालचाली मध्ये सुधारणा आणते. खर म्हणजे मेथीच्या दाण्यात म्यूसिलेज आहे त्यामुळे ते एक जेल सारखा पदार्थ आहे त्यामुळे ते लवचिकपणा आणण्यास मदत करते. म्हणूनच गुडघे किंवा खांदे आखडणे ह्यावर सुद्धा खूप उपयोगी आहे.
शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते:
जेव्हा व्यक्तिचे वजन वाढते तेव्हा शरीराचा सर्व भार पाय व गुडघे वर जास्त पडतो. त्यामुळे दुखणे जास्त वाढते. पण मेथी दाणे पचन क्रियासाठी मदत करते व मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत करते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
यूरिक एसिड लेवल कंट्रोल करते:
जेव्हा शरीरात युरीक एसिड लेवल वाढते तेव्हा सांधे दुखीच्या समस्या व सूज येणे ह्या सारख्या समस्या वाढतात. म्हणून आपल्याला मेथी दाणे सेवन केले पाहिजे मेथी जास्तीचे युरीक एसिड शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करते. व त्यामुळे दुखणे कमी होते.
मेथीच्या दाण्याचे पाणी कोणला वर्ज आहे:
हेल्थ एक्स्पर्टचे म्हणणे असे आहे की लो ब्लड शुगर, थायरॉइड, गर्भावस्था, एलर्जी किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी मेथीचे पाणी सेवन नाही केले पाहिजे. कारण की मेथी मध्ये अशी काही तत्व आहेत जे काही लोकांच्या हारमोनल किंवा पचन च्या समस्याशी जोडल्या गेल्या आहेत.
मेथीचे पाणी कधी घेऊ नये:
मेथी ही आपल्या शरीरासाठी गरम आहे. पण रात्री पाण्यात भिजत घालून ठेवली तर त्याची गरमी कमी होते. व आपलीला शरीराला थंड करण्यास मदत करते. म्हणूनच थंडीमध्ये ह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण गरमी मध्ये सुद्धा पाण्यात भिजवून सेवन केल्यास आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत मिळते.
14 दिवस मेथी दाण्याच्या पाण्याचे सेवन केल्यास काय फायदे होतात:
मेथीच्या दाण्याचे पाणी सेवन केल्याने डायबीटीज किंवा इंसुलिन घेणाऱ्या लोकांसाठी फायदेमंद आहे. तसेच अपचन किंवा पोत फुगणे समस्या पासून आराम मिळतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हार्ट डिसीजचा धोका कमी होतो.
मेथीच्या दाण्याचा उपयोग कसा करावा:

रात्रभर पाण्यात भिजवलेले मेथी दाणे:
रात्री एक चमचा मेथी दाणे अर्धा ग्लास पाण्यात भिजत ठेवा. मग सकाळी उठल्यावर अनोश्या पोटी पाणी पिऊन मेथी दाणे चावून खा.
मेथीच्या दाण्याच्या पावडरचे सेवन:
मेथी, सुंठ व हळद सम प्रमाणात घेऊन मिक्स करून पावडर करून ठेवा. मग रोज सकाळी व संध्याकाळी एक-एक चमचा कोमट पाण्यात घालून सेवन करावे.
मोड आलेली मेथी:
मिथीचे दाणे मोड आणून सेवन केल्यास सांधे दुखी पासून आराम मिळतो.
टीप: आपल्याला घरगुती कोणते सुद्धा उपचार करायचे असतील तर आधी डॉक्टरी सल्ला घ्यावा.