Adhik Maas 2026 Last 5 Divine Days | Missed the Whole Month? Do These Powerful Sevas Now!
अधिक मासाचे शेवटचे 5 दिवस खूप शक्तिशाली | नक्की करा या सेवा, मिळेल पुण्य
अधिक मास शेवटचे 5 दिव्य दिवस महत्वाचे, पूर्ण अधिक मास काही केले नाही आता सेवा करा
17 मे रविवार ह्या दिवसा पासून अधिक मास प्रारंभ झाला असून 15 जून 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. अधिक मास हा आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्वाचा असून भागवान श्रीहरी विष्णु ह्यांना समर्पित आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. त्यामुळे ह्या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा. आपण ह्या अगोदर अधिक मास मध्ये काय काय करावे, कोणत्या सेवा कराव्या, 33 दिव्यांचे महत्व, अधिक मास मध्ये आईची ओटी कशी भरायची, कुलदेवीची ओटी कशी भरायची ह्यांची संपूर्ण माहिती पाहिली.
11 जून 2026 गुरुवार ते 15 जून 2026 सोमवार हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. ह्या 5 दिवसांत आपण आपल्याला जेव्हडी जास्त सेवा करता येईल तेव्हडी करायची आहे.
आता आपण पाहूया या 5 दिवसाचे काय महत्व आहे. व कोणत्या सेवा करायच्या आहेत.
11 जून 2026 गुरुवार: ह्या दिवशी परमा एकादशी आहे, एकादशी ही भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे, तसेच आपण ह्या दिवशीविट्ठल रुक्मिणीची सेवा करू शकता, भगवान विट्ठल हे भगवान विष्णु ह्यांचे रूप आहे. परमा एकादशीला काय करावे व कोणत्या सेवा कराव्या ह्याची माहिती आपण आधी पाहिली आहे.
हिंदू धर्मामध्ये एकादशीचे खूप महत्व आहे.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून व्रत करण्याचा संकल्प करा, संपूर्ण दिवस उपवास करून फलफार करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडा.
भगवान विष्णु ह्यांना पंचामृतने अभिषेक करून फूल व तुळशी पत्र अर्पित करा (एक गोष्ट लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका आधीच तोडून ठेवा)
आपल्याला ह्या दिवशी “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला शुभ वेळी ब्रह्मणाला व जरूरत मंद लोकाना दान करून व्रत पारण करा.
12 जून 2026 शुक्रवार: ह्या दिवशी द्वादशी आहे तसेच प्रदोष आहे. द्वादशी ह्या दिवशी एकादशीचे व्रत समाप्ती केली जाते. तेव्हा ब्रह्मणाला व जरूरत मंद लोकांना दान करून व्रत समाप्ती करा. सात्विक भोजन करा
12 जून ह्या दिवशी शुक्र प्रदोष हा दिवस आहे. ह्या दिवशी भगवान शिव व माता पार्वती ह्याची पूजा अर्चा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
प्रदोष व्रतची पूजा नेहमी सूर्यास्त नंतर केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करा भगवान शिव ह्यांना अभिषेक करा त्यांना बेलपत्र, धतुरा, मध, व दूध अर्पित करा. माता पार्वतीची पूजा करून शृंगार साहित्य अर्पित करा.
प्रदोष ह्या दिवशी ॐ नम:शिवाय ह्या मंत्राचा जाप करा.
13 जुन 2026 शनिवार: ह्या दिवशी मासिक शिवरात्री आहे. अधिक मास मधील शिवरात्री खूप खास मानली जाते. ह्या दिवशी 27 वर्षा नंतर “गौरी योग” चा दुर्लभ महासंयोग आहे. ह्या दिवशी घरात मातीचे शिव लिंग बनवून त्याची पूजा केली जाते. ह्या दिवशी ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा जाप करा.
14 जून 2026 रविवार: ह्या दिवशी दर्श अमावस्या आहे. ह्या दिवशी दर्श अमावस्या दुपारी 12:19 प्रारंभ होत असून 15 जून सकाळी 8:23 ला समाप्ती होत आहे. ह्या दिवशी पितृ तर्पण केले जाते, पूर्वजच्या शांती, श्राद्ध व तर्पण केले जाते. पवित्र नदी मध्ये स्नान, ध्यान, दान केले जाते. ह्याचे आध्यात्मिक महत्व खूप आहे.
15 जून 2026 सोमवार: ज्येष्ठ सोमवती अमावस्या आहे. ह्या दिवशी विवाहित महिला व्रत ठेवून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करतात व भगवान शिव व पार्वतीची पूजा अर्चा करतात. पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात व पूजा करतात. आपल्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध कर्म, तर्पण व पिंडदान करतात त्याच बरोबर दान धर्म करतात.
आपण ह्या पाच शुभ दिवसांत एकादशीचे व्रत जरूर करावे व बाकीचे चार दिवस व्रत नाही केलेतर एक वेळेस सात्विक भोजन करावे मग फलाहार करावा. आपण विष्णु सहस्त्रनाम म्हणू शकता, मंत्र जाप करू शकता, भगवत ग्रंथ वाचू शकता, व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता, सत्यनारायण पूजा करू शकता, आपण श्री स्वामी समर्थ ह्याचे संक्षिप्त चरित्र सुद्धा पठन करू शकता, भजन कीर्तन करू शकता. एक लक्षात ठेवा आपण महिनाभर काही सुद्धा सेवा केली असेल किंवा नसेल तरी हे पाच दिवस आपण मनोभावे पूजा अर्चा नामस्मरण करा नक्की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

अधिक मास मध्ये आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे, आपल्या आईची ओटी भरायची आहे, 33 वातीनचा दिवा लावायचा आहे, जावयाला वाण द्यायचे आहे. आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. अन्नदान करायचे आहे, दीपदान करायचे आहे, 33 वस्तु दान करायच्या आहेत.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पंचरात्र व्रत करू शकता त्यासाठी आपल्याला एकादशी पासून ते अमावस्या पर्यन्त म्हणजे पाच दिवस रात्री जागरण करून मंत्र जाप, कीर्तन, भजन व दीप दान करू शकता. पण रोज पाच दिवस एक तुपाचा दिवा दान करा त्यांनी सुद्धा खूप चांगला फरक पडेल.
आपण 11 जून 2026 गुरुवार ते 15 जून 2026 सोमवार ह्या दिवसामध्ये अजून रोज काय काय करायचे आहे त्याची सुद्धा माहिती वेगळी दिली जाईल.
