June 12 or 13, 2026? Adhik Maas Shukra Pradosh Vrat Date, Puja Time & Powerful Remedies

Adhik Maas Shukra Pradosh Vrat
June 12 or 13, 2026? Adhik Maas Shukra Pradosh Vrat Date, Puja Time & Powerful Remedies

12 का 13 जून कधी आहे अधिक मास प्रदोष व्रत? तिथी, महत्व, पूजा वेळ व सटीक उपाय

June 12 or 13, 2026? Adhik Maas Shukra Pradosh Vrat Date, Puja Time & Powerful Remedies

सनातन धर्मामध्ये प्रदोष व्रत चे विशेष महत्व आहे, पण जेव्हा हे व्रत अधिक मास शुक्रवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याचे महत्व अधिक वाढते. म्हणून त्याला शुक्र प्रदोष म्हणून संबोधले जाते. जे भगवान शिव व माता पार्वतीची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. आपल्याला माहिती असेलच अधिक मास हा आध्यात्मिक दृष्टीने पवित्र व दुर्लभ महिना आहे. ज्यामध्ये भगवान विष्णु व भगवान शिव ह्यांची विशेष कृपा मिळण्यासाठी चांगली वेळ आहे. त्यामध्ये येणारा शुक्र प्रदोष भक्तांसाठी खास फलदायी मानला आहे.

चला तर मग पाहूया अधिक मास मधील शुक्र प्रदोष तिथी त्याचे महत्व काय आहे.
शुक्र प्रदोष व्रत 2026 तिथि:
वैदिक पंचांग अनुसार, जेष्ठ मास कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी 12 जून रात्री 7:36 मिनिटांनी प्रारंभ होत असून 13 जून संध्याकाळी 4:07 मिनिटांनी समाप्त होत आहे. प्रदोष व्रतचे पालन त्रयोदशी तिथी प्रदोष काळामध्ये होते. म्हणून 12 जून शुक्रवार ह्या दिवशी प्रदोष व्रत ठेवायचे आहे.

पूजेची शुभ वेळ:
ह्या दिवशी भगवान शिवची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ वेळ प्रदोष काल मानला जातो. पंचांग अनुसार संध्याकाळी 7:36 मिनिट पासून 9:20 मिनिट पर्यन्त पूजा अर्चा करण्यासाठी अत्यंत शुभ वेळ आहे. ह्या वेळेत श्रद्धा व विधी पूर्वक केलेली पूजा विशेष फलदायी ठरते.

ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी हा शुभ योग आहे. जो अतिशय प्रभावशाली आहे. ह्या वेळेत भक्त भगवान शिव ह्यांना जलअभिषेक, रुद्रभिषेक, व विधीपूर्वक पूजा-अर्चा करतात. त्याच बरोबर आपल्या जीवनात सुख-समृद्धी, वैवाहिक सुख व मनोकामना पूर्तिसाठी प्रार्थना करतात.

धार्मिक महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार, अधिक मास मध्ये येणारे शुक्र प्रदोष व्रत भक्ताच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी आणते. हे व्रत केल्याने भगवान शिव व माता पार्वतीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम व सामंजस्य टिकून राहते. त्याच बरोबर आर्थिक स्थिति मजबूत होते. व मानसिक तनाव कमी होतो. व जीवनातील सर्व भय चिंता दूर होतात.

शुक्र प्रदोष काही गोष्टी लक्षात ठेवा:
प्रदोष व्रतमध्ये संध्याकाळी सूर्यास्तच्या वेळी म्हणजेच प्रडोष काळ मध्ये शिव पूजा करणे सर्वात जास्त महत्वपूर्ण मानले जाते. म्हणून सकाळची पूजा झाल्यावर संध्याकाळी पूजा करायला आजिबात विसरू नका. त्याच बरोबर भगवान शिव ह्यांची पूजा करताना फक्त शरीरच नाहीतर आपले मन सुद्धा पवित्र ठेवणे जरुरीचे आहे.

प्रदोषमध्ये एक चूक करणे खूप भारी पडू शकते?
जर आपण ह्या दिवशी खोटे बोलणे, क्रोध, वाद-विवाद किंवा कोणाचा अपमान करता तर पूजेचे फळ आपल्याला मिळणार नाही.

व्रताच्या दिवशी घरात तामसिक भोजन, जसेकी कांदा-लसूण, मास, दारू सेवन करणे चुकीचे आहे.

प्रदोष व्रतची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे आजिबात घालू नयेत, कारणकी ते शुभ नसते. आपण पांढरे, पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करून मगच भगवान शिव ह्यांची पूजा करावी.

ह्या पवित्र दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्यचे पालन करावे, मनात कोणते सुद्धा नकारात्मक विचार आणू नयेत.

Adhik Maas Shukra Pradosh Vrat
June 12 or 13, 2026? Adhik Maas Shukra Pradosh Vrat Date, Puja Time & Powerful Remedies

पूजेच्या वेळी शिवलिंगवर चुकून सुद्धा ही वस्तु अर्पित करू नका:
शिवलिंगची पूजा अत्यंत मनोभावे करावी, पण काही वस्तु भगवान महादेव ह्यांना अर्पित केल्या जात नाहीत त्यामुळे आपली पूजा खंडित होऊ शकते.

आपल्याला महिती असेलच भगवान शिव हे वैरागी आहेत त्यामुळे त्यांच्यावर हळद-कुंकू किंवा कोणती सुद्धा सौन्दर्यचे साहित्य अर्पित करू नये.

शिवलिंग वर तुळशी पत्र किंवा केतकीच फूल सुद्धा अर्पित करणे वर्ज मानले आहे.
भगवान शिव ह्यांना नारळाचे पाणी किंवा तुटलेल्या अक्षता अर्पित करू नका नेहमी अखा तांदूळ अर्पित करा.

प्रदोषच्या दिवशी करावयाचे उपाय:
विवाहित जीवन सुखी होण्यासाठी:
शुक्र प्रदोष च्या दिवशी लाल गुलाबा ची 27 फूल घेऊन लाल रंगाच्या दोऱ्यायामध्ये ओवावीत, मग पती-पत्नी दोघांनी मिळून ती फूल भगवान शिव ह्यांना अर्पित करावीत. असे केल्याने विवाहित जीवनात मधुरता येते. तसेच ज्या पुरुषणाच्या लग्नात अडथळे येतात त्यांनी सुद्धा हा उपाय करायला हरकत नाही.

विवाह व रोग चिंता पासून मुक्ती:
शुक्रप्रदोष च्या दिवशी संध्याकाळी भगवान शिव ह्यांना कच्चे दूध घेऊन स्नान घालावे. गुलाबाचे अत्तर अर्पित करावे त्यामुळे विवाह चिंता व परेशानी दूर होतील ज्याना कोणला शुक्र संबंधित कोणता रोग असेलतर त्यासाठी हा उपाय चांगला आहे करून पहा.

घरात अन्न-धन कभी कमी पडणार नाही:
शुक्र प्रदोष च्या दिवशी संध्याकाळी पांढरे चंदनचा लेप भगवान शिव ह्यांच्या वर लावावा व त्याच्या समोर बसून ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा जाप करावा. असे केल्याने घरात कधी सुद्धा अन्न-धन ची कमतरता होणार नाही.

कर्ज व्यापार मधील अडचणी दूर करण्यासाठी:
भगवान शिव ह्यांना 11 बेलपत्र अर्पित करून प्रदोश काळ मध्ये मंदिरात तुपाचा दिवा व तेलाचा दिवा लावावा.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.